Cat With Milk Sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : वाटीभर दुधासाठी शंभर किलोमीटर

गावाकडं दोन बंगले. पुण्यात चाळीस फ्लॅट. दीड एकर जमीन. महिन्याचे चार लाख उत्पन्न. घरात भरपूर सोनं-नाणं. मुलं मोठ्या शाळेत शिकायला.

नितीन थोरात

गावाकडं दोन बंगले. पुण्यात चाळीस फ्लॅट. दीड एकर जमीन. महिन्याचे चार लाख उत्पन्न. घरात भरपूर सोनं-नाणं. मुलं मोठ्या शाळेत शिकायला.

गावाकडं दोन बंगले. पुण्यात चाळीस फ्लॅट. दीड एकर जमीन. महिन्याचे चार लाख उत्पन्न. घरात भरपूर सोनं-नाणं. मुलं मोठ्या शाळेत शिकायला. घरी नोकरचाकर. एवढं सगळं असतानाही वाटीभर दुधासाठी तो शंभर किलोमीटर गेला होता. तेही मागच्या आठवड्यात. ऐकायला विचित्र वाटतंय ना? मलाही वाटलं होतं.

त्याचं झालं असं, मित्र पुण्यात राहतो आणि त्याची आई गावाकडं. बहिणींची लग्नं झाली आहेत आणि वडीलही वारलेत. आई पुण्याला राहायला येत नाही. तिला गावाकडंच करमतं. एवढ्या मोठ्या बंगल्यात जिवंतपणा वाटावा म्हणून तिनं एक मांजर पाळलीये. दिवसभर दोघींच्याच गप्पा. आई कधीच मांजरीला सोडून गेली नाही, पण त्या दिवशी तिला लेकीकडं, म्हणजे कोल्हापूरला जावं लागलं. सकाळी जाऊन ती संध्याकाळी परत येणार होती. पण, कोल्हापूरला गेल्यावर लगेच निघणं जमलं नाही आणि तिच्यापुढं माजंरीच्या दुधाचा प्रश्न उभा राहिला. मित्र संध्याकाळी पुण्यात एका फ्लॅटच्या व्यवहाराला बसला होता. पन्नास लाखांचा व्यवहार सुरू होता. आईचा एक फोन आला. त्यानं कट केला.

दुसरा फोन आला. त्यानं कट केला. आईनं तिसरा फोन केला. बाजूला जाऊन त्यानं फोन उचलला, तर आई म्हणाली, ‘हातात जे काम असेल ते सोड आणि आत्ताच्या आत्ता गावाकडं जाऊन माजंरीला दूध ठेव.’ मित्रानं कपाळावर हात मारला. म्हणाला, ‘मी आत्ता महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे आणि गाव शंभर किलोमीटर आहे.’ क्षणात आईचा आवाज हळवा झाला. म्हणाली, ‘सगळी लेकरं संसाराला लागली. ती एकटीच मांजर आहे माझ्यासोबत. तुला जमणार नसेल तर सांग. आत्ता मी कोल्हापूरवरून निघते.’

आईच्या या वाक्यावर मात्र मित्रानं व्यवहाराला आलेल्या लोकांसमोर हात जोडले आणि त्यांना खरं खरं कारण सांगितलं. सगळ्यांनी स्मित करत होकार दिला. मित्रानं फोर व्हीलर चालू केली आणि थर्मासमध्ये गरम दूध घेऊन गावाकडं निघाला. रात्री अकराला घरी पोचला. प्रेमानं उड्या मारत जवळ आलेल्या मांजराला दूध पाजताना झालेला आनंद कोणत्याच नोटांमध्ये मोजता येत नव्हता, असं तो सांगत होता. पण, माझं लक्ष सगळं त्या पन्नास लाखांच्या व्यवहारावर होतं. त्याचं काय झालं, असं म्हणताच तो म्हणाला, ‘पैसे कुठं पळून जातात होय? दोन दिवसांनी उलट पंचावन्न लाखांचा व्यवहार झाला. वाटीभर दुधामुळं पाच लाख वाढून मिळाले.’

कधी कधी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी फायदा आणि पुण्यही पदरात टाकून जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur circuit bench : कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठ, मुख्य न्यायमूर्ती दिला विश्वास; तरूण वकिलांना संधी

Quick Breakfast Idea: उरलेला भात फेकू नका! १० मिनिटांत तयार करा कुरकुरीत, टेस्टी राईस Cutlets; मुलंही करतील हट्टाने फस्त

Amravati News: एकाच्या पोलिस कोठडीत २७ पर्यंत वाढ; परतवाडा व्हिडिओ व्हायरल प्रकरणी तिघांना न्यायालयीन कोठडी

Vidarbha News: नागपूर-रायपूर मार्गावर गाड्यांचा खोळंबा; मालगाड्यांना प्राधान्य; तासन् तास विलंबामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांना मनःस्ताप

fertilizer Rationing: खत वितरणासाठी रेशनिंग पद्धत! सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर होणार अंमलबजावणी; वारेमाप वापराला लगाम, नेमकं काय आहे नवे धोरण?

SCROLL FOR NEXT