writer sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : रिकामटेकडा लेखक

‘खरं तर तू एखादी पानटपरी टाकाय पायजे. तुझ्या घराजवळून सोलापूर हायवे जातो. तिथं एखाद्या हॉटेलपुढं टपरी टाक. रोजचे चार-पाचशे रुपये चालू होत्यान.

नितीन थोरात

‘खरं तर तू एखादी पानटपरी टाकाय पायजे. तुझ्या घराजवळून सोलापूर हायवे जातो. तिथं एखाद्या हॉटेलपुढं टपरी टाक. रोजचे चार-पाचशे रुपये चालू होत्यान.

‘खरं तर तू एखादी पानटपरी टाकाय पायजे. तुझ्या घराजवळून सोलापूर हायवे जातो. तिथं एखाद्या हॉटेलपुढं टपरी टाक. रोजचे चार-पाचशे रुपये चालू होत्यान. बायकुला कामाव पाठवतो अन् दिवसभर कम्युटरपुढं खुर्ची गरम करम बसतो. लाज कशी वाटत नाय रं?’

आईचा मामा असं म्हणाला आणि मी कपाळावरचा घाम पुसला. आगामी अंबालक्ष्मी कादंबरीचं नुकतंच पोस्टर प्रकाशित झालं. न्यू ईरा प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सुंदर कार्यक्रमही झाला. त्या कार्यक्रमाचे फोटो आणि अंबालक्ष्मी कादंबरीचं मुखपृष्ठ मोठ्या कौतुकानं मी आईच्या मामाला दाखवत होतो. आई आणि बायकोही माझ्याकडं मोठ्या कौतुकानं पाहत होत्या. मामा मात्र माझ्याकडं मोठ्या दयेच्या नजरेनं बघत होता. त्यानं शांतपणे कादंबरीचं कव्हर टेबलावर ठेवलं आणि माझ्याकडं पाहत म्हणाला, ‘होक नितीन बाळा, मी चार वर्षं झालं तुला सांगायचं म्हणतोय. पण, आता टाइम आलाय. पुस्तकं लिहिणं ही रिकामटेकड्या माणसाचं काम असतंय. तू पुस्तक लिहून नुसती घरात रद्दी वाढवतोय. त्यापेक्षा कायतरी कामधंदा कर.’

तसं मी त्यांना थाबंवत म्हणालो, ‘अहो मामा, पुस्तक लिहिणं ही कला आहे. माझं पॅशन आहे. मला त्यातून आनंद मिळतो.’

तसा मामा आवाज वाढवत म्हणाला, ‘‘तुझा तो आनंद घाल चुलीत. स्वत: घरात बसतो अन् बायकोला कामाला पाठवतो? ते काय नाय. मी गावाकडून भाजीपाला पाठवत जाईल गुमान तो कुठल्यातरी चौकात बसून विक. नायतर उदबत्तीच्या कारख्यान्यात माझी ओळखहे तिथं कामाला लावू का? तू काम केलं तर तुझ्या बायकोला असं शाळेत मास्तरकी करायची वेळ येणार नाय. कितीबी झालं तरी आपण पुरुषमंडळी. घराच्या खर्चाचा भार आपणच उचलायचा असतो.’’

मी वैतागून आईकडं पाहिलं. आईनं शांत राहण्याचा इशारा केला. तशी बायको लंगडत चहा घेऊन आली. तिनं मामांना चहा दिला. मामा म्हणाले, ‘काय गं बाय? लंगडायला काय झालं तुला?’

ती म्हणाली, ‘काल कामाला जाताना गाडीवरून पडले. पण, काय करणार पैसे कमवायचे म्हणल्यावर कामाला जावंच लागणार ना?’ तसा मामा माझ्याकडं जाळ फेकत म्हणाला, ‘आरं नित्या, तुझ्या छातीत काळीजहे का दगडं ? आग लाव तुझ्या पुस्तकाला.’ मी बायकोकडं रागानं बघत होतो. ती गालातल्या गालात हसत किचनमध्ये निघून गेली. तिथून पुढं अर्धा तास मामा मला लेक्चर देत होता आणि मी ऐकत होतो. शेवटी हायवेवरच्या टोल नाक्यावर मी दिवसभर खारे शेंगदाणे, जांभळं, बोरं असं काय काय विकणार आणि रात्री पुस्तक लिहिणार यावर आमचं एकमत झालंय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT