Cat
Cat sakal
सप्तरंग

सोनेरी स्वप्नं : मांजराचा मृत्यू आणि आम्ही!

नितीन थोरात

वेळ दुपारची. मोबाईलवर फेसबुक पाहत होतो. शेजारी मांजर खेळत होतं. छातीवर उड्या मारत होतं. खिडकीत बसून पक्षी पाहत होतं. कधी-मधी पायाच्या बोटांशी खेळत होतं.

वेळ दुपारची. मोबाईलवर फेसबुक पाहत होतो. शेजारी मांजर खेळत होतं. छातीवर उड्या मारत होतं. खिडकीत बसून पक्षी पाहत होतं. कधी-मधी पायाच्या बोटांशी खेळत होतं. अचानक ते धावत टेरेसवर गेलं आणि कसलातरी विचित्र आवाज काढू लागलं. कुतूहल म्हणून मी टेरेसवर गेलो तर मांजराच्या तोंडातून लाळ टपकत होती आणि ते थरथर कापत होतं. काय झालं कळेना. मांजराला पकडू लागलो तर अजून लांब धावू लागलं. चक्कर येऊन पडू लागलं. विचित्र आवाज काढू लागलं. त्याच्या तोंडाला फेस येऊ लागला. लगबगीनं डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हणाले, ‘‘त्याला विषबाधा झाली असेल. त्याच्या तोंडात पाल किंवा काही कीडा आहे का बघा. त्याचं तोंड स्वच्छ करा. त्याला ओल्या फडक्यानं पुसा.’ सगळं केलं. पण, अवघ्या वीस मिनिटात मांजरानं तडफडून तडफडून मांडीवरच जीव सोडला. डोळे भरून आले.

बायको शाळेत गेलेली. घरी मी एकटाच. बायकोनं फोन केला. आईचं, तुझं, कुत्र्याचं, मांजराचं जेवण झालं का विचारलं. मी होकार दिला आणि फोन ठेवला. संध्याकाळी ती घरी आली. नित्यनेमानं कुत्रं तिच्या अंगावर उड्या मारू लागलं. मांजर तिला दिसलंच नाही. मी मांजराला बेडशीटमध्ये गुंडाळून ठेवलं होतं. फक्त शेपूट दिसत होतं. ‘बघ हे निर्लज्ज अजून झोपलेलंच आहे. खायच्या प्यायच्या वेळीच बरं म्याव म्याव करत जवळ येतं. भूक नसली तर जराही भाव देत नाही. आता बघ बोंबलाचा वास आल्यावर कसं पळत येईल माझ्याकडं,’ असं म्हणत तिनं पिशवीतून बोंबील काढलं. कुत्रं उड्या मारू लागलं. पण, मांजराची काहीच हालचाल नाही. तशी बायको हसत म्हणाली, ‘अरे कसलं गाढ झोपलयं बघ हे. बोंबलाच्या वासानंही उठत नाही.’ असं म्हणत तिनं मांजराच्या शेपटाला गुदगुल्या केल्या. तरीही हालचाल नाही. तिनं मांजराला हळूवार हात लावला आणि थंडगार पडलेलं मांजर बघून ती स्तब्धच झाली. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, तशी भेदरून ती मांजराला हलवू लागली. ‘मन्या मन्या, मन्या उठ की,’ असं ओरडू लागली. आत्ता हसणारी क्षणात ढसाढसा रडू लागली. तिला सावरणं अवघड होतं. तासभर रडून ती शांत झाली.

घराबाहेरच्या पपईच्या झाडाखाली मी दुपारीच खड्डा खणून ठेवला होता. आम्ही मांजराला त्या खड्ड्यात पुरलं. त्या गोष्टीला आता सात दिवस झाले. बायको रोज शाळेत जाताना झाडाखाली जास्वंदीचं फूल ठेवून जाते. इतके दिवस पपईच्या झाडाला पपया येत नव्हत्या. मांजराला झाडाखाली पुरलं आणि त्या झाडाला आता पपया आल्यात. त्या गोड लागतील का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT