God esakal
सप्तरंग

३३ कोटी देव कोणते?

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)



हिंदू धर्मात ‘३३ कोटी’ देवांचा वारंवार उल्लेख होत असतो. मात्र याबद्दल अनेकांना खरे काय ते माहिती नसते, तर काही जणांना प्रचंड कुतूहल असते. बऱ्याच जणांना हे देव कोणते याचा प्रश्न पडतो. आपण आज आध्यात्मिक दृष्टिकोनातून या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत.


प्रश्न : तेहेतीस कोटी देव कोणते?

उत्तर : बहुतेक लोकांना ‘तेहेतीस कोटि’चा अर्थ ‘तेहेतीस करोड’ असाच वाटत असतो.
पण, येथे कोटि शब्दाच्या ‘टि’ला पहिली वेलांटी आहे.
मुळात संस्कृतमधील ‘कोटि’ या शब्दाचा अर्थ करोड नसून ‘प्रकार’ असा आहे. ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपविले आहेत. त्यांच्यात,
८ वसू, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत. प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.

अष्टवसूंची नावे :

आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास.

अकरा रुद्रांची नावे :

मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.

बारा आदित्यांची नावे :

अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरुण, वैवस्वत व विष्णू.

१ इंद्र आणि १ प्रजापती

असे एकंदर
८+११+१२+१+१ = ३३...

लेखक - पं. नरेंद्र धारणे, ज्योतिषशास्त्र अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

SCROLL FOR NEXT