satyanarayan esakal
सप्तरंग

श्री सत्यनारायण कथेचे आरोग्यदायी, सांस्कृतिक महत्त्व

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)

श्री सत्यनारायण कथा स्वदेहाचा आध्यात्मिक संबंध दाखवणारी आहे. आता नावापासून सुरवात करू. सत्य+नर+आयन. चांगल्या गोष्टी+मानव+त्याचा जीवनकाळ. मनुष्य चांगल्या विचारांनी वागला तर त्याचे जीवन उज्ज्वल होते, म्हणून तो सत्यनारायण. आपण आज श्री सत्यनारायणाची कथा आधुनिक काळातही आरोग्यदायी, वैद्यकीय सांस्कृतिकदृष्ट्या कशी महत्त्वाची आहे हे जाणून घेणार आहोत.

नारद सत्य लोकात आले. म्हणजे तिन्ही लोकांत फिरणारे मन शरीरात उतरले. तेथे दु:ख, रोग, चिंता दिसल्या. एखादी गोष्ट दिसण्यासाठी आकलन होण्यासाठी त्या गोष्टीवर तुमचे मन एकाग्र असावे लागते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे. एखादी गोष्ट समजली नाही तर आपण पटकन म्हणतो, अरे मन थाऱ्यावर नव्हते. भौतिक विचार हृदयातून येतात. तेथे चांगले-वाईट दोन्ही आहे.

विष्णू आध्यात्मिक, तर लक्ष्मी (पैसा) भौतिकतेचे प्रतीक आहे. याच्याकडे मन आल्यावर दु:खाचा पाढा वाचते. त्यावर उपाय मागते. तेव्हा विष्णू (अध्यात्म) स्वत:ची पूजा करायला सांगतात.

वैज्ञानिकदृष्ट्या राग, लोभ, मत्सर निर्माण होताच मानवी मन अस्थिर होते. त्याचा परिणाम म्हणून टेन्शन, हाय बीपी, लो बीपी, शुगर, हृयविकार असे अनेक रोग उत्पन्न होऊन सुवर्ण मोहोरांचाही (शारीरिक धन- health is wealth) पालापाचोळा होतो. साधूवाणी आपण सगळेच आहोत. काहीतरी साधण्यासाठी या शरीररूपी नौकेने रत्नपुरात जाऊन व्यापार करतो. मग ते शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकून धन कमावतो.

इथला राजा चंद्रकेतू. चंद्रमा मनसोजात: असे म्हणतात. मन चंचल व केतू वायुरूप ज्याची संगत तसा वागणारा. काही साधण्यासाठी सद्‌विचार पाठी नसतील तर चंद्रकेतू त्याचे धन (शरीरक्षमता) चोरले म्हणून काही विचार न करता व्याधी उत्पन्न करतो. वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आजारपणाच्या कैदेत टाकतो. मग लीलावती (धन, पैसा, संपत्ती खर्च होते) व कलावती (मानसिक मनोबल यांचे खच्चीकरण होते) यांच्याकडे चोरी होऊन त्या भीक मागत फिरतात म्हणजेच बिकट परिस्थिती ओढवते.

अस्थिमज्जेची मोळी वाहणारे आम्ही मोळीविके. त्रासांच्या उन्हात तहानेने व्याकूळ होऊन ब्राह्मण सात्त्विक हृदयी येतो (शांत एकांतात मनन केल्याने सदसद्‌विकाने मनाला उभारी मिळते). तेथे सत्कर्माची पूजा पाहून चांगल्या आचारविचारांचा प्रसाद घेऊन, सत्विचारांनी वागण्याचा निश्चय करतो. तेव्हा ही मोळी दुप्पट भावाने विकली जाते. बुद्धी+शक्ती सत् प्रवृत्त झाली की चंद्रकेतू जावयासह साधूवाण्याला मुक्त करतो व दुप्पट धन देऊन सन्मान करतो. पैसा आला, ताकद आली की अहंकर येतोच. हे मी केले, मी मिळविले सत्याचा यात (देवाचा) कोणता भाग आला.

असा मुजोरपणा आला की बुद्धिवादी विचारांनी सात्त्विकता, सत्य आणि नम्रता यांची अवहेलना झाल्याने त्याच्या शापाने विविध समस्या उत्पन्न होतात. शरीररूपी नौकेतले धन नष्ट होते. मग विवेक (बुद्धी व ध्येयवाद याचा जावई) आठवण करून देतो व नौका तरते. मानव पुन्हा माया व शक्तीचे द्वारी पोचला की कलावती (शक्ती) सद्‌विचार सोडते. विवेक नष्ट होतो व साऱ्यांना पश्चात्ताप करावा लागतो. हे झाले चार अध्याय.

पाचवा अंगीरसराजाचा. अंगी+रस म्हणजे रक्त ते प्रसन्न हृदयात शिकारीसाठी गेल्यास चांगल्या विचारांचा अवमान होतो. कलुषित विचारांनी त्याचे पुत्र- प्लेटलेट्स, लाल पेशी, हिमोग्लोबिन अशुद्ध होतात, मरतात.

जर सद्‌विचार पुन्हा भिनले, रक्त शुद्ध झाले, मानव आनंदाने जगू लागतो. तेव्हा आक्षेप घेणाऱ्यांना ठामपणे सांगा ही भाकड कथा नाही. प्रयोगाने सिद्ध करायचे असेल तर चांगले संगीत, विचार ऐकताना काढलेला ईसीजी व धुमाकूळ, मोठ्या अवाजातील पाश्‍चात्त्य संगीत ऐकतानाचा हृदय आलेख काढून बघा. सत्यनारायण काय ते लगेच लक्षात आले असेलच.

त्यामुळे हिंदू समाजातील बंधू, माताभगिनी स्वयंघोषित इतिहास,

धर्म, अनादिकालापासून चालत आलेली परंपरा, धर्म संस्कृती जतन करावी ...ओम विष्णवे नमः।

- नरेंद्र धारणे, ज्योतिषशास्त्र अभ्यासक

https://dai.ly/x83f6ul

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती! सोलापूरच्या ‘आयटी पार्क’ची जागा कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या ३० वर्षांच्या धोरणात अडकली; अभियंत्यांच्या निशिबी प्रतीक्षा

आजचे राशिभविष्य - 09 जून 2026

तिखट-चटपटीत मसाले आणि वितळलेलं चीज; हा 'बेल पेपर टोस्ट' सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठरतो परफेक्ट स्नॅक

SCROLL FOR NEXT