platform drama artist navrang sanskrutik kala manch aparna gosavi  Sakal
सप्तरंग

नाट्यकलावंतांसाठी अविरत कार्यरत

अपर्णा गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली २००१ मध्ये नव्या शतकात नवरंग सांस्कृतिक कला मंचची स्थापना केली.

सकाळ वृत्तसेवा

‘नाट्यपंढरी’ सांगलीत नाट्यपरंपरा पुढे नेण्यासाठी अनेक संस्थांचे योगदान आहे. त्यात नवरंग सांस्कृतिक कला मंचने विविध सांस्कृतिक उपक्रमांद्वारे सातत्य राखले आहे. २००१ मध्ये नाट्य, नृत्य, गायन क्षेत्रांतील समविचारी कलाकारांनी एकत्र येत संस्थेची स्थापना केली. सौ. अपर्णा गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कामास प्रारंभ झाला.

संस्थेचे मूळ उद्दिष्टच मुळी नवीन कलाकारांना प्रशिक्षित करणे, त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे होते. त्यातून नाट्यक्षेत्रात नवे लेखक, तंत्रज्ञ, अभिनेते तयार व्हावेत, या उद्देशाने संस्थेने अनेक उपक्रम राबवले आहेत.

- सचिन पारेख, दिग्दर्शक

सांगलीतील नृत्य, नाट्य, गायन क्षेत्रातील समविचारी कलाकारांनी अपर्णा गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली २००१ मध्ये नव्या शतकात नवरंग सांस्कृतिक कला मंचची स्थापना केली. नवे कलाकार घडवणे, त्यांना मार्गदर्शन करणे, हा उद्देश होता.

नवे तंत्रज्ञ, लेखक तयार करणे यासाठीचे उपक्रम सुरू झाले. गेली २३ वर्षे ‘नवरंग’ संस्था कार्यरत आहे. राज्य नाट्य स्पर्धांसह अनेक नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, दीर्घांक स्पर्धांमधून भाग घेत पारितोषिके मिळवली.

राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीत सांघिक क्रमांक मिळवणारी ‘नवरंग’ ही सांगलीची पहिली संस्था ठरली. सलग तीन रौप्य पदके मिळवणाऱ्या अपर्णा गोसावी पहिल्या कलाकार ठरल्या. संगीतामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे अमोल गोसावी हेही पहिलेच पार्श्वसंगीतकार आहेत.

संस्थेचे उपाध्यक्ष सचिन पारेख यांना तर सलग पाचवेळा प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेत दिग्दर्शनाची बक्षिसे मिळाली आहेत. ज्येष्ठ समीक्षक दिवंगत कमलाकर नाडकर्णी संस्थेच्या ‘व्हाईट लायर्स’ नाटकाचे नेपथ्य आणि सादरीकरण मुंबईकरांनाही लाजवेल, असे असल्याचा अभिप्राय आमच्यासाठी पारितोषिकच आहे.

मुंबई नाट्य परिषदेचे रमेश चौधरी स्मृती पारितोषिक, सांगली शाखेचे अरुण नाईक स्मृती पारितोषिक पारेख यांना मिळाले. सांगलीतील ९२ व्या नाट्य संमेलनातदेखील संस्थेने सक्रिय सहभाग घेताना व्हाईट लायर्स हे नाटक सादर करण्याची संधी मिळाली. या संमेलनात संस्थेच्या कलाकारांनी ‘पठ्ठे बापूराव-पवळा’ हे वगनाट्यही सादर केले होते.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यश मिळवत प्रसन्न जी. कुलकर्णी लिखित ‘व्हाईट लायर्स’ने पन्नासाव्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसरा क्रमांक मिळवला. अपर्णा गोसावी, सचिन पारेख, ऋषिकेश शेलार यांच्या भूमिका होत्या.

या नाटकाला प्राथमिक फेरीत दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक मिळाले होते. स्त्री अभिनय रौप्य, पुरुष अभिनय प्रमाणपत्र मिळवले. अंतिम फेरीत नाटकाला व दिग्दर्शनाला द्वितीय क्रमांक मिळवला.

या नाटकातील ऋषिकेश आता विविध टीव्ही मालिकांमध्ये काम करतोय. एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द घडतेय. याशिवाय संस्थेने आजवर राज्य नाट्य स्पर्धेत ‘कांचनमृग’,‘ देख कबिरा रोया’, ‘हर्षदेव कथा’, ‘घर दोघांचं’, ‘वांझ’, ‘अजूनही उजाडत नाही’, ‘मारिचिका’, ‘प्रायव्हेट इयर’, ‘पब्लिक आय’, ‘बेबी’,

‘एक्झीट’, ‘कुत्रे’, ‘पुस्तकाच्या पानातून’, ‘खिडक्या’ आदी नाटके राज्य नाट्य स्पर्धेत सादर केली. याशिवाय विविध स्पर्धांसाठी ‘धांडोळा’, ‘प्लँचेट’, ‘शहामृगी’, ‘वांझ’, ‘वनबाईट ऑफ पिझ्‍झा’, ‘त्रिकोणाच्या मध्यावर’, ‘अजूनही उजाडत नाही’, ‘घनदाटल्या आभाळी’, ‘गिऱ्हाईक’, ‘वन सेकंड लाईफ’, ‘वन स्टेप अहेड’ आदी सादर केल्या.

‘गर्जा महाराष्ट्र माझा’, ‘भूपाळी-ते-भैरवी’ अशी संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचे दर्शन घडविणारा हा नृत्य आणि नाट्य या दोहोंचा सुंदर संगम साधणारा हा दोन तासांचा कार्यक्रम राज्यभर सादर केला. अनेक संस्थांच्या चॅरिटीसाठी त्यांचे प्रयोग केले. यातून अनेक कलाकार घडले. अनेकांना उपजीविकेचे साधन मिळाले.

संस्थेने खेड्यापाड्यांत बालनाट्य शिबिरे घेतली. त्यांच्याकडून बालनाट्य बसवून घेतली गेली. ती स्पर्धांमधून सादरही झाली. या मुलांना नाट्य क्षेत्रात वावरताना काय काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत, पोषाख कोणता असावा इथंपर्यंत सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिलं गेलं.

हे प्रशिक्षण सौ. अपर्णा गोसावी आणि सचिन पारेख यांनी दिले. याच नवरंग संस्थेतर्फे गरजू कलाकारांसाठी नृत्य व नाट्य कार्यक्रमांसाठी लागणारी ड्रेपरी मोफत पुरवणारी ‘नूपुर नाट्य संसार’ ही संस्था चालविली जाते. नाट्यविषयक उपक्रमांशी जोडून घेत संस्था आजही निरंतरपणे कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT