Praful Wankhede writes share market Exam restraint in investing sakal
सप्तरंग

गुंतवणुकीत परीक्षा संयमाची

गोष्ट पैशापाण्याची; अंडी देणाऱ्या कोंबडीची ही गोष्ट गुंतवणूक करताना संयमाची, कष्ट करण्याची प्रेरणा देईल...

प्रफुल्ल वानखेडे

अंडी देणाऱ्या कोंबडीला पोसावे लागते. तिची काळजी घ्यावी लागते. तिला जगवावे लागते. गरज आहे म्हणून कुठलाही विचार न करता ती कोंबडी कापायची नसते. अंडी देणाऱ्या कोंबडीची ही गोष्ट गुंतवणूक करताना संयमाची, कष्ट करण्याची प्रेरणा देईल...

आपल्या घरी कोंबडी पाळली तर काही पर्याय ठरलेले असतात. पहिला रविवार आला की लगेच ती कोंबडी कापून खायची, मस्त पार्टी करायची. दुसरा पर्याय- त्या कोंबडीला जपायचे, मग ती रोज अंडे देईल, ते सुखसमाधानाने आपण आपल्या कुटुंबासह खायचे. तिसरा पर्याय- त्या कोंबडीकडे लक्ष नसल्याने अथवा शेजारचे / वांड पोरं आपला घात करून गुपचूप ती कोंबडी एखाद दिवशी फस्त करून टाकतात. मग बसा ‘आम्हाला फसवले’ म्हणून बोंबलत. चौथा - कोंबडी मारून गाडीखाली टाकायची. मग गाडीवाल्याला ब्लॅकमेल करून चार कोंबड्यांचे पैसे आणि आपणच मारलेली, पण कोंबडी लुटायची (पण हा असला काही सज्जनांचा पर्याय नाही.) आता अजून एक वेगळा पाचवा पर्याय असतो. ती पाळलेली कोंबडी, तसेच तिने दिलेली अंडीही खायची नाहीत, कितीही इच्छा झाली तरी. त्या कोंबडीची सर्व पंधरा-वीस अंडी जमा करायची. पुढे कोंबडी खुराड्यात बसवायची, तिची पूर्ण काळजी घ्यायची. कोंबडी २१ दिवस मग ती अंडी उबवत बसणार. तोपर्यंत आपण, संपूर्ण कुटुंब वाट पाहत बसणार.

पुढे एक दिवस अंड्यातून लहान लहान पिल्लांचा आवाज व त्यांच्या चिवचिवाटाने घर भरणार. पुढे त्या पिल्लांचे, कोंबडीचे मांजर, कुत्री, इतर पक्षी/जनावरे (खवीस शेजारी) यांच्यापासून रक्षण करायचे. पुढे तीन-चार महिन्यांत आपल्याकडे १५-२० कोंबड्या. त्यांची अंडीच अंडी. दोन-तीन वर्ष हेच चक्र रिपीट. आता पुढे ही सायकल किती, कशी वाढू द्यायची याचा सर्वस्वी निर्णयही आपलाच. मग कितीही अंडी घरी खा किंवा विका. यातून पैसेही हमखास मिळणारच!

आपली शेती किंवा नोकरी-धंदा बाजूला सुरूच असतो. त्यामुळे हे उत्पन्न तसे अतिरिक्तच. आता हे जे कोंबडी कापून न खाण्याचे मन मारणे, सुरुवातीला अंडीही न खाणे, ते २१ दिवस वाट पाहणे, (थोडक्यात या सर्व प्रोसेसचा अभ्यास आणि कष्टही) पुढे या कोंबडीच्या पिल्लांचे रक्षण करून मोठे करणे याला जो संयम लागतो, धीर आणि एकाग्रता लागते, अगदी तशीच पैशांची गुंतवणूक करताना लागते.

गुंतवणूक करताना सतत बचत करण्याची तयारी, मनावर चांगला ताबा, दूरगामी विचार करून वाट पाहण्याची तयारी आणि दूरदृष्टीने विचारपूर्वक कष्ट घेतले तरच यश मिळते. यात स्वत:ला ज्ञान असणे गरजेचे आहे, नाहीतर आजूबाजूलाच तुमच्याच कोंबड्या चोरून, फसवून, आमिष देऊन, पोपटपंछी फंडे देऊन स्वत:च गटवतील असे लोक आहेतच. (अशा भामट्या, फसवणाऱ्या सुशिक्षित टोळभैरवांपासून तुम्हाला वाचायचेय, स्वसंरक्षण करायचेय.) यासाठी वारेन बफेट यांनी फार सुंदर वाक्य सांगितलेय ‘Never ask the barber whether you need a haircut.’ त्यामुळे इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून न राहता, ज्या क्षेत्रात आपल्याला गुंतवणूक करायची आहे, त्याचा अभ्यास करा आणि योग्य व्यक्तीचाच सल्ला घ्या. मार्गदर्शक चांगला असणे महत्त्वाचेच.

तुमच्याकडे हा संयम, ताबा, शिकण्याची, कष्टाची आणि वाट पाहण्याची तयारी यापैकी काहीच नसेल तर - सरळ पर्याय नंबर एक. अगदी रविवारचीही वाट न पाहता कोंबडी खसकावून मोकळे व्हा. उगीच नको तो गुंतवणुकीचा अन् अर्थसाक्षरतेचा त्रास!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT