Claverness Sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : हुशारी आणि कमाई

माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. प्रचंड हुशार. अतिउच्चशिक्षित. मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला. लाखोंचं पॅकेज. दृष्ट लागावी इतकी श्रीमंती.

प्रसाद शिरगावकर

माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे. प्रचंड हुशार. अतिउच्चशिक्षित. मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला. लाखोंचं पॅकेज. दृष्ट लागावी इतकी श्रीमंती. सारी स्वतःच्या कष्टानं कमावलेली. माझ्या ओळखीची दुसरी एक व्यक्ती आहे. तीही अफाट हुशार. पण शिक्षणात सगळीकडेच टक्का हुकलेली, उच्चशिक्षित वगैरे नाही, पण बेसिक पदवी वगैरे पूर्ण केलेली. स्वतःचा व्यवसाय करणारी. व्यवसायातले अनेक चढ-उतार झेलून, गटांगळ्या खाऊन आता तरलेली. पोटापाण्यापुरतं कमावणारी, जे कमावतेय ते अर्थातच स्वतःच्या कष्टानं कमावणारी. आपल्या व्यवसायात मात्र चांगलं नाव कमावून असलेली.

पहिल्या व्यक्तीकडं कुटुंब, नातेवाईक, मित्र ह्यांच्यासाठी अजिबात वेळ नसतो. ती सतत खूप म्हणजे खूपच बिझी असते. त्या व्यक्तीनं वेळ दिला आणि ती बोललीच, तर त्या वेळात तिचं पद, प्रतिष्ठा, पैसा, यश ह्यांचा अत्यंत उग्र दर्प येत असतो. दुसरी व्यक्तीही खूप बिझी असते. पण कुटुंब, नातेवाईक, मित्र ह्यांच्यापैकी कोणीही फोन केला, तर तिला बोलायला वेळ असतो. किंवा तेव्हा बोलणं शक्य नसल्यास तसं सांगून ती नंतर फोन करून बोलते किंवा भेटते. कुटुंब, नातेवाईक, मित्र ह्यांच्यासाठी वेळ काढते. त्यांच्याबरोबर मनमुराद टाइमपासही करते. अन् हे करताना कुठेच आपला व्यवसाय, त्यातलं यश, आपला पैसा, अचिव्हमेंट्स वगैरे आणत नाही.

खरं सांगायचं तर, ह्या दोन्ही व्यक्ती खऱ्या व्यक्तींवर आधारित काल्पनिक व्यक्ती आहेत! तुमच्याही ओळखीच्या अशा अनेक व्यक्ती असतील. आपल्याला हेही माहीत आहे की, उच्चशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी करणारी प्रत्येकच व्यक्ती या उदाहरणातल्या पहिल्या व्यक्तीसारखंच वागते, असं नाही. अन् ठीकठाक शिकलेली, व्यवसाय करणारी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखीच असेल असं नाही. इथं अतिउच्चशिक्षित अन् ठीकठाक शिकलेला यांच्यात किंवा नोकरदार वि व्यावसायिक यांच्यातही भेद मांडायचा नाहीये. नोकरदार व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी असू शकते आणि व्यावसायिक व्यक्ती पहिल्यासारखी. सांगायचा मुद्दा असाय, की करिअर, पैसा आणि नाती यांचं सगळ्यांचं निश्चित स्थान आहे आयुष्यात. तो बॅलन्स कोणीही साधू शकते किंवा हरवू शकते.

तर, पुन्हा आपण उदाहरणातल्या दोन प्रत्यक्षातल्यासारख्या काल्पनिक व्यक्तींकडं येऊ. हुषारी, पैसा, यश दोन्ही व्यक्तींकडं आहे. एकमेकांपेक्षा थोडंफार कमी जास्त असेल, पण आहे. हे दोघंही हुशार आहेत, यशस्वी आहेत, बऱ्यापैकी कमावतही आहेत. आपल्याला ‘किती’ कमवायचंय हे पहिल्याला माहीत आहे अन् आपल्याला ‘काय’ कमवायचंय हे दुसऱ्याला!! करिअर अन् पैशांच्या मागं धावताना ‘किती’ कमवायचंय याला अंत नसतो, मात्र ‘काय’ कमवायचंय ह्याची स्पष्टता असणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही क्षेत्रा जा, काहीही काम करा, मात्र ‘किती’ कमावताय ह्या सोबतच, ‘काय’ कमावताय ह्याकडं नक्की लक्ष द्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake reasons: महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 29 भूकंप! काय आहेत कारणं? मुंबईला धोका आहे का? तज्ज्ञ काय सांगताएत?

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

SCROLL FOR NEXT