Doctor and Engineer Sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : डॉक्टर होणार की इंजिनिअर?

‘काय मग, डॉक्टर व्हायचं ठरवलं आहेस का इंजिनिअर?’’ मी दहावीत असताना हुशार वाटणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीला हा प्रश्न विचारला जायचा.

प्रसाद शिरगावकर

‘काय मग, डॉक्टर व्हायचं ठरवलं आहेस का इंजिनिअर?’’ मी दहावीत असताना हुशार वाटणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीला हा प्रश्न विचारला जायचा. हुशार असणाऱ्या, म्हणजे परीक्षांमध्ये चांगले मार्क्स पाडणाऱ्या मुलामुलींनी डॉक्टर किंवा इंजिनिअरच झालं पाहिजे, अशी तेव्हाची एक प्रथा होती. त्यासाठी दहावीला चांगले मार्क्स पाडून चांगल्या कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन घेणे आणि मग दोन वर्षे घास घास घासून बारावीला खूप चांगले मार्क्स पाडून मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळवणे हे तेव्हा करिअरमधलं सर्वोच्च यश मानलं जायचं. त्यातही बी. जे. मेडिकल किंवा ‘सीओईपी’सारख्या सरकारी कॉलेजेसमध्ये मेडिकल/ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला तर यशाचं शिखर. बारावी नंतर आयआयटीला प्रवेश मिळाला, तर मग यशाचं एव्हरेस्टच. 

हे सारं तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या शिक्षणाच्या मर्यादित संधी उपलब्ध असलेल्या काळात घडायचं.  उच्च शिक्षणाच्या अन् त्यातून पुढं तयार होणाऱ्या यशस्वी करिअरच्या अत्यंत मर्यादित संधी असलेल्या काळात, त्या हस्तगत करण्यासाठी उर फुटोस्तोवर धावणारे, जर त्या हाती लाभल्या नाहीत तर नैराश्यग्रस्त आयुष्यही जगायचे.  गेल्या तीस वर्षांत जगात आमूलाग्र बदल झालेत. दहावी-बारावी नंतरच्या शिक्षणाच्या अन् त्यावर आधारित करिअर्सच्या अमर्याद संधी आज उपलब्ध आहेत. आज एखाद्या डॉक्टरसारखीच यशस्वी प्रॅक्टिस एखादा आर्किटेक्ट करू शकतो, एखाद्या इंजिनिअर सारखाच सणसणीत पगार सीए किंवा एमबीए मिळवू शकतो किंवा कला शाखेला जाऊन भाषा शिकलेली कोणी भाषा शिकवण्याचे कोचिंग क्लासेस काढून सुपर सक्सेसफुल होऊ शकते.  नोकरी-व्यवसाय-धंदा हे काहीही करून यशस्वी होण्यासाठी अन् भरपूर पैसा-प्रसिद्धी कमावण्यासाठी तुम्ही दहावीनंतर सायन्सलाच गेलं पाहिजे अन् पुढं डॉक्टर किंवा इंजिनिअरच झालं पाहिजे ही अट आता खरंतर राहिलेली नाही. आज कोणीही अक्षरशः बार टेंडर, शेफ, म्युझिशिअन किंवा ब्युटिशियन होऊनही अत्यंत यशस्वी करिअर करू शकतो/शकते! 

मात्र आज ज्यांची मुलं दहावी-बारावीत आहेत असे बहुसंख्य पालक आपल्या मुला-मुलींचं भविष्य अजूनही स्वतःच्या दहावी-बारावीच्या वेळच्या काळावर ठरवताना दिसतात! शिक्षण आणि करिअरमध्ये फक्त डॉक्टर-इंजिनिअर बनणं हे सर्वोच्च राहिलं नसून, इतर असंख्य क्षेत्रांमध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत हे अनेकांच्या गावीही नसतं.  आपल्याला जे करायचं होतं, पण जमलं नाही ते आपल्या पाल्यानं करावं म्हणून त्यांना सतराशे साठ कोचिंग क्लासेसना घालून आपण काय साध्य करतो आहोत? जी रेस धावणं आपल्याला जमलं नाही तिच्यासाठी आपल्या पाल्याला आपण छाती फुटेस्तोवर धावायला लावतो आहोत का? आपल्या चिमुरड्यांना नक्की काय हवं आहे? नक्की काय त्यांच्या भल्याचं आहे विचार पालक म्हणून आपण करतो का? 

प्रश्न असंख्य आहेत. पालक म्हणून ते आपण स्वतःला विचारायचे आहेत!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT