Tiranga Sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : नवं स्वातंत्र्ययुद्ध

देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन नुकताच झाला. आपल्या सगळ्यांच्या देशप्रेमाच्या उधाणाचे वर्षात जे दोन दिवस असतात, त्यातला एक पार पडला!

प्रसाद शिरगावकर

देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन नुकताच झाला. आपल्या सगळ्यांच्या देशप्रेमाच्या उधाणाचे वर्षात जे दोन दिवस असतात, त्यातला एक पार पडला! खरंतर देशप्रेम ही खूप सुंदर भावना आहे. तिरंगा बघताना, राष्ट्रगीत म्हणताना, देशाचा जयघोष करताना छान वाटतं आपल्या सगळ्यांनाच. पण आपण, ‘आपलं आपल्या देशावर प्रेम आहे,’ म्हणजे नेमकं काय याचा विचार करतो का?

देश म्हणजे जमीन किंवा भूभाग म्हटल्यास देशप्रेम म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते अरुणाचलप्रदेश अशा सर्व भूभागावर प्रेम असायला हवं. इथले नद्या, नाले, डोंगर, पर्वत, वाळवंट, शेतजमिनी शहरं, गावं सारं सारं आवडायला हवं. सारं ‘आपलं’ वाटायला हवं. ते आपलं आहे, त्यावर प्रेम आहे म्हणून ते सारं टिकवायचा, समृद्ध करायचा प्रयत्न करायला हवा. आणि, देश म्हणजे ठराविक भूभागात राहणारी माणसं म्हटल्यास देशप्रेम म्हणजे सर्व भूभागात राहाणाऱ्या ‘सगळ्यांविषयी’ प्रेम असायला हवं. जात-धर्म-भाषा-प्रांत-लिंग-सामाजिक स्थिती ह्या साऱ्यांपलीकडं जाऊन इथल्या प्रत्येकाला आपला देशबांधव मानता यायला हवं. आपल्याला जे हक्क आणि अधिकार आहेत, तेच प्रत्येकाला आहेत याची जाणीव असायला हवी. आणि आपल्या सगळ्यांचंच आयुष्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

देश म्हणजे आपला भवताल, त्यातला निसर्ग आणि तिथली माणसं. देशप्रेम म्हणजे ह्या साऱ्यावरचं प्रेम. ही इतकी साधी सोपी व्याख्या आपण आपल्यापुरती करू शकू का? अन् ती अमलात आणू शकू का? किमान आपल्यापुरती?

गंमत अशी, आपल्याला देशावर प्रेम करायला शिकवत नाहीत, तर आपल्याला देशाचा ‘अभिमान’ बाळगायला शिकवतात. आपल्या इतिहासाचा अभिमान, आपल्या संस्कृतीचा अभिमान, आपल्या भाषेचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा अभिमान. ज्या कशात आपलं स्वतःचं काडीचंही कर्तृत्व नाही त्याचे अभिमान बाळगण्याचं बाळकडू आपल्याला पाजलं जातात. अन पुढं आयुष्यभर ह्या अभिमानापाठोपाठ अस्मिता, अहंता अन् श्रेष्ठत्वाचे डोस आपल्याला दिले जातात. पण हे काही खरं नसतंय गड्यांनो. या डोसांनी माणूस आणि देशही घडत नसतो. त्यातून फक्त द्वेष आणि विध्वंस जन्म घेतो.

माणूस आणि देशही घडवायचा असल्यास अभिमान नाही, तर प्रेम शिकायला आणि शिकवायला हवं. आपल्या भवतालावर आणि त्यातल्या सर्व माणसांवर विनाकारण, निस्सीम प्रेम करता यायला हवंय. हे कसं करायचं हे शिकायची सुरुवात आपण स्वतःपासून करूया आणि ते शिकवायची सुरुवात आपल्या मुलांपासून. आपल्याला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचंच तर ते अभिमान, अस्मिता, अहंता आणि श्रेष्ठत्वाच्या पाशांपासून मिळवायचं आहे. अन् हे स्वातंत्र्ययुद्ध आपल्याला अजून लढायचं आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT