Olympics Sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : ऑलिंपिक्स अन् तुम्ही-आम्ही

ऑलिंपिक्स संपलं. आपण सात मेडल्स घेऊन जगात ४८व्या क्रमांकावर आलो. ज्यांनी मेडल्स जिंकली त्यांचं कौतुक अन् अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे.

प्रसाद शिरगावकर

ऑलिंपिक्स संपलं. आपण सात मेडल्स घेऊन जगात ४८व्या क्रमांकावर आलो. ज्यांनी मेडल्स जिंकली त्यांचं कौतुक अन् अभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे. आणि अर्थातच, जगातला दुसरा सगळ्यांत मोठा अन् पाचवा सगळ्यांत श्रीमंत देश असूनही खेळात ४८वा का, हा प्रश्नही दर चार वर्षांनी विचारला जातोच! प्रश्न नेहमीचेच आहेत, उत्तरंही आपल्याला माहीतच आहेत, पण एक उजळणी करूनच टाकू या!

नैसर्गिक गुणवत्तेचा शोध

प्रत्येक खेळासाठी नैसर्गिक गुणवत्ता आणि कौशल्य असलेले खेळाडू आधी शोधावे अन् निवडावे लागतात. जे निवडले जातील त्यांना सातत्यानं दर्जेदार प्रशिक्षण द्यावं लागतं. वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायला पाठवावं लागतं. या सगळ्यांसाठी मोठा खर्च करावा लागतो. याशिवाय, त्यांच्या पोटापाण्याचीही काहीतरी व्यवस्था व्यवस्था करावी लागते. या सगळ्यांमधून जे तावूनसुलाखून निघतात, टिकतात अन् आपल्या खेळाचा दर्जा सतत उंचावत राहतात असे काही खेळाडू जागतिक पातळीवर इतर दोनेकशे देशांच्या अशा खेळाडूंशी स्पर्धा करून जगभरात पहिल्या तिनांत येतील अशी आपण आशा करू शकतो. अमेरिका आणि चीन हे जगातले पहिल्या दोन क्रमांकाचे श्रीमंत देश आहेत. शिवाय,  सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले पहिल्या तिनातले दोन देश आहेत. खेळांसाठी लागणारे शोध-निवड-प्रशिक्षण आणि सततच्या स्पर्धा त्यांच्यासाठीचे रिसोर्सेस या दोन्ही देशांकडं आहेत अन् ते कसे वापरावे याचं टेक्निक त्यांना जमलंय. अर्थातच, ऑलिम्पिक्सच्या पदकांच्या यादीत या दोन देशांमध्ये पहिल्या दोन स्थानांसाठी सतत चुरस असते.

गणित खर्चाचं आणि तयारीचं

यात एक गंमत म्हणजे, अमेरिकेतल्या खेळाडूंसाठी तेथील सरकार काहीही लक्षणीय खर्च करत नाही! खेळाडूंच्या विकासासाठी अन् तयारीसाठी आधी त्यांचे पालक खर्च करतात. जिथं गरज असेल तिथं त्या त्या खेळांच्या असोसिएशन्स खर्च करतात किंवा प्रायोजक शोधून फंड्स उभे केले जातात. पदक विजेत्यांना सरकारी बक्षिसं दिली जात नाहीत आणि खेळाडूंना सरकारी नोकऱ्याही दिल्या जात नाहीत. जे खेळाडू तयार होतात ते स्वयंप्रेरणेनं, स्वतःच्या खर्चानं किंवा असोसिएशन पातळीवर फंड्स उभे करून. म्हणजे, अमेरिकेच्या ऑलिंपिक्समधल्या यशासाठी तिथला खेळांवर प्रेम करणारा, आपल्या मुलांना खेळांमध्ये प्रावीण्य येण्यासाठी झटणारा आणि त्यासाठी खर्च करणारा मध्यमवर्ग जबाबदार आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय मध्यमवर्गही आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक समृद्ध होऊ लागला आहे. मात्र, खेळांच्या बाबतीत अजूनही आपण उदासीन आहोत. आपण आवडीनं खेळ बघतो, पण त्यात आपल्या मुलांनी करिअर करावं, असं काही आपल्याला वाटत नाही. दर चार वर्षांनी ऑलिंपिक्समधली आपली रँक बघून हळहळ करणं किंवा चेष्टा करणं या पलीकडं आपण सगळे त्यावर काहीच वेगळं करत नाही. आपण सगळे, म्हणजे तुमच्या माझ्यासारखा भारताचा मध्यमवर्गीय माणूस, त्यासाठी काही तळमळीनं करत नाही तोवर या परिस्थितीत काहीही बदल होणार नाही....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT