New year Celebration sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : आपण ‘नववर्ष’ प्रेमी...

आपणा भारतीयांची एक गंमत अशीये की, एका कॅलेंडर वर्षांत किमान आठ-दहा वेळा आपण ‘नववर्ष दिन’ साजरे करतो! उद्या आपल्यातले अनेक जण ‘थर्टी फस्ट’ करून परवा येणारं इंग्रजी नववर्ष साजरं करतील.

प्रसाद शिरगावकर

आपणा भारतीयांची एक गंमत अशीये की, एका कॅलेंडर वर्षांत किमान आठ-दहा वेळा आपण ‘नववर्ष दिन’ साजरे करतो! उद्या आपल्यातले अनेक जण ‘थर्टी फस्ट’ करून परवा येणारं इंग्रजी नववर्ष साजरं करतील.

आपणा  भारतीयांची एक गंमत अशीये की, एका कॅलेंडर वर्षांत किमान आठ-दहा वेळा आपण ‘नववर्ष दिन’ साजरे करतो! उद्या आपल्यातले अनेक जण ‘थर्टी फस्ट’ करून परवा येणारं इंग्रजी नववर्ष साजरं करतील. मग तीनच महिन्यांनी मराठी लोक उत्साहानं ‘गुढी पाडवा’ साजरा करतील. त्याच दिवशी तेलगू आणि कानडी लोक ‘उगडी’ साजरा करतील. मग त्याच्या पुढच्या महिन्यात पंजाब आणि बहुसंख्य उत्तर भारतात ‘बैसाखी’ हा नववर्ष दिवस साजरा होईल. गंमत म्हणजे, तोच दिवस बंगाल आणि पूर्व भारतात ‘बोहेला बौशाख’ नावानी साजरा होईल, तर तमिळनाडूत ‘पुथंडू’ म्हणून. पुढे दिवाळीत आपले गुजराथी-मारवाडी बांधव बलिप्रतिपदेला ‘विक्रम संवत’चा नववर्ष दिवस साजरा करतील.

गुढी पाडवा, उगडी, बैसाखी, पुथंडू, बलिप्रतिपदा हे सगळे ‘हिंदू नववर्ष दिवस’ आपण साजरे करतो. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या हिंदू परंपरांमधले हे नववर्ष दिवस, हे सगळेच आपण आपापल्या प्रदेशांमध्ये साजरे करतो. झालंच  तर आपण पारशांचा ‘नवरोझ'' आणि इस्लामी ‘मोहरम’ हे बहुसंख्येनं अथवा लौकिकार्थानं ‘साजरे’ करत नाही, पण त्या दिवशी बॅंका बंद ठेवतो आणि ख्रिश्चनांच्या ‘थर्टी फस्ट डिसेंबर’ला सुट्टी घेत नाही पण तो जोरदार साजरा करतो!

गंमत म्हणजे, आपण फक्त एकच ‘नववर्ष दिन’ साजरा करत नाही. किंबहुना, तो कधी येतो कधी जातो तेही आपल्याला माहीत नसतं. तो म्हणजे भारताचं अधिकृत राष्ट्रीय कॅलेंडरनुसार असलेला ‘भारतीय सौर वर्षाचा’ पहिला दिवस. दरवर्षी एकवीस मार्चला तो असतो, पण तो आपल्या खिजगणतीतही नसतो! आपण भारतीय सौर वर्ष स्वीकारून ६० हून जास्त वर्षं झालीयेत, ह्या साठेक वर्षांत ‘आकाशवाणी’ सोडलं तर इतर कुठेही कोणीही हे कॅलेंडर वापरताना दिसत नाही, अन् आपण त्याचा नववर्ष दिन साजराही करत नाही!

खरंतर, सध्याच्या या २४x७x३६५ ऑनलाइन असलेल्या, अनेक संस्कृतींची सरमिसळ झालेल्या आणि ग्लोबली कनेक्टेड असलेल्या जगात कोणती कॅलेंडरं पाळायची हा एक मोठा प्रश्नच आहे. शिवाय, ‘पृथ्वीने सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करणे’ ह्या घटनेमध्ये खूप काही सेलिब्रेट करण्यासारखं असतं का, हा एक तात्त्विक प्रश्न आहेच. सगळ्यांत मोठी गंमत अशी की, पृथ्वीची प्रदक्षिणा कोणत्याही एका दिवसापासून सुरु होऊन बरोबर एका वर्षानं संपते, त्यामुळं प्रत्येक दिवस हा नववर्ष दिन मानता येऊ शकतोच! म्हणूनच, येणारा प्रत्येकच दिवस पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेची सुरुवात म्हणून साजरा करता यायला हवा. प्रत्येकच दिवस हा नव्या वर्षाची, नव्या सृजनाची, नव्या निर्मितीची सुरुवात असू शकतो असं बघता यायला हवं.

असं सृजन अन् त्यातून मिळणारा आनंद आपल्याला प्रत्येक दिवशी मिळो अशी मनोमन सदिच्छा व्यक्त करून ‘गप्पा पोष्टी’ ह्या सदराचं शेवटचं पुष्प अर्पण करतो.

(समाप्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT