Money
Money Sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : माणसं महत्त्वाची का पैसा?

प्रसाद शिरगावकर

आज पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये एक दृश्य बघितलं. एका ऐंशीएक वर्षांच्या गावाकडच्या म्हातारीच्या ऑपरेशननंतर, तिला गावी घेऊन जायला चार ट्रॅक्स आणि सुमो वगैरे भरून माणसं आली होती.

प्रसंग १ : आज पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये एक दृश्य बघितलं. एका ऐंशीएक वर्षांच्या गावाकडच्या म्हातारीच्या ऑपरेशननंतर, तिला गावी घेऊन जायला चार ट्रॅक्स आणि सुमो वगैरे भरून माणसं आली होती. गाड्या भाड्याच्या आणि माणसं मळक्या कपड्यातली होती (म्हणजे ही कोणी गावाकडची श्रीमंत मंडळी दिसत तरी नव्हती). सगळे एकमेकांना सावरत, ‘चल गं म्हातारे’, ‘बस तायडे’, ‘चला दाजी’ वगैरे म्हणत होते. मात्र, त्यातला एक माणूस डोक्याला हात लावून बसला होता. आणि आजूबाजूची दोनचार माणसं त्याला, ‘ह्ये विकता यील का. त्ये गहान ठ्येवता यील काय’ असे ‘पैसे उभे करण्याचे’ सल्ले देत होती. अन् म्हातारीच्या ‘वॉप्रेशनचे पैशे आपल्याला द्येता येत नायत,’ म्हणून तो बिचारा भीषण गिल्टमध्ये बसून राहिला होता.

प्रसंग २ : माझ्या मागील एका अमेरिका प्रवासात तीनेक आठवडे बॉस्टनमध्ये राहिलो होतो. बॉस्टनमधल्या माझ्या तात्पुरत्या घराजवळ एक वृद्धाश्रम होता. रोज ट्रेन स्टेशनहून बाहेर पडून घरी जाताना तो वृद्धाश्रम दिसायचा. त्या वृद्धाश्रमाच्या बाहेर व्हीलचेअरवर किंवा बाकड्यांवर बसलेली गलितगात्र, एकाकी अन् खिन्न म्हातारी माणसं दिसायची. तिथल्या समाजव्यवस्थेनुसार कुटुंबच नसलेली किंवा कुटुंबापासून दुरावलेली माणसं. ज्यांची वाट बघावं असं कोणीच नाही किंवा वाट बघूनही कोणी जिवलग येण्याची खात्री नाही अशी माणसं. अमेरिकेतली ही रुढार्थानं श्रीमंत असून आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत भीषण एकाकीपणा भोगत असलेली ही माणसं बघून उगाचच खिन्न वाटायचं मला.

अर्थात, हे दोन प्रसंग प्रत्यक्ष बघितले म्हणून इथे लिहिले. हे देश, माणसं, गरीबी-श्रीमंती ह्यांचं हे सरसकटीकरण नाही. तसं सरकटीकरण करण्यात काही अर्थ नसतो, कारण अमेरिकेतही ‘मेडिकल इन्शुरन्स’ किंवा पुरेसे पैसे नसल्याने उपचार मिळू न शकणारे लोक असतात अन् भारतातही वृद्धापकाळात एकाकी आयुष्य जगणारे लोक असतात. प्रमाण कमी-जास्त असेल, पण सर्व प्रकारच्या समाजव्यवस्था अन् त्यातील माणसांच्या अवस्था जगातल्या सर्वच देशांमध्ये दिसतात. वरच्या दोन प्रसंगांच्या बाबतीत विचार करता, जगात कुठेही गेलो तरी, आयुष्याच्या शेवटी, गाठीला अफाट पैसा आहे पण सोबतीला एकही माणूस नाही असं ‘दारिद्र्य’ असणारेही लोक असतात. किंवा सोबतीला खूप माणसं आहेत पण औषधोपराचाला मात्र पैसा नाही हा ‘एकाकीपणा’ असणारेही असतात.

यापैकी कोणतीही एक वेळ कोणावरही येऊ नये असं मनापासून वाटतं. आयुष्यात माणसं जोडणंही महत्त्वाचं असतं अन् पैसा कमावणंही. कोणा एकाच्या हव्यासापायी दुसऱ्याचा ध्यास सोडायचा नसतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT