सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : आपला कप!

‘कुठाय आपला कप?’ सकाळी चहा पीत असताना कानावर बायकोचा टोकदार उपहासात्मक प्रश्न येऊन आदळला अन् मी दचकलो.

प्रसाद शिरगावकर

‘कुठाय आपला कप?’ सकाळी चहा पीत असताना कानावर बायकोचा टोकदार उपहासात्मक प्रश्न येऊन आदळला अन् मी दचकलो. एक तर सकाळी सकाळी ‘आहो-जाहो’ असा आदरार्थी संवाद सुरू झाला की छातीत धडकी भरते! त्यात मी चहाच पीत असताना ‘कप कुठाय?’ विचारणं हे डेंजरस काही घडणार, असं सूचित करतं! मी हातातला कप बघितला, असाच कोणता कप माझ्या हातून कधी फुटला होता का, हे आठवून बघितलं किंवा हा कपचा सेट आत्ता वापरायचा नाही असं काही तिनं सांगितलं होतं का, हेही आठवून बघितलं. काहीच सुचेना तेव्हा मी हातातला कप तिला दाखवून, ‘हा काय कप,’ असं म्हटलं. तर म्हणाली, ‘हा नाही रे, ‘आपला’ म्हणजे आपली टीम आणणार होती तो कप, वर्ल्ड कप.’ पहिल्या प्रश्नातलं ‘आपला’ हे आदरार्थी नसून बहुवचनी होतं हे लक्षात आल्यानं जीव भांड्यात पडणारच होता इतक्यात, ‘आणला कप? की आले दिवे लावून तिकडेच?’ हा पुढचा प्रश्न आला!

ह्या प्रश्नातला ‘दिवे लावून’ या की-वर्डवर दिलेला भर ऐकून, हे सगळे प्रश्न वर्ल्ड कप जिंकू न शकलेल्या टीमसाठी नसून, ‘अत्यंत महत्त्वाच्या मॅचेस आहेत,’ असं सांगून दिवाळीची साफसफाई करणं, दिवे लावणं इत्यादी तयारीसाठी टाळाटाळ करणाऱ्या माझ्यासाठी होते, हे माझ्या लक्षात आलं! हे असे गुगली टाकण्यात बायकोचा हातखंडा असतो. आपण लेगस्पिन होईल म्हणून स्वीप मारायला जावं अन् बॉल सरळ येऊन आपला मिडल स्टंप उडावा, हे नेहमीच होतं!

‘म्हणजे ते जिंकू शकले असते, पण ते जरा, आय मीन, सेमी फायनलला पोचले नाहीत, नाहीतर जिंकलेच असते.’ मी गुगली हळूच तटवायचा प्रयत्न केला. ‘आणि सेमी फायनलला का पोचले नाहीत म्हणे?’ हा पुढचा कॅरमबॉल आला! आता याला काय उत्तर देणार? आपली टीम जिंकावी म्हणून प्रयत्नांची शर्थ केली होती मी! आपल्या सर्व आपल्या मॅचेस टॉसपासून ते शेवटच्या ‘बॉइज प्लेड वेल’पर्यंत देहभान विसरून बघितल्या होत्या. त्या बघताना, मागचा कप आपण जिंकलो तेव्हा मी घातलेला ‘लकी’ टी-शर्ट अंगात ओढून ताणून घालून बसलो होतो. ज्यांनी मॅच बघितली की आपण हमखास हरतो, अशा मित्रांना फोन करून ‘मॅच बघितलीस तर याद राख,’ अशी धमकी देऊन झाली होती. हे इतकं सगळं करूनही, ‘अमुक टीमनं तमुक टीमला ढमूक रन्सनं हरवलं तरच आपण सेमी फायनलला जाऊ शकतो,’ अशी अनेकदा होणारी दयनीय अवस्था आपली झाली होती. काय सांगणार हे सगळं तिला?

माझी केविलवाणी अवस्था बघून बायकोलाच दया आली असावी. ‘आता पुढच्या ‘महत्त्वाच्या मॅचेस’ सुरू होण्याच्या आधी घरात लावलेले दिवाळीचे दिवे आवरणं जमेल का?’ असा एक सरपटी बॉल टाकून तिनं तिची ओव्हर संपवली अन् मी होकारार्थी मान डोलवत माझ्या हातातला रिकामा कप किचनमध्ये विसळायला घेऊन गेलो!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT