Life Sakal
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : आयुष्यातले कप्पे

दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात आयुष्यात, कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा. कामाच्या कप्प्यात ऑफिस, करिअर, सहकारी, कॉम्पिटीशन असं काय काय असतं.

प्रसाद शिरगावकर

दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात आयुष्यात, कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा. कामाच्या कप्प्यात ऑफिस, करिअर, सहकारी, कॉम्पिटीशन असं काय काय असतं. कुटुंबाच्या कप्प्यात आपला जोडीदार, मुलंबाळं, आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, घरदार, गाड्या-घोडे वगैरे असतं. जगण्यासाठी  दोन्ही कप्पे महत्त्वाचे असतात. कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळतं. कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो. एका  कप्प्यात जे मिळतं त्यामुळे दुसऱ्या कप्प्यात जगता येतं.

यातला  कामाचा कप्पा हा आपल्याला अजिबात न आवडणारा कप्पा.  इथं कष्ट असतात, नियम असतात, भीषण स्पर्धा असते, करत असलेल्या कामाचं कोणाला कौतुक नसतं, आपल्या लायकीपेक्षा आणि कष्टांच्या मानानं खूप कमी मोबदला आपल्याला मिळत असतो.  म्हणजे, हे सगळं असं असतंच असं नाही. पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं!

कुटुंबाचा  कप्पा तसा आपल्याला आवडतो.  पण त्यातही डोक्याला शॉट्स असतात! पार्टनरशी भांडणं होत असतात. मुलं ऐकत नसतात. आई-वडील हट्टी बनत जातात. नातेवाईक तऱ्हेवाईकपणा करत असतात. मित्र झंगड असतात. एक ना अनेक भानगडी असतात याही कप्प्यात! म्हणजे हे सगळं असं असतंच असं नाही. पण हे असं आहे असं आपल्याला सतत वाटत असतं!

म्हणून ना, एक तिसरा कप्पाही असावा आयुष्यात... आपला स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा! पहिल्या दोन कप्प्यांमधून उद्वेगानं बाहेर पडावंसं वाटलं किंवा हे कप्पे अफाट बोअर झाले, तर या तिसऱ्या, स्वतःच्या, कप्प्यात शिरता यायची सोय करून ठेवायला हवी. या तिसऱ्या कप्प्यात काहीही किरकोळ, फुटकळ गोष्टी आपल्या आवडीनं जमा करून ठेवाव्यात. आपल्या निरागस लहानपणीचा एखादा निरागस छंद, उधाणलेल्या तारुण्यातली एखादी अफलातून पॅशन, आपण स्वप्नाळू हृदयानी बघितलेली छोटी छोटी स्वप्नं. आपल्या आवडीचे कपडे, मनापासून आवडणारे पदार्थ किंवा निवांत झोप. काहीही म्हणजे काहीही असावं ह्या कप्प्यात! ह्या कप्प्यात काय ठेवावं याला काही नियम नाहीत, काही मर्यादाही नाहीत.

आपल्याला जेव्हा कधी इच्छा होईल तेव्हा या तिसऱ्या कप्प्यात जाऊन जगता यायला हवं. तशी स्वतःला आणि इतर दोन कप्प्यांना सवय लावता यायला हवी. मग पहिल्या दोन्ही कप्प्यांचा जाच होत नाही आणि त्यांच्यातही आनंदानं जगता येतं. आणि मग असंही होतं की, हा तिसरा, स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा करून जगणं जमायला लागलं की, कधीतरी पहिले दोन कप्पे आपसूकपणे या तिसऱ्या कप्प्यात सामावले जातात.

हे होणं, हे जमणं, हा खरा योग. हा खरा मोक्ष!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor Praises Modi : काँग्रेसवरील नाराजीच्या चर्चांमध्ये शशी थरूर यांनी केलं मोदींचं पुन्हा कौतुक!

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

SCROLL FOR NEXT