marathi sahitya sammelan nashik sakal
सप्तरंग

प्रसाद शिरगावकर

पुढील वर्षीच्या संमेलनांपासून सरकारकडून एकही रुपया अनुदान न घेता साहित्य संमेलनं आयोजित करायला हवीत.

प्रसाद शिरगावकर

मराठी साहित्य संमेलनाबद्दल तीन मुद्दे मांडावेसे वाटतात...

पहिला मुद्दा

पुढील वर्षीच्या संमेलनांपासून सरकारकडून एकही रुपया अनुदान न घेता साहित्य संमेलनं आयोजित करायला हवीत. सरकार आणि सत्ताधारी राजकीय पक्ष यांचं कोणतंही दडपण न घेता संमेलन करायचं असेल, संमेलनाच्या आयोजनातून राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप पूर्णपणे बंद करायचा असल्याच हाच मार्ग आहे. तीन-चार दिवस चालणारे संगीत-महोत्सव सरकारी अनुदानाशिवाय, पूर्णपणे खासगी अथवा संघटनात्मक प्रयत्नांमधून होऊ शकतात, तर साहित्य महोत्सवही होऊ शकतील. साहित्यप्रेमींचं संमेलन भरवण्यासाठी आवश्यक पैसे साहित्य व्यवहारातूनच उभे राहायला हवेत अन् त्यामधून संमेलनं भरायला हवीत.

दुसरा मुद्दा

१२ कोटींच्या महाराष्ट्रात वर्षातून एकदाच एकच महासंमेलन भरवण्याऐवजी, प्रत्येक जिल्ह्यात संमेलनं भरवावीत. तीही सरकारच्या एकाही रुपयाशिवाय भरवलेली. राज्यभराच्या लेखक-वाचक-प्रकाशक सगळ्यांसाठीच हे करणं गरजेचं आहे. असं केल्यास संमेलनांमध्ये ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना सहभागी होता येईल. राज्यभरातल्या सगळ्या प्रकाशकांना मार्केट मिळेल, सगळ्या लेखकांना वाचक मिळतील. मराठी साहित्य सर्व मराठी बांधवांपर्यंत पोचवायचं असल्यास हे करायला हवं.

तिसरा मुद्दा

मराठी साहित्य आणि साहित्य व्यवहार अद्ययावत आणि तंत्रज्ञान-स्नेही करायला हवं. ई-बुक्स-ऑडियोबुक्सपासून ब्लॉग्ज आणि वेबसीरीजपर्यंतच्या सर्व नव्या माध्यमांमध्ये मराठी साहित्य आणायला हवं. नव्या माध्यमांसाठी नव्या युगाचं, नव्या पिढीला आपलंसं वाटेल असं साहित्य तयार करायला हवं. अभिव्यक्तीची आणि व्यवहाराची नवी माध्यमं शोधायला हवीत. नव्या डिजिटल जगातही मराठी रिलेव्हंट ठेवायची असल्यास हे करायला हवं.

एकुणात, बदलत्या काळाबरोबर साहित्य प्रसार आणि व्यवहाराची माध्यमंही बदलायला हवीत. त्यांच्यामध्ये इनोव्हेशन व्हायला हवं. किमान जगात जे इनोव्हेशन झालेलं आहे ते आपल्या भाषेतल्या साहित्य व्यवहारासाठी आत्मसात करायला हवं. आणि नव्या युगातल्या, नव्या माध्यमांमध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यासाठी नव्या प्रकारची संमेलनं भरवायला हवीत. एकविसाव्या शतकातल्या साहित्यासाठी एकोणीसाव्या शतकाच्या पद्धतीची संमेलनं भरवण्यात काय अर्थय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT