स्वातंत्र्याला जपा! sakal
सप्तरंग

मनमोराचा पिसारा : स्वातंत्र्याला जपा!

जगाच्या वन साम्राज्यात, शांतवनाच्या गुप्तहेर खात्याचा फार गवगवा होता.

सकाळ वृत्तसेवा

-गोविंद गोडबोले

शांतवनाच्या गुप्तहेर खात्याला मोठाच धक्का बसला होता. शत्रुपक्षाच्या गुप्तहेरांना महाराजांनी घेतलेले निर्णय कळतात कसे, हेच कळत नव्हतं. असं होणं फार धोक्याचं होतं. शांतवनाचं स्वातंत्र्य असं धोक्यात येऊन चालणार नव्हतं. गुप्तहेर खात्याची नाचक्की होईल ती वेगळीच. जगाच्या वन साम्राज्यात, शांतवनाच्या गुप्तहेर खात्याचा फार गवगवा होता. शांतवनाच्या सिंह महाराजांना फार अभिमान होता या गोष्टीचा. त्या अभिमानाला सुरुंग लागला होता. शांतवनाच्या गुप्त बैठकीत घेतलेले निर्णय शत्रुपक्षाच्या ढमढम वनाच्या राजा क्रूरसिंहाला अगोदरच कळायला लागले होते.

सिंह महाराज आणि गुप्तहेर गब्बू यांनी गुप्त संशोधनाला सुरुवात केली. गुप्त बैठकीच्या हॉलमधील सर्व वस्तू पाहून झाल्या. भिंतीवर लावलेलं घड्याळ तेवढं राहिलं होतं. त्यात काही असण्याची शक्यता पण नव्हती. कारण नुकताच सिंह महाराजांचा वाढदिवस साजरा झाला होता. राजाच्या विश्वासू भोळ्या नोकराने, ‘डुडू’ने हे अत्यंत साधं घड्याळ राजाला भेट दिलं होतं. सिंह महाराजांनी अत्यंत आदरपूर्वक ते या हॉलमध्ये लावलं होतं. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरजच नव्हती.

तिकडे क्रूरसिंहाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. शांतवनातील सगळे निर्णय त्याला आधीच कळत. हे कोडं गुप्तहेर गब्बूला अजून का उलगडलं नाही, हा शांतवन गुप्तहेर खात्याचा चिंतेचा विषय होता. पण आठच दिवसांनी गब्बूने ‘डुडू’ला हेरगिरीबद्दल अटक करून राजापुढे उभं केलं. महाराज खूप संतापले होते; पण गब्बूने त्यांना शांत केलं. तो म्हणाला की, ‘डुडूची यात चूक एकच, ती म्हणजे त्याचा भोळेपणा! महाराज, मी फार बारकाईने तपास केला. आपण जे घड्याळ दुर्लक्षित केलं होतं, त्यातच कॅमेरा आणि ध्वनिमुद्रण यंत्र बसवलं होतं. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतवनातील सामान्य प्राणी आपल्या नजरेसमोर असावा, म्हणून डुडूने दिलेलं घड्याळ आपण गुप्त निर्णय हॉलमध्ये लावलं. पण हेच धोकादायक ठरलं.

ढमढमवनातील एक रंगीत पक्षी अलीकडे डुडूकडे सारखा येत होता. ही बातमी मला कळाली. माझे गुप्तहेर त्याचा पाठपुरावा करू लागले. तेव्हा मिळालेली माहिती अशी की, त्या पक्ष्याने डुडूची राजाभक्ती हेरली. महाराजांना भेट देण्यासाठी केवळ पाच रुपयांत हे घड्याळ त्याने डुडूला दिले, ज्यात ढमढम गुप्तहेरांनी गुप्त यंत्रणा बसवली होती. भोळा डुडू आनंदला, आणि राज्यावर संकट आले.’ शांतवनाने कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य जागरूक राहून सर्वांनी टिकवले पाहिजे, असं सांगून डुडूची राहण्याची सोय त्यांनी राजमहालात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT