Kanubai  esakal
सप्तरंग

खानदेशची नवलाख मालन 'कानबाई'

सकाळ वृत्त सेवा

खानदेशात गावोगावी कानबाईचा उत्सव होतो. नंदुरबार जिल्ह्यात रुणमळी, साक्री तालुक्यात कासारे, तसेच चाळीसगावजवळ उंबरखेडे येथे कानबाईचे मंदिर आहे. कानबाईचे खानदेशशी नाते सांगणारी अनेक गीते आहेत. रविवारी (ता. १५) कानबाईची स्थापना होत आहे. त्यानिमित्त...

कानबाई ही खानदेशची प्रमुख ग्रामदेवता आहे किंबहुना कानबाईचा देश म्हणून खानदेश ओळखला जातो. आता तर वीर सावरकरांच्या मतानुसार कानबाईचा देश म्हणून खानदेशला ‘कान्हदेश’ म्हणावे हा मतप्रवाह लोकप्रिय होतो आहे.

खानदेशात गावोगाव कानबाईची पूजा होते. नंदुरबार जिल्ह्यात रुणमळी, साक्री तालुक्यात कासारे, तसेच चाळीसगावजवळ उंबरखेडे येथे कानबाईचे मंदिर आहे. कानबाईचे खानदेशशी नाते सांगणारी अनेक गीते आहेत.

कोणता देशनी आयी व माता

खानदेशनी आयी व माता

खानदेशन माहेर उनी व साजनी

एवढीशी कानबाई, लाडनी व माय लाडनी

कानबाई उनी पाव्हनीन, आर्धा याय पासूनी

रथमा बसनी वजटीक घालुनी

खानदेशी संस्कृतीतल्या सर्व दागिन्यांचा उल्लेख करून शेवटची ओळ पुन्हा पुन्हा म्हटली जाते. उदा. नथ, कुंडल, सरी, ठुशी, वजटीक, गरसोयी, चितांग, पुतळ्या, एकदाणी, तोडा, वाकया, साखया, भुगड्या, पाटल्या, मुंदी, बांगड्या इत्यादी. खानदेशच्या रिद्धिसिद्धी असणाऱ्या तापी व गिरणा या दोन नद्यांचा उल्लेख असा ः

तापी गिरनाना मेय व माय, तापी गिरनाना मेय

तठे काय सोनाना पिपय व माय सोनाना पिपय

त्यानी सावली शीतय व माय त्यानी सावली शीतय

गाडी कोन्या देशले धाडी व माय

गाडी कानबाईनी खानदेशले धाडी व माय

वाटवर गाव यान्या चुनगजी भीती

खानदेशातल्या ग्रामीण भागाचे वर्णन :

कानबाई कान्हेर तठे नांदती

गाव उंबरखेडले कानबाई बठनी

चहू मुलूखले आवाई उठनी

बामन मंतर बोलती

कानबाई खाले लगीन लावती

कानबाई खाले लगीन म्हणजे सर्व जातींचे सामूहिक विवाह चैत्र-वैशाखातल्या कानबाईसमोर होतात. कानबाईने खानदेशला त्या काळापासूनच प्रगत सुधारक संस्कृतीचे वरदान दिले. ही खानदेशची शान आहे.

कानबाईच्या मंदिरांचा उल्लेख आला आहे तो असा :

गाव कसार-राज काठवर

तापी गोमी ना मेय शहादा प्रकाशले

रुणमयीले उभ्या दानू कानू

उंबरखेड यिन नारय परनी आनू

खानदेशचा उल्लेख असलेले प्रसिद्ध गेय गीत :

आवतीभवती फुलझाडी

तठे मन्ही मालन फुले तोडी

खुयखुय नदीनं झुयझुय पानी

तठीन घागर भरी आनी

मन्ही मालन बोले अमृतवानी

सुखी राहो तुन्हा घरधनी

आदिशक्ती की आदिमाया

खानदेशनी माती कस्तुरी लया

आदिशक्ती की आदिमाया

खानदेशमा घरोघर बठन्या कानबाया

कानबाई खाले लगीन म्हणजे सर्व जातींचे सामूहिक विवाह चैत्र-वैशाखातल्या कानबाईसमोर होतात. कानबाईने खानदेशला त्या काळापासूनच प्रगत सुधारक संस्कृतीचे वरदान दिले. ही खानदेशची शान आहे.

खानदेशचा उल्लेख असलेली काही गीते :

एवढीसी कानबाई लाडनी माय लाडनी

आंगवर फडकी फुलनी माय गजरानी

चाल चाले मोरनी माय मोरनी

गिरना मोसमनं भरे पानी माय पानी

बोली बोले गुजराथनी गाय खानदेशनी

पूजा करे कान्हेरनी माय कान्हेरनी

वरील गीतात बागलाणमधल्या मोसम नदीचा उल्लेख आहे. बागलाणातही श्रद्धेने कानबाईचा उत्सव केला जातो.

पेलाड पैलाड मालपूर कसार व माय

फिरी उनू चारी मेर व माय

हाका मारे कोन व माय

हाका मारे कान्हेर हरी व माय

धुळे जिल्ह्यात मालपूर व कासारे आहे. नदीच्या अल्याडपल्याड खानदेश कानबाईचे माहेर आहे. माहेरचे वैभव असे :

मन्हा माहेरन्या काय काय रीती

केशर कस्तुरीन्या सारवल्या भीती

खानदेश पाहुणचाराचा उल्लेख असा :

कानबाईनी रानबाईले बलावा जेवाले

खीर नी खापरनी पुरणपोयी खावाले

रशीभात माय तोंडे लावाले

बोंडे पापड कुरडया सांजोऱ्या तोंडे लावाले

सप्तश्रृंग निवासीनी देवी सप्तश्रृंगी.

खालील गीतात वणीच्या गडावरच्या देवीचा उल्लेख आहे :

खानदेशनी माय तू नामपुरले वनी व माय

सावंतास्ना वाडाले तू वनी व माय

चाली गयी तु सत्तरशिंगीना गड व माय

परसुराम भाऊनी भेट लिनी व माय

- प्रा. डॉ. उषा सावंत, अहिराणी स्त्रीगीतांच्या अभ्यासक

https://dai.ly/x83f6ul

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eid-e-Milad 2026: ईद-ए-मिलादनिमित्त 26 ऑगस्टला बँका बंद की सुरू? महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये काय स्थिती? पाहा

Mumbai News: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

Marathi News Live Updates : रायफल-शूटिंग प्रशिक्षक शेख सादिक खान याला अटक

Mumbai Local: ट्रेसपासिंग रोखण्यासाठी हॉर्नचा 'अलर्ट', संवेदनशील ठिकाणी मोटरमनला वारंवार सूचना; वेळापत्रकावर परिणाम

SCROLL FOR NEXT