सप्तरंग

तर्क आणि न्याय

आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम.

या सदरात आत्तापर्यंत आपण आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धिप्रामाण्यवादाबद्दल खूप चर्चा केली. महत्त्वाच्या विषयावर आपलं मत प्रत्यक्षात कसं तयार होतं, विविध पूर्वग्रह आपल्या मनात कसे घर करून बसलेले असतात, आपल्या निर्णयप्रक्रियेवर कसा हस्तक्षेप करतात आणि हे सगळं आपल्या नकळत कसं होत असतं वगैरे. 

‘आम आदमी’ (तुमच्या माझ्यासारखे अपवाद सोडून बरंका!) ‘लॉजिकल’ कमी आणि ‘सायकॉ-लॉजिकल’ निर्णय जास्त घेतात हे पटण्यासारखं आहे; पण तोच माणूस विशिष्ट पदावर पोचला, की आपोआप ‘लॉजिकल’ होतो, असंदेखील आपल्याला वाटतं.

आपल्या रोजच्या व्यवसायात आपण फार अवघड निर्णय घेत नाही, ते घ्यावेत अशी आपल्याकडून अपेक्षा ही केली जात नाही... पण काही लोकांना जवळजवळ रोजच असे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, न्यायाधीश.

मिडल क्लास मराठी माणूस या मंडळींना सहसा जुन्या बॉलिवूडच्या सिनेमातच भेटलेला असतो. केस पुढं ढकलताना किंवा हिरोच्या डायलॉगबाजीवर भावनाविवश होताना...यांनी मीडियासमोर यायचं नाही असा शिष्टाचार असल्यामुळं आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काहीच माहीत नसतं; पण तरीही त्यांच्या प्रामाणिकपणावर बराचसा आणि बुद्धिप्रामाण्यवादावर आपला पूर्ण विश्वास असतो; पण आधी, आपण मागं बघितलेल्या पुष्टीकरण पूर्वग्रह, तेजोमंडल पूर्वग्रह, उपलब्धता पूर्वग्रह वगैर गोष्टींचा यांच्या निर्णयक्षमतेवर काही परिणाम होतो का नाही हे बघूया. 

अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या जोनाथन लेवाव या शास्त्रज्ञांच्या टीमनं हजाराहून अधिक इस्रायली न्यायाधीशांच्या निर्णयांचा अभ्यास केला. समोर उभ्या असलेल्या कैद्याला पॅरोल द्यावा का नाही हा निर्णय घेत असताना न्यायाधीश अर्थात आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा पूर्ण वापर करत असतील असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. कारण एका माणसाचं, त्याच्या कुटुंबाचं आयुष्य, त्यांची स्वप्नं वगैरे सगळं या निर्णयावर अवलंबून असतं. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोर्टाचं काम सकाळी लवकर सुरू होऊन काही वेळानं एक नाश्त्याचा ब्रेक, मग उशिराचा लंच, आणि शेवटी संध्याकाळपर्यंत तिसरे सत्र असा दिवस विभागलेला असतो. स्वाभाविक आहे, की पॅरोल द्यायचा की नाही या निर्णयाचा आणि खाण्याच्या वेळांचा काहीही संबंध नसायला हवा. मात्र, या १११२ निर्णयांचा अभ्यास केल्यावर एक स्पष्ट पॅटर्न दिसून आला. तुमची सुनावणी दिवसाच्या सुरवातीला झाली, तर पॅरोल मिळायची शक्यता जास्त होती! कुठल्याही खाण्याच्या ब्रेकनंतर झाली तर पॅरोल मिळायची शक्यता दुप्पट होती! 

अर्थात, यावर अजून संशोधन चालू आहे. ब्रेकमध्ये न्यायाधीशांनी काय खाल्लं, किती खाल्लं, खाल्लं का नाही वगैरे बाबी शास्त्रज्ञांना माहीत नव्हत्या; पण सामान्य माणसासारखाच, (इस्रायली) न्यायदेवतेचा बुद्धिप्रामाण्यवाद ठिसूळ असू शकतो (असतोच!) एवढं मात्र सिद्ध झालं.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिस कामचुकार, पण न्यायपालिका मात्र इमानदार. त्यातल्या त्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयं तर खूपच भारी, असं आपण का गृहीत धरतो? प्रत्येक संस्थेची संस्कृती वेगळी असते आणि ही संस्कृती त्या संस्थेत काम करणाऱ्यांचं वागणं ठरवते. याचा अर्थ वेगवेगळ्या संस्थेत काम करणारी व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची- इकडं चांगले लोक तर तिकडं वाईट लोक असतात, असं नाही. माणूस माणूस असतो. चांगलं किंवा वाईट (सामान्य व्यवहाराशी संबंधित) वागण्याची क्षमता कमी अधिक फरकानं सगळ्यांमध्ये सारखी असते. अर्थात, याला काही अपवाद असतात. ‘Psychopath’ लोक असतात; पण ते सहसा आपल्या कृत्यांमुळं जेलमध्ये असतात. हे टोकाचे लोक सोडल्यास आपण बाकी सगळे- बहुतांश पोलिस, बहुतांश न्यायाधीश आणि बहुतांश सामान्य माणूस- यांच्या चांगुलपणामध्ये किंवा बुद्धिप्रामाण्यवाद यांत फारसा फरक नसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT