interview
interview 
सप्तरंग

ये मुलाकात...

आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम.

जॉब इंटरव्ह्यू हा प्रकार फारसा माझ्या वाटेला आलेला नाही. इंटरव्ह्यू दिलेही कमी आणि घेतले तर त्याहून कमी. सामान्यतः सगळ्यांना इंटरव्ह्यू देताना टेन्शन येतं आणि घेताना मजा येते. माझं मात्र अगदी उलटं आहे. सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे असावं, नसेल तर ते वेधून घ्यावं हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा गुणधर्म असल्यामुळे हे साहजिक आहे. आपण किती हुशार आहोत हे दाखवायचा चान्स मिळणार म्हणून मला इंटरव्ह्यू देणं खूप आवडतं. खरंतर माझं सगळंच वागणं या एका प्रेरणेतून येतं. हे सदरसुद्धा त्याच इंधनावर चालू आहे. तुम्हाला काय वाटलं, माझ्याकडच्या ज्ञानाचा समाजाला फायदा व्हावा म्हणून मी अभ्यास करून हे लिहितोय? छे छे! हे वाचून तुम्ही माझी वाहवा करावी, माझ्यावर प्रेम करावं, मी ‘थोर’ आहे असं म्हणावं म्हणून हा सगळा खटाटोप. मी अस्तिक आणि त्यातल्या त्यात कॅथलिक असतोस तर या कन्फेशनबद्दल स्वर्गातलं स्थान पक्कं झालं असतं. 

एखाद्याचा इंटरव्ह्यू घेताना मात्र मलाच टेन्शन येतं. समोर बसलेल्या हाडामासाच्या व्यक्तीचं मूल्यमापन मी करायचं? इथं स्व समजायला अर्ध आयुष्य उलटलं. चाळिसाव्या वर्षीसुद्धा मी स्वतः स्वतःला आश्चर्यचकित करण्याचं सामर्थ्य ठेवतो. मग या अर्ध्या तासाच्या भेटीत समोरच्याच्या आकांक्षा, अपेक्षा स्वप्न, तिची क्षमता, प्रतिभा, होतकरूपणा, बुद्धी, कष्ट करण्याची तयारी वगैरे मला कसं समजणार? बरं या व्यक्तीला हो म्हणायचं म्हणजेच शंभर इतरांना ‘नाही’ म्हणायचं! एक वेळ हो म्हणणं सोपं; पण त्या सगळ्या बिचाऱ्यांचं काय? 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एक यशस्वी माणूस मला म्हणाला, ‘‘मी पुस्तकं वाचत नाही; पण मी माणसं वाचतो,’’ हे ऐकून मी माझ्या टी-शर्टची वरची दोन बटणेसुद्धा लावून घेतली. हा माणसं वाचतो!? असंख्य स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी कसं वाटत असेल, याची झलक मला मिळाली. 

फेस रीडिंग वगैरे थोतांड प्रकारावर (हाताऐवजी तोंड बघून भविष्य सांगणे वगैरे) आता फार कोणी विश्वास ठेवत नाही; पण जॉब इंटरव्ह्यूची ही तोंडी परीक्षा घेऊन तुमचं भविष्य ठरवणारे मॅनेजर/ बॉस/ मालक /एचआर टीम ही मंडळी आहेत! 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मालक किंवा मालकाचा माणूस (एचआरमध्ये बाई माणूस जास्त असतात) : तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा! 

मी : असामी असामी असामी असामी जसामी तसा मी, असामी असामी. 

मालक : आजपासून पाच वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे पाहता? 

मी : तुमच्या जागी. इतरांना हाच प्रश्न विचारताना... 

मालक : तुमच्यातला सगळ्यात मोठा दोष कुठला आहे? 

मी : गरीब/ बेताच्या कुटुंबात जन्माला आलो हा सगळ्यात मोठा दोष. म्हणून तर तुमच्यासारख्यांसमोर कृत्रिम स्मितहास्याचं प्रदर्शन भरवावं लागतंय. बॅटमॅनचा प्रतिपक्षी जोकर या पात्राने आयुष्यर जॉब इंटरव्ह्यू देऊन देऊनच चेहऱ्याचा असा अवतार करून घेतला असावा. 

आपल्याला माणसं कळतात, समजतात, आणि १५ मिनिटांत आपण त्यांचं विश्लेषण करू शकतो; शितावरून भाताची परीक्षा वगैरे म्हणणारे लोक भेटल्यावर त्यांचा हेवा वाटतो; पण मग मागच्या सदरातील तो पूर्वग्रह आठवतो. कुठल्याही घोळक्यात - तुम्ही सरासरीपेक्षा चांगले वाहन चालक आहात का; याचं उत्तर ९०-९५ टक्के लोक ‘हो’ म्हणून देतात. तसंच, एखाद्या नवीन व्यक्तीला भेटला, की तुम्ही ‘वो कितने पानी मे है’ हे लगेच ओळखू शकता का? या प्रश्नाचं उत्तरसुद्धा ९० टक्के लोक हो म्हणूनच देतील. तुम्ही आसपास विचारून बघा. कारण उत्क्रांतीमध्ये, अनोळखी व्यक्ती बघितल्या बघितल्या, ती शत्रू की मित्र, धोका की फायदा हे झटक्यात ओळखणं महत्त्वाचं होतं. आपला मेंदू तसाच घडला आहे; पण आज मात्र ही प्रक्रिया आपल्याला बऱ्याच वेळा फसवते. नाव (म्हणजे धर्म, जात), पत्ता (शहरी, ग्रामीण, विदेशी), शैक्षणिक संस्था, चेहरा, शारीरिक ठेवण (पुन्हा धर्म, जात, आर्थिक - सामाजिक स्थान), या गोष्टी आपोआप त्या उमेदवाराबद्दलचं आपलं मत बनवतात, इंटरव्ह्यूचा पहिला प्रश्न विचारायच्या आधीच! पुष्टीकरण पूर्वग्रह, तेजोमंडल इफेक्ट, fundamental attribution error इत्यादी आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा कब्जा करतात. 

समाजशास्त्रातील संशोधन असं सांगतं, की आपण निर्णय आधीच घेतो आणि मग सगळे प्रश्न आणि त्याला मिळालेल्या उत्तरांचं आकलन नकळत त्याच दिशेनं नेतो. आधुनिक विज्ञानानं ही अप्रबांधित मुलाखतीची प्रक्रिया नाकारली आहे. तरीही अगदी क्लेरिकलपसून ते यूपीएससीपर्यंत आपण ती आजही वापरतोय. आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे राजकारण्यांचे सामूहिक जॉब इंटरव्ह्यू. या उमेदवाराला खरंच ही नोकरी (नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान) झेपणार आहे का, जी व्यक्ती योग्य आहे का? याची उत्तरं आपण त्यांच्या भाषणात शोधतो. आपण ठरवलेलं आधीच असतं, बाकी प्रक्रिया डोक्यातल्या एचआर हेडला खूश करण्यासाठी असते! 

यावर उपाय? पुढच्या सदरात..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT