सप्तरंग

पूर्वग्रहांचा ‘दूषित’ भाव 

आर. जे. संग्राम, ९५ बिग एफ. एम.

गेले काही आठवडे आपण पूर्वग्रहांबद्दल बोलतोय. याची गंमत अशी असते, की प्रत्येकालाच इतरांचं म्हणणं किंवा विचार करणं पूर्वग्रहदूषित वाटतं; पण तीच गत आपली स्वतःचीसुद्धा आहे हे काही पटत नाही. या लेखात मी काही उदाहरणे देऊन हे पटवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. 

बऱ्याच गोष्टींवर आपलं मत आयुष्यात खूप लवकर बनतं आणि नंतर त्यावर फेरविचार होत नाही. साधं उदाहरण : अनेक आधुनिक मेडिकल शस्त्रक्रियांमध्ये गेल्या काही दशकांत आमूलाग्र बदल घडला आहे. पूर्वीच्या काळात मोठ्या किडनी स्टोनवर टाक्याची शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय असायचा; पण आता मात्र क्वचितच एवढी चिरफाड करावी लागते. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचंही तसंच. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पण वेदिक काळात ज्या नातेवाईकांच्या अशा शस्त्रक्रिया झालेल्या असतात ते मात्र, ‘अरे काही उपयोग होत नाही त्या ऑपरेशनचा. उलट दुखणं वाढतं. डॉक्टर आणि हॉस्पिटल यांचा पैसे उकळण्याचा धंदा आहे हा,’ असा सल्ला आपल्याला देतात. अर्थात वैद्यकशास्त्र म्हणजे टेक्निकल विषय. त्यातली आपल्याला लेटेस्ट माहिती असणं अपेक्षित नाही. आपण जो विषय रोज चघळतो, तोंड भरून वापरतो, त्याचं उदाहरण घेऊ या. मी विचारलेल्या प्रश्नाचं स्वतःला इमानाने उत्तर द्या आणि मगच माझं उत्तर वाचा. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारताची ‘राष्ट्रभाषा’ कुठली? आपलं उत्तर असेल अर्थात हिंदी.... पण भारताला ‘राज्यभाषा’ नाहीच. ‘राजभाषा’ आहेत म्हणजे ऑफिशियल भाषा ज्यात हिंदीबरोबर इंग्रजी आणि मराठीसुद्धा आहे. अनेक वर्षं आपल्याला हिंदी ही भारताची ‘ऑफिशियल भाषा’ आहे, असं आपल्यावर ‘अनऑफिशियली’ बिंबवलं गेलं होतं. दुसरं उदाहरण. भारताच्या एकशे तीस कोटी लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या किती आहे? मी हा प्रश्न रेडिओवरून विचारला होता. परवाच पोस्ट ग्रॅज्युएशनचा माझ्या विद्यार्थ्यांनाही विचारला. मला भेटलेल्या विविध प्रकारच्या (तरुण, वयस्कर, शिक्षित, उच्चशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, स्त्री, पुरूष - सगळ्या) लोकांची माहिती सारखीच होती. काहींना वाटलं ७० कोटी, बहुतांश लोकांना वाटलं ६० कोटी,तर काहींना वाटलं की भारतात चाळीस कोटी मुस्लिम राहतात. लहानपणापासून आपण भारताची लोकसंख्या आणि त्यातल्या त्यात मुस्लिम लोकसंख्या या गंभीर प्रश्र्नाबद्दल ऐकत आलेलो आहोत आणि त्यावरून आपले अनेक पूर्वग्रहसुद्धा आहेत. 

तुम्ही काय उत्तर दिलं मघाशी? ७०? चूक! ४० कोटी? नाही! ६० कोटी? छे छे!! गलत जवाब! भारतात मुस्लिम धर्मीयांची संख्या १८ कोटींपेक्षाही खूप कमी आहे. पण मग असं असेल, तर आधी आपण गृहीत धरलेल्या लोकसंख्येवरून व्यक्त केलेल्या मतांचं काय? अयोग्य मतांचं काय? 

ही सगळी माहिती एका गूगल सर्चवर तुम्हाला मिळू शकली असती; पण पुष्टीकरण पूर्वग्रहानुसार आपण त्याच गोष्टींकडे बघतो किंवा लक्ष देतो- ज्या आपल्या पूर्वग्रहाला पूरक असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT