Rahul Bajaj Sakal
सप्तरंग

Rahul Bajaj: गुणवत्ता, उत्पादकतेबद्दल दक्ष

कुटुंबप्रमुख आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण बजाज ग्रुपचे नेतृत्व असूनही त्यांनी आपल्या कुटुंबीयांना त्यांचा आर्थिक वाटा कायम दिला

प्रतापराव पवार

राहुल बजाज यांचा आणि माझा परिचय ४० वर्षांहून अधिक काळ होता. मराठा चेंबर, बजाज ऑटो आणि शरद पवार ही त्याची प्रमुख कारणे होती. पुण्यातील काही उद्योगपतींनी आम्हाला आमच्या सुरवातीच्या काळात आधार दिला. यामध्ये राहुल बजाज होते. ‘सकाळ’ विकत घेण्यासाठीही इतरांप्रमाणे त्यांनी आर्थिक मदत केली. अर्थात, हे सर्व आम्ही सव्याज फेडले.

राहुल बजाज यांची विचारधारणा अतिशय स्वच्छ होती. गुणवत्ता, उत्पादकता याबाबत ते कायम दक्ष असत; पण त्या काळात स्कूटरला प्रचंड मागणी असूनही त्याचा गैरफायदा त्यांनी कधीही घेतला नाही. आपल्या मुलांनाही कॉलनीतील मुलांबरोबर त्यांच्याच शाळेत घातले आणि त्यातून सामाजिक जाण त्यांच्यात निर्माण केली. कुटुंबप्रमुख आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण बजाज ग्रुपचे नेतृत्व असूनही त्यांनी आपल्या कुटुंबीयांना त्यांचा आर्थिक वाटा कायम दिला, याबद्दल त्यांचे समाजात नेहमीच कौतुक झाले.

त्यांच्या सबंध कुटुंबीयांवर गांधी विचारांचा प्रभाव होता. त्याच भूमिकेतून त्यांनी अनेक न्यासांतून अनेक संस्थांना भरीव मदत केली. अनेक उच्च पदे, सन्मान मिळूनही ते सहजपणे सर्वांमध्ये मिसळत. मिश्‍किलपणा हा त्यांच्या स्वभावात होता. सुदैवाने त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित आणि अतिशय यशस्वी झाली याचा त्यांना सार्थ अभिमान होता.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून त्यांची निवड सर्व राजकीय पक्षांनी बिनविरोध केली आणि अर्थातच त्यांनी आपला ठसा उमटविला. मराठा चेंबर आणि एम्प्रेस गार्डन यांमध्ये आम्ही अखेरपर्यंत एकत्र काम केले. चर्चेमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची, स्वच्छ विचारांची, निःस्पृहपणाची छाप पडत असे. एक चांगला मित्र गमावला असेच याक्षणी वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅसचा फटका शिवभोजन थाळीला; एक दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक सिलेंडर; दरही वाढले

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT