RAHUL BAJAJ PUNE SAKAL
सप्तरंग

Rahul Bajaj: दूरदृष्टी लाभलेला व्यवहारी उद्योजक

‘बजाज ऑटो’ ही १९६० मध्ये सार्वजनिक कंपनी बनली. तेव्हा कंपनीची उत्पादन क्षमता होती वार्षिक ३००० स्कूटर उत्पादनांची.

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

‘बजाज ऑटो’ ही १९६० मध्ये सार्वजनिक कंपनी बनली. तेव्हा कंपनीची उत्पादन क्षमता होती वार्षिक ३००० स्कूटर उत्पादनांची. राहुल बजाज यांनी १९६८ मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी कंपनीची सूत्रे हाती घेतली, तेव्हा कंपनीची वार्षिक उलाढाल होती सुमारे सात कोटी रुपये. पुढच्या सात वर्षांत म्हणजे १९७५ पर्यंत कंपनीची उलाढाल २७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली. त्यानंतरच्या अवघ्या दहा वर्षांत म्हणजे १९८५ पर्यंत कंपनीची उलाढाल २७० कोटी रुपयांवर गेली. उत्पादन क्षमता वार्षिक चार लाखांपर्यंत पोहोचली होती. भारतातील उद्यमशीलतेच्या विस्ताराचे बजाज ऑटो आणि राहुल बजाज हे ऐंशीच्या दशकात प्रतीक बनले होते. ‘व्हेस्पा’ आणि ‘होंडा’ या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर थेट ‘बजाज’च्या दुचाकी आल्या होत्या. (Rahul Bajaj Memories)

पुण्यातील ‘बजाज ऑटो’चा कार्यभार स्वीकारल्यानंतर राहुल बजाज यांना केवळ आकाराने मोठी, नफा कमावणारी आणि दर्जेदार उत्पादने देणारी कंपनी बनवायची नव्हती; तर स्वयंपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवणारी कंपनी उभी करायची होती. १९६८ ते १९८५ या सतरा वर्षांत राहुल बजाज यांनी तशी कंपनी निर्माण करून दाखवली. ‘बजाज ऑटो’चा आकुर्डीतील प्रकल्प हा राहुल बजाज यांच्या दूरदृष्टीपणाचा नमुना मानला जातो. भारतातील परमीट राज ऐन भरात असतानाही ‘बजाज ऑटो’ने उत्पादन क्षमता वाढवत नेली ती राहुल यांच्या नियोजनामुळे. उद्योजकाकडे संशयीदृष्टीने पाहण्याच्या काळातही राहुल यांनी भारतीय वाहन उद्योग परमीट मुक्त होईल, असे भाकीत वर्तविले होते त्यादृष्टीने स्वतःच्या कंपनीची तयारी करत नेली होती. उत्पादनासाठी सरकारकडे ‘लायसन्स’ची मागणी नोंदविण्यापूर्वीच बजाज ऑटो फॅक्टरीची इमारत उभी करत असे.

वाहनांचे प्रत्यक्ष उत्पादन वगळता अन्य सर्व गोष्टींची तयारी बजाज ऑटोच्या प्रकल्पात झालेली असे. परिणामी, लायसन्स मिळताच काही दिवसांतच ‘बजाज ऑटो’मधून दुचाकींचे उत्पादन सुरू होत असे. उत्पादन परमीट, बाजारपेठेतील मागणी यानुसार राहुल यांनी आकुर्डीचा प्रकल्प विस्तारला. त्यानंतर औरंगाबादला प्रकल्पाची उभारणी केली. ‘चाकण’मध्येही स्वतंत्र प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पांमधून हजारोंना रोजगार मिळाला. रोजगार हे उद्योगाचे प्रमुख कारण असू शकत नाही, असे राहुल बजाज यांचे ठाम मत होते. योग्य किमतीला आवश्यक ती उत्पादने उपलब्ध करून देणे, हे उद्योगांचे उद्दिष्ट असते, असे त्यांचे मत होते. या उद्दिष्ट पूर्तीसाठीचा स्वाभाविक घटक म्हणून रोजगार निर्मिती होते. फक्त रोजगारासाठी उद्योग काढता येत नसतो, असे ते सांगत असत.

पुण्याबद्दल अपार आदर

उद्योगभूमी म्हणून पुण्याबद्दल त्यांच्या मनात अपार आदर होता. पुण्यात ‘सोशल कॅपिटल’ आहे असे त्यांचे म्हणणे होते. बुद्धिवान, कौशल्य असलेल्या लोकांची उपलब्धता पुण्यात आहे. शिक्षण, आरोग्य संस्था आहेत. औद्योगिक संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे पुण्यात नेहमीच उद्योगांना पसंती राहील, असे ते सांगत. सर्वच सरकारांबद्दल मात्र त्यांनी सडेतोड भूमिका असे. कोणत्याही सरकारच्या कोणत्याही मोफत योजनांना स्पष्टपणे विरोध करणारा उद्योजक अशी त्यांची ख्याती होती. खुली बाजारपेठ, जागतिक स्पर्धा, ग्राहक सेवा, उत्पादनांचा दर्जा यासंबंधाने राज्य आणि केंद्र सरकारांनी १९८५ पासून आखलेल्या धोरणांवर राहुल बजाज यांच्या विचारांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रभाव असे. सरकारचे धोरण नाही पटले, तर ते जाहीर नाराजी व्यक्त करत. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते केवळ उद्योजक म्हणून मर्यादित राहीले नाहीत; तर धोरणकर्त्यांचे मार्गदर्शक बनले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT