vulgar ranveer singh pics sakal
सप्तरंग

‘नग्न’ म्हणजे अश्लील नव्हे!

ज्या देशात गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, बलात्कार यांच्या बातम्या द्यायला वेळ पुरत नाहीये तिथे एका नटाने त्याचे नग्न फोटो काढले.

रसिका आगाशे

ज्या देशात गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, बलात्कार यांच्या बातम्या द्यायला वेळ पुरत नाहीये तिथे एका नटाने त्याचे नग्न फोटो काढले.

ज्या देशात गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, बलात्कार यांच्या बातम्या द्यायला वेळ पुरत नाहीये तिथे एका नटाने त्याचे नग्न फोटो काढले, ही बातमी राष्ट्रीय महत्त्वाची कशी होते? हे करून रणवीर सिंगचा चर्चेत राहता येईल, हा उद्देश असेल तर मात्र तो आपण साध्य करून दिला आहे....

एका पुरुषाचा नग्न फोटो चर्चेत आहे. आपल्याला बाई म्हणून का अश्लील वाटावं? किंवा का लाज वाटावी? पण सर्व वाहिन्यांवर गदारोळ उठला आहे, यामुळे बायकांच्या भावनांना, प्रतिष्ठेला धक्का पोहचला म्हणून कुणी तक्रारही केली आहे. ओरडून ओरडून सांगितलं जात आहे की, हा राष्ट्रीय मुद्दा आहे.

गेल्या काही वर्षांत, आपण विविध पुरुष, विविध जाहिरातीत, चित्रपटात, अगदी टीव्ही मालिकांमध्येही बिना शर्टाचे पाहू लागलो आहोत. कमी कपडे घातलेली, उरोज दाखवणारी स्त्री ही एकेकाळी खलनायिका असायची. सोज्वळ बाई ही पूर्ण कपड्यातच दाखवली जाते. सोज्वळ पुरुष हे अगदी पुराण कथांपासून आत्तापर्यंत, वरून उघडेच असायचे. खरंतर, फक्त धोतर नसलेले, फक्त छोटी लंगोट घातलेलेही पुरुष आपण विविध दृक्‌श्राव्य माध्यमातून पाहत आलो आहोत!

केवळ समोरच्याच्या भावना (या शक्यतो लैंगिकच असतात.) उद्दिपित करण्यासाठी शरीराचा बाजार मांडला आहे की हा एक सौंदर्यानुभव आहे? शिल्पांमध्ये, चित्रांमध्ये ही सौंदर्यानुभूती खूप पूर्वीपासून व्यक्त करण्यात आली आहे. ‘आमच्यात नव्हतं बरं का असं काही’वाल्यांनी जुन्या मंदिरांवरची नग्न शिल्पे आठवावीत. जसं फूल, पान, झाड, पशू, पक्षी कुठल्याही आवरणाविना सुंदर दिसतात, तसे मानवी शरीरही दिसू शकते! पण नग्न शरीर किती सुंदर दिसू शकतं, याची आपल्याकडे कल्पनाही केली जाऊ शकत नाही. लहानपणापासून नीट बस, ब्रा डोकावतीये, तुझा बनियान दिसतोय, शेम शेम असं म्हणून म्हणून आपण सगळ्यांनी आपल्यासकट इतरांना सतत आपल्या शरीराची जाणीव करून दिली आहे. अगदी एकट्याने किंवा एकटीने आंघोळ करतानाही संपूर्ण कपडे न काढणारे, न काढू शकणारे आपल्याकडेच बहुसंख्य आहेत. आपलंच शरीर बघायची लाज वाटते? का? प्रत्येक शरीर हे सुंदर असतं खरंतर आणि ते सौंदर्य आपल्याला अनुभवता येते का, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे.

आपल्याकडे संपूर्ण नग्न शरीर हे केवळ आणि केवळ लैंगिक क्रियांच्या वेळीच असू शकतं किंवा कुणीही कपडे उतरवले की केवळ लैंगिक क्रियाच घडणार आहे, असा काहीसा समज आहे. म्हणूनच बलात्कार, छेडछाडप्रकरणी, मुलीचे कपडे कसे कमी होते, याबद्दल आपल्या देशात चर्चा होते. शरीराबद्दल फाजील कुतुहल आपण निर्माण होऊ देतो. ‘तोत्तोचान’ नावाच्या पुस्तकात वाचल्याचं आठवतंय, की लहान मुलांना तलावामध्ये बिनाकपडे ते मुख्याध्यापक घेऊन जातात. आणि एकदा स्वच्छ पाहिलं की मुलांची आणि मुलींची शरीरे अशी असतात, की काही फरक असतो, हे ती मुले विसरूनही जातात आणि पोहण्याचा आनंद घेतात. त्यात पोलिओ झालेला, उंची न वाढलेला मुलगाही आहे. किती किती मोकळं वाटलं असेल त्यांना!

मुळात ‘नग्न’ म्हणजे काहीतरी अश्लील, घाणेरडं आहे, हा दृष्टिकोन जायला किती वर्षं लागणार आहेत कोण जाणे. मग काय फिरा ना रस्त्यात सगळे नागडे! सगळी लाज गुंडाळूनच ठेवली आहे, असा अनाहूत सल्ला देणारे अनेक भेटतील... पण कपड्यांचा शोध का लागला असेल हो? थंडी, वाऱ्यापासून, पावसापासून, उनापासून त्वचेचे, शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून! ‘लाजेचा’ शोध थोडा नंतर लागलाय!

रणवीर सिंगचे नग्न फोटो मला खूप आवडले. अत्यंत सुंदर शरीर आणि अजिबात माझ्या कामभावना उद्दिपित झाल्या नाहीत. हे करून चर्चेत राहता येईल, असं त्याला वाटलं असेल, तर तो उद्देश मात्र आपण साध्य करून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT