देवयानी वैशंपायन
देवयानी वैशंपायन  Sakal
सप्तरंग

गर्जे मराठी : यशोमंत्र मनुष्यबळ विकासाचा

सकाळ वृत्तसेवा

करिअरमध्ये यशस्वी होण्याचा स्ट्रगल सगळ्यांनाच करावा लागतो; पण त्यातही महिलांसाठी हा प्रवास आणखी खडतर. कॉर्पोरेट जगतात महिलांसाठी कायमच काही अदृश्य बंधनं राहिलेली आहेत. हीच बंधनं तोडत देवयानी वैशंपायन यांनी आपलं वर्चस्वच सिद्ध केलं असं नाही, तर कोरोनाकाळात ज्याचा सर्वांत जास्त उपयोग झाला, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग मनुष्यबळ विकास विभागासाठी करणारी ‘एच.आर. टेक.’ ही स्वतःची कंपनीदेखील उभी केली आहे.

वैशंपायन यांचा जन्म मुंबईचा. घरात चार बहिणी. सगळ्यांच्याच शिक्षणाच्या बाबत त्यांचे वडील आग्रही. देवयानी शाळेपासून अभ्यासात स्कॉलर. साहजिकच त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं अशी सगळ्यांचीच अपेक्षा. त्यांनी त्यासाठी परीक्षाही दिली; पण एका मार्कानं प्रवेश चुकला आणि त्यांच्या करिअरला वेगळी दिशा मिळाली. तेव्हाच त्यांनी एमबीए करायचं ठरवलं. वडील याच क्षेत्रात; पण आपण त्यांच्या मदतीशिवाय उभं रहायचं हे त्यांनी ठरवलं. मग एका कंपनीमध्ये त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. खरंतर देवयानी वैशंपायन यांनी काम सुरू केलं तेव्हा ह्यूमन रिसोर्स हा विभाग किंवा शब्दसुद्धा फारसा परिचित नव्हता. पर्सनल आणि लेबर रिलेशन या नावाने हा विभाग ओळखला जायचा.

अशामध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी ‘AT&T’ची इंडिया एचआर हेड म्हणून काम करायची संधी त्यांना मिळाली. हे काम करत असताना त्यांना ब्रिटिश कौन्सिलकडून स्कॉलरशिप मिळाली. संपूर्ण भारतातून यासाठी दहा जणांची निवड झाली. वैशंपायन सांगतात, ‘‘तिथं शिकत असताना बिझनेस स्ट्रेटर्जीमध्ये एक जबाबदारी होती, त्यासाठी मला विचारणा झाली. मला स्वतःला टेस्ट करायचं होतं. त्यातच नवऱ्यालादेखील ट्रान्स्फर मिळाली. अर्थात, परदेशात भारताप्रमाणे मदतीला कोणी नसताना करिअरकडं बघत घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना थोडी तारांबळ झाली. आता मागे वळून बघताना वाटतं, कसं जमवलं ते सगळं.’’

वैशंपायन यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये काम केलं. ब्रिटिश ऑइल अँड गॅस, रोल्स रॉयस, पेट्रोनास अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्या कायम प्रमुख भूमिका बजावत राहिल्या. ब्रिटन, सिंगापूर हाँगकाँग, अमेरिका अशा जवळपास चार देशांमध्ये त्यांनी नोकरी केली आहे. वैशंपायन यांच्या मते, ‘नवीन संधी यायची तेव्हा मी या कामात मी काय शिकू शकते याचा विचार करायचे. एका देशात राहून इंटरनॅशनल रोलमध्ये काम करणं आणि वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या वर्क कल्चरमध्ये राहून काम करणं, हे अनुभव वेगवेगळे असतात.’

रूढ अर्थाने सेट झालेलं असताना मात्र त्यांनी थांबायचा निर्णय घेतला. ‘‘हा निर्णय सोपा नव्हता. मी कदाचित कायमच आंत्रप्रेन्युअर होते; पण पगार, टीम हे सगळं सेट होतं. अशात स्वतःचा व्यवसाय सेट करायचा हे अवघड होतं; पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पीपल मॅनेजमेंट हे पूर्ण नवं क्षेत्र, त्यात काम करायचा निर्णय मी घेतला आणि एच.आर. टेक. पार्टनरशिपची सुरुवात झाली,’’ वैशंपायन सांगतात.

कोरोनामुळे सगळी गणितं बदलली आहेत. अशात कंपन्यांना याची खूप मदत होते आहे. या यशस्वी कारकीर्दीसाठी देवयानी वैशंपायन यांची आशियन वूमन अवॉर्डसाठी निवड झाली आहे. २०१६ च्या एफटीएससी १०० वुमेन टू वॉचमध्ये त्यांचा समावेश झाला होता. गमतीचा भाग म्हणजे हे सगळं करत असताना देवयानी वैशंपायन या पौरोहित्यदेखील करतात. या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी त्या एकच सल्ला देतात, ‘‘एच.आर.साठी तुमचा इमोशनल कोशंट खूप स्ट्राँग असावा लागतो. सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व या क्षेत्रासाठी खूपच आहे.’’

-प्राची कुलकर्णी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT