पत्नीपुराण Sakal
सप्तरंग

स्मित फुलवणारं पुराण

‘पत्नीपुराण’ या पुस्तकात सुखद धक्का बसतो तो कुठलीही व्यंगात्मक टिप्पणी न करता इथं विनोदनिर्मिती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मराठी साहित्यात विनोदासाठी स्त्री भूमिकांचा आधार घेण्याची प्रथा तशी जुनीच, मात्र विनोद निर्मिती करताना अनेक वेळा स्त्रियांची आपण टिंगलीपेक्षा टवाळी जास्त करीत आहोत याचे भान सुटलेले असते. बऱ्याच वेळा केवळ विनोदासाठी विनोद म्हणून शारीरिक व्यंगावरदेखील बोट ठेवले जाते. स्त्रियांचा स्थूलपणा आणि अतिरेकी पद्धतीने रंगविलेला शॉपिंगचा उत्साह किंवा वेंधळेपणा यावर बऱ्याचवेळा विनोदनिर्मितीचा सगळा भर असतो. मात्र डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या ‘पत्नीपुराण’ या पुस्तकात सुखद धक्का बसतो तो कुठलीही व्यंगात्मक टिप्पणी न करता इथं विनोदनिर्मिती केली आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण पुस्तक हे पत्नीविषयी म्हणजे महिलांविषयी असूनही महिलांचा उपमर्द होईल अशा प्रकारचे लिखाण नाही. मात्र विनोदनिर्मिती करताना अतिशयोक्ती करणे हे त्यांनी टाळलेले नाही. अर्थात, याचा कंटाळा येत नाही किंवा आशयातली गंमत जात नाही. ‘‘भार्यावेदातील सर्वोत्तम सूक्त म्हणते, की अखिल पतींना प्रेरणा देणारी ती पत्नी तिचे पतीलाच प्रिय असे जे सर्वश्रेष्ठ अवर्णनीय तेज आहे त्याचे पती ध्यान करतो तीच पत्नीदेवी पतीच्या बुद्धीला आणि वर्तनाला उत्तम रीतीने प्रेरणा देवो.’’ तांबोळी यांच्या लेखनातील ही वाक्ये पुस्तकातील लेखनाची नेमकी कल्पना देऊ शकतील. अनेक ठिकाणी अपरिचित म्हणी, तसेच शाब्दिक कोट्या करून तांबोळी यांनी हे पत्नीपुराण रंजक केले आहे.

‘पत्नीपुराण’ लिहिताना त्यांनी मराठी महिन्यांचा आधार घेतला आहे. प्रत्येक प्रकरण म्हणजे एक मराठी महिना. त्यामुळे चैत्रापासून फाल्गुनापर्यंत लिहिताना त्यांनी स्त्री आणि पुरुषांमधील सहजीवनाचा आधार घेताना संसारातील बारीकसारीक प्रसंग नेमक्‍या पद्धतीनं फुलविले आहेत. ‘ केवळ पत्नीशरण असणाऱ्या वाचकांसाठी’ अशी अर्पण पत्रिका देऊन गालावर स्मित फुलविणाऱ्या तांबोळी यांनी पुढे प्रत्येक प्रकरणात त्या-त्या महिन्याचे महत्त्व सांगताना भाषेचे लालित्य राखत सहजीवनातील पत्नीचे स्थानही अधोरेखित केले आहे. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या संसारातील विसंगतीवर बोट ठेवून विनोदनिर्मिती करताना त्यांच्या विनोदाचे लक्ष्य स्त्रिया असल्या तरी कुठेही स्त्रियांचा उपमर्द होणार नाही आणि लिखाणाचा दर्जाही घसरणार नाही ही कसरत त्यांनी नेमकेपणाने सांभाळली आहे.

जसे मराठी महिने, त्यांनी ओळख करून देताना आधारासाठी घेतले तसे सर्व ऋतूंचे वेगळेपण त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठी महिना, मराठी ऋतू याबद्दल माहिती देताना त्यांनी मराठी परंपरा, प्रथा आणि मराठी संस्कृती याबद्दलही माहिती देताना या गोष्टींचे मोल कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे; पण हे सारे करताना प्रत्यक्ष आचरणात ज्या विसंगती निर्माण होतात त्यावर बोट ठेवले आहे. हे ‘पत्नीपुराण’ सांगताना त्यांनी एल. के. शास्त्री या पात्राची निर्मिती केली आहे. त्यांच्या माध्यमातूनही त्यांनी चांगले वातावरण निर्माण केले आहे.

प्रकरणाची शीर्षके देताना त्यांनी गंमत तर साधली आहेच; पण काही वेळा जनमानसातील रूढींवर बोट ठेवून टोकदारपणे भाष्यही केले आहे. भानगडींचा भाद्रपद, विवाहकारक वैशाख व पाणचटलेला पौष ही तशा शीर्षकाची काही ठळक उदाहरणे. ‘आषाढ असोशी’ यातून पावसाबद्दलची उत्कंठता जशी सांगितली आहे, तसे ‘कुटुंबसखा कार्तिक’ या शीर्षकातून त्या महिन्यात येणाऱ्या विविध सणांकडे त्यांनी लक्ष वेधले. एकूणच हे ‘पत्नीपुराण’ कुठलेही व्रत न सांगता विनोदनिर्मितीचे व्रत सफल संपूर्ण करते हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT