Award Sakal
सप्तरंग

गोष्ट माझी : मोठा पुरस्कार

दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे विनयला नेहमीच आवडे.

सकाळ वृत्तसेवा

‘‘विनय, लवकर उठ बरं. आज तुझी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आहे ना? पटकन आवरून घे. आणि हो, मी चहा करते, तू समोरच्या बेकरीतून ब्रेड घेऊन ये बरं...’’ विनय खडबडून जागा झाला. ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय होता परोपकार. त्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तो जागा होता. वक्तृत्व स्पर्धेत आपण एखाद्याला कशी मदत केली असा कोणता प्रसंग सांगता येईल याची तो जुळवाजुळव करत होता.

दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे विनयला नेहमीच आवडे. रस्त्याच्या कडेला कुत्र्याचे पिल्लू जरी आढळले, तरी तो घरी घेऊन येत असे. त्याला अंघोळ घालणं, दूध देणं असे उपद्व्याप त्याला आवडत. वर्गमित्रही अडचणीच्या वेळी त्याच्याकडे येत असत. तो यथाशक्ती त्यांना मदत करीत असे. या परोपकारी वृत्तीमुळे तो शिक्षकांसहित सर्वांचाच लाडका होता. त्याच्या आवडीचाच विषय असल्यानं त्यानं वक्तृत्व स्पर्धेची छान तयारी केली होती.

पटकन उठून त्यानं आवरलं आणि आईनं सांगितल्याप्रमाणे पिशवी घेऊन तो ब्रेड आणण्यासाठी घरातून बाहेर पडला. सकाळची प्रसन्न वेळ होती. मॉर्निंग वॉकसाठी अनेक जेष्ठ नागरिक बाहेर पडले होते. बेकरी घरापासून जवळच होती. तो बेकरीत शिरणार इतक्यात समोरच्या गल्लीतील आजोबा चालता चालता तोल जाऊन खाली पडले. त्यांची काठी बाजूला पडली. विनयनं धोका ओळखला. पटकन जाऊन त्यानं आजोबांना उठवलं. त्यांची काठी त्यानं त्यांच्या हातात दिली आणि त्या आजोबांना म्हणाला, ‘‘आजोबा, तुम्हाला लागले तर नाही ना? चला, मी तुम्हाला तुमच्या घरी पोचवतो.’’ आजोबा म्हणाले, ‘‘अरे बाळा, मला काही लागलं नाही, फक्त तोल गेला आणि मी पडलो; पण तू वेळीच मदत केल्यामुळे मी आता सावरलोय. मी जाईन आता घरी. तुझे खूप आभार.’’ विनय म्हणाला, ‘‘आजोबा, तुम्ही घरी जाईपर्यंत पुन्हा तुमचा तोल गेला आणि तुम्ही पडला तर तुम्हाला इजा होईल. त्यापेक्षा मी तुम्हाला तुमच्या घरात सोडतो आणि मगच जातो.’’

विनय आजोबांना घेऊन त्यांच्या घरी पोचला. आजोबांना एक मुलगा हाताला धरून घेऊन आला हे पाहून त्यांच्या घरातील लोक घाबरले. विनयनं सांगितलं, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. आजोबांना काही लागलं नाही. फक्त तोल गेल्यामुळे ते पडले. मी इथे पलीकडच राहतो. मला तुमचं घर माहीत होतं, म्हणून मी आजोबांना घेऊन आलो.’’ घरातील सर्वांनी विनयचे आभार मानले.

बराच वेळ झाला तरी विनय का आला नाही म्हणून आईला काळजी वाटू लागली. विनयच्या स्पर्धेची वेळ संपून गेली होती. विनय घरी आला आणि आईला झालेला प्रसंग सांगितला. आईला विनयचा खूप अभिमान वाटला. आई म्हणाली, ‘‘अरे विनय, आज खऱ्या अर्थानं तू परोपकार केला आहेस. त्या आजोबांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी तू तुझ्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचीदेखील काळजी केली नाहीस. यालाच परोपकार म्हणतात. स्पर्धेत भाषण करून मिळवला असतास, त्यापेक्षा मोठा पुरस्कार तू मिळवला आहेस.’’ असं म्हणून आईनं विनयला जवळ घेतलं.

-सुदाम विश्वे, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : अवजड वाहनांमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे; पुण्यात अडीच वर्षांत २१४ जणांचा मृत्यू, १९२ गंभीर जखमी

भरणीतील चिठ्ठ्यांमधून निघणार OBC आरक्षण! सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Shravan Upvas Benefits: या श्रावणात ‘उपवास’ ठरेल आरोग्यासाठी वरदान! कारणे, फायदे व महत्त्व समजून घ्या

Beed News: अल्पवयीन पंधरा मुलांची थेट विक्रीच; गहूखेलमधील प्रकरणात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांना माहिती

Pune Traffic : चाकण-भोसरी कोंडीबाबत स्वतंत्र बैठक, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT