Laurel Hubbard
Laurel Hubbard Sakal
सप्तरंग

स्पर्धा जिंकायची आहे? मग ‘तो’चे ‘ती’ व्हा!

संजय घारपुरे saptrang@esakal.com

लॉरेल हुबार्ड टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत किती यश मिळवेल हे सांगणं अवघड आहे; पण या वेटलिफ्टरनं स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच खेळ चर्चेत आणला आहे हे मात्र नक्की. खरं तर त्यामुळे न्यूझीलंडमध्ये हुबार्डवर स्तुतिसुमनं उधळली जाणं अपेक्षित होतं; पण किवी-भूमीतूनच त्याच्यावर टीका सुरू झाली आहे. ‘हुबार्डनं बाजी मारली तर त्या स्पर्धेत त्याला दोन सुवर्णपदकं द्यायला हवीत!’ अशी टीकात्मक सूचना केली जात आहे...कारण, मूळचा पुरुष असलेल्या हुबार्डनं लिंगबदल करून घेतला आहे आणि तो आता महिलांच्या स्पर्धेत खेळणार आहे. सन २०१४ च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत हुबार्डनं ब्राँझ जिंकलं होतं. लिंगबदल झालेला पहिला ऑलिंपियन होण्याचा मानही हुबार्डला मिळणार आहे.

मात्र, न्यूझीलंडची माजी ऑलिंपियन वेटलिफ्टर ट्रेसी लॅम्बेश हिला हे मान्य नाही. जैवशास्त्रीय निकषांनुसार अन्य स्पर्धकांपेक्षा तिचं पारडं वरचढ आहे. त्यामुळे ‘हुबार्ड ‘जिंकली’ तर महिलाच म्हणून जन्माला आलेल्या रौप्यपदक विजेतीसही सुवर्णपदक देण्यात यावं,’ असा लॅम्बेशचा आग्रह आहे.

हुबार्डला विरोध करणारी लॅम्बेश एकटीच नाही. ‘सेव्ह महिला स्पोर्टस् ऑस्ट्रेलेशिया’ या गटातल्या ४३ वर्षीय पुरुषानं, आपण महिला आहोत, असं सांगितलं. आता ऑलिंपिक समितीनं, त्याला महिलांच्या स्पर्धेत प्रवेश दिल्याची बोचरी टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या पॅसिफिक स्पर्धेत हुबार्डनं राष्ट्रकुल क्रीडाविजेती फिगैगा स्टॉवर्स हिला मागं टाकत बाजी मारली होती. स्पर्धा झाली होती सामोआमध्ये. फिगेगा ही यजमान देशाची. ‘हुबार्डचा महिला स्पर्धेतील समावेश म्हणजे उत्तेजक घेतलेल्या खेळाडूला ऑलिंपिकचे दरवाजे उघडल्यासारखंच आहे,’ अशी टीका सामोआ महासंघ करत आहे. बेल्जियमनं तर ‘यासारखा क्रूर विनोद नसेल’, अशी टिप्पणी केली आहे.

हुबार्डनं २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवल्यावर ‘तिचा’ सहभाग रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया महासंघ सरसावला. दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं, हुबार्ड जखमी झाली आणि तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. एकंदरीत याबाबतचा इतिहास पाहिला तर स्पर्धा जिंकायची असेल, तर ‘तो’ चा ‘ती’ होण्याचा मार्गच अमलात आणला जात आहे.

‘या’ही (‘हे’ही!) टोकिओत असण्याची शक्यता

  • अमेरिका संघात बीएमएक्स स्पर्धेसाठी चेल्सी वॉल्फीचा समावेश. तिचाही काही वर्षांपूर्वी लिंगबदल. मात्र, अद्याप सहभाग अनिश्चित.

  • कॅनडा फुटबॉल संघात क्वीनचा समावेश अपेक्षित. रिओ ऑलिंपिमधील ब्राँझपदक विजेत्या कॅनडा महिला संघात स्थान. मात्र, आपण लिंगबदल केल्याचं तिनं गेल्या वर्षीच सांगितलं आहे.

हुबार्डची झालेली प्रगती

  • १९९८ ते २०१२ : एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेस पात्रता नाही.

  • २०१३ : लिंगबदल केला (३५ व्या वर्षी).

  • २०१४-२१ : ऑलिंपिकसह ११ आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्रता.

हे ‘पुरुष’ महिलांच्या स्पर्धेत प्रभावी

  • २०१७ मध्ये सेसे तेल्फर ४०० मीटर अडथळा शर्यतीत अमेरिका-क्रमवारीत ३९० व्या स्थानी. २०१८ मध्ये लिंगबदल, २०१९ च्या महिला द्वितीय श्रेणीत विजेती, २०२१ च्या ऑलिंपिक पात्रतेची संधी.

  • २०१३ - १५ : ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हँडबॉल संघातील हॅन्ना मॉन्सी याचे २२ सामन्यांत शून्य गोल. २०१५ मध्ये लिंगबदल, २०१८ मध्ये वादविवादानंतर ऑस्ट्रेलिया महिला संघात निवड, सहा सामन्यांत २३ गोल.

  • २०१५ पूर्वी : हैली डेव्हिडसन. पुरुषांच्या एकही गोल्फ स्पर्धेस पात्रही नाही. २०१५ मध्ये लिंगबदल, २०२१ : अमेरिकन व्यावसायिक गोल्फ स्पर्धेत विजेतेपद.

  • २०१९ मेरी ग्रेगरी. पुरुषाची महिला. रॉ वेटलिफ्टिंग स्पर्धेत सर्व नऊ स्पर्धांत अव्वल, चार जागतिक विक्रमही.

  • २००६ पूर्वी : फॉलन फॉक्स. अमेरिकेच्या नौदलात. २००६ मध्ये लिंगबदल, २०१२-१४ : महिलांच्या एमएमएमध्ये केवळ एकच लढत गमावली. एकीला तर फ्रॅक्चर केलं.

  • २०११ मध्ये रॅशेल मॅककिनॉनचा व्हेरोनिका आयव्ही झाली. त्यानंतर जागतिक मास्टर्स सायकलिंगच्या महिलांच्या स्पर्धेत विजेतेपद.

  • पुरुष असताना मॅक्सिन ब्लिथिन याची फलंदाजीची सरासरी १५ होती. महिला झाल्यावर केंट संघातून खेळताना सरासरी १२४. मोसमातील सर्वोत्तम खेळाडूचं बक्षीसही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT