Sky Brown
Sky Brown Sakal
सप्तरंग

...तो लहानगा ऑलिंपिक विजेता

संजय घारपुरे saptrang@esakal.com

ऑलिंपिक क्रीडास्पर्धेसाठी सध्या संघ जाहीर होत आहेत... त्या संघांच्या निवडीनं औत्सुक्य निर्माण होत आहे... ब्रिटननं आपल्या संघात स्केट बोर्डिंग संघात कुमार गटाच्या स्पर्धेसाठीही लहान ठरतील अशा दोघांची निवड केली आहे. त्यातील स्काय ब्राऊन ही टोकिओत प्रत्यक्ष स्पर्धेत असेल त्या वेळी तिचं वय असेल १३ वर्षं ११ दिवस. तिच्यासह १४ वर्षीय बॉम्बेत्ते मार्टिन हीसुद्धा या संघात आहे.

स्काय ब्राऊनच्या मुलाखती अर्थातच सध्या ब्रिटनमधील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत आहेत.

‘माझा ऑलिंपिक-सहभाग पाहून अनेक मुली लहान वयात स्केट बोर्डिंगला सुरुवात करतील,’ असं तिनं म्हटलं आहे. ‘कदाचित मी सुवर्णपदकही जिंकेन,’ असं आत्मविश्वास व्यक्त करून त्यावर ती स्वतःच खळखळून हसलीही.

हे वाचल्यावर, कदाचित टोकिओत ऑलिंपिक स्पर्धेतील सर्वात लहान सुवर्णपदक विजेती स्पर्धक गवसू शकेल अशी चर्चा सुरू झाली. मात्र, ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा इतिहास चाळला तर, तेरावर्षीय स्काय ब्राऊनही कदाचित वयानं मोठी ऑलिंपिक विजेती ठरेल, अशी उदाहरणं आढळू शकतील. आधुनिक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा इतिहासही शंभर वर्षांचा आहे. त्यामुळे त्या सर्वात लहान विजेत्यास खरंच सुवर्णपदक दिलं गेलं का याची नेमकी नोंद नाही. मात्र, त्याच्या यशाचं छायाचित्र इंटरनेटवर उपलब्ध आहे. एवढंच नव्हे तर, हा मुलगा फ्रान्सचा नव्हे तर, जॉर्जियाचा असल्याची शक्यता निर्माण करणारी एक लिंकसुद्धा आहे. हे घडलं होतं ते १९०० च्या पॅरिस ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत.

स्पर्धा होती सेलिंगची. कॉक्स्ड् पेअर प्रकाराच्या या स्पर्धेत नेदरलँड्स संभाव्य विजेता मानला जात होता. मात्र, त्याला धक्कादायकरीत्या प्राथमिक शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर जावं लागलं. फ्रँकॉईस ब्रँडात आणि रोएलॉफ क्लेईन यांनी विचार सुरू केला, त्या वेळी त्यांना, आपल्या बोटीतील कॉक्सवेन असलेला हर्मानुसर ब्रॉकमन हा खूपच लठ्ठ असल्याची जाणीव झाली. आता त्याला बोटीतून उतरवायचं तर बोटीत दुसरा कुणीतरी कॉक्सवेन हवा. ते त्याचा शोध घेत होते. त्यांना प्रेक्षकात एक मुलगा दिसला. तो खूपच उत्साहानं ओरडत होता. त्यांनी त्यालाच कॉक्सवेन म्हणून निवडलं. कॉक्सवेनचं मुख्य काम हे प्रोत्साहित करण्याचं असतं. हा जो मुलगा होता तो काहींच्या मते सात वर्षांचा, तर काहींच्या मते आठ वर्षांचा. काही जण तो बारा वर्षांचा असल्याचं सांगतात.

वय बाजूला राहू द्या; पण या मुलाच्या प्रोत्साहनामुळे डच संघानं सुवर्णपदक जिंकलं. विजेत्या जोडीसह त्याचं छायाचित्रही काढण्यात आलं. ऑलिंपिक क्रीडा-इतिहासातील तो सर्वात लहान विजेता झाला, असं काहींचं मत आहे. मात्र, काही अभ्यासक, त्या मुलाला सुवर्णपदक दिलं नसल्याचा दावा करतात. जास्त वजनदार असल्यामुळे संघाबाहेर गेलेल्या कॉक्सवेननं पदकवितरणाच्या वेळी सुवर्णपदक स्वीकारलं.

आता हे खरं असेल तर ‘जिंकलं कोण, गौरव कुणाचा’ असंच म्हणावं लागेल! आता हा मुलगा मोठा झाल्यावर त्यानं काय केलं, त्यानं कशात कारकीर्द घडवली हेही गुपितच आहे.

वय लहान, पदक महान

ग्रीकचा जिम्नॅस्ट दिमित्रॉस लाँड्रास यानं १८९६ च्या अथेन्स ऑलिंपिकमध्ये सांघिक ब्राँझ पदक जिंकलं, त्या वेळी त्याचं वय होतं १० वर्षं २१८ दिवस.

वैयक्तिक स्पर्धेतील सर्वात लहान पदकविजेता नील्स स्कॉग्लंड हा आहे. १९२० च्या स्पर्धेत डायव्हिंगमध्ये तो दुसरा आला होता. त्या वेळी त्याचं वय होतं १४ वर्षं ११ दिवस.

डोन्ना एलिझाबेथ दे वेरोना हिचा सहभाग असलेल्या अमेरिकेच्या जलतरण संघानं ४ बाय १०० मीटर फ्री स्टाईल शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. त्या वेळी तिचं वय होतं १३ वर्षं १२९ दिवस. हे घडलं होतं ते १९६० च्या स्पर्धेत.

वैयक्तिक पदकाच्या फेरीसाठी पात्र ठरलेली सर्वात लहान मुलगी अमेरिकेची आहे. हा विक्रम घडला होता तो १९३६ च्या स्पर्धेतच. तो केला होता अमेरिकेच्या मॅरिजोर गेस्त्रिंग हिनं. त्या वेळी तिचं वय होतं १३ वर्षं २६८ दिवस.

सर्वात कमी वयाची स्पर्धक आहे इटलीची जिम्नॅस्ट लुइगिना गिआवोत्ती. सन १९२८ च्या स्पर्धेत ती खेळली होती. तेव्हा तिचं वय होतं ११ वर्षं ३०१ दिवस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT