file photo
file photo 
सप्तरंग

संत तेथे विवेका असणे कि

डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीत म्हणजेच भावार्थदिपेकेच्या 18 व्या अध्यायात हे विचार फार ठामपणे मांडले आहेत. चंद्र तेथे चंद्रिका। शंभु तेथे अंबिका संत तेथे विवेका। असणे की (ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 ओवी 1632 ) अशी ती सुंदर ओवी आहे. चंद्र आणि चांदणे, शंभु आणि अंबिका हे एकमेकांपासून विलग असु शकत नाहीत. तसेच संत सदैव विवेकाने, सद्‌सद्विवेकबुद्धि जागृत ठेवून श्रेयस्कर असेच वागत असतात. समाजासाठी योग्य काय आहे आणि अयोग्य काय याची त्यांना जाण असते, भान असते.
या निरक्षीर विवेकाची रुजवण समाजात व्हावी म्हण न लगे मुक्ती धन संपदा संतसंग देई सदा असे संत तुकारामांचे मागणे होते. प्रथम भगती संतन कर संगा ही संत तुलसीदासांची आस होती. ज्ञानदेवांनी पसायदानातून संतांचा समुदाय समाजाला उत्तम वळण लावायला कारणीभूत होतो हा प्रगाढ विश्‍वास बोलूनच दाखवला होता. जीव आणि परमात्मा यांच्यात अद्वैत असते तसे संतांची कथनी आणि करणी यात एकेरुपता असते. अमृतानुभवात पहिल्या अध्यायात ज्ञानदेवांनी अद्वैताच्या संदर्भात सुंदर उदाहरणे दिली आहेत. वाद्याच्या झंकारणाऱ्या दोन तारातून नाद निर्माण होतो, फुले दोन पण सुगंध एकच असतो. दिवे दोन पण तेज एकच दोन ओठांतून एकच शब्द दोन डोळ्यांची दृष्टी या एकरुपत्वाचा उल्लेख ज्ञानदेव करतात. असे एकरुपत्व असाच अभेद संताच्या वागण्यात बोलण्यात असतो. डोळे मिटून विश्‍वास ठेवावा असा त्या संतांचा उपदेश असायचा.
रखरखीत वाळवंटात एखादे हिरवेगार ओअसिस असावे तसा चमत्कार तर चंद्रभागेच्या तीरावर संतांच्या सहवासात घडत होता. अगदी संत जनाबाईनी स्त्रीजन्म लाभला यास्तव मला कधीही उदास व्हावे लागले नाही असे सांगत पंढरीला संतमेळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उलट आजच्या प्रगत विज्ञान -तंत्रज्ञान युगात आधुनिक कवयित्रि सुचकपणे लिहीतात की सगळी सौंदर्य प्रसाधने हातात किणकिणणारा हिरवाचुडा हे सारे शाबूत राखण्याचे कौशल्य आम्ही प्रयासाने प्राप्त केले आहे. विदर्भातील पहिल्या गझलकार कवयित्री आशा पांडे यांच्या अंतरीचे सूर कविता संग्रहातील सराव ही कविता या शब्दातून खूप काही सांगून जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या । या भजनातून संताच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या विचारसरणीची साक्षच आपल्या शब्दातून दिली आहे. या लेखमालेची सांगता करताना वर्तमानाने मन अस्वस्थ होते.
या पार्श्‍वभूमीवर आजच्या संगणक युगातील संत म्हणवणा ऱ्या संतानी आपल्या वागण्याने संतत्वाचा बाजार मांडता येतो हे सिद्ध केले. चिटपाखरुही परवानगीशिवाय आत येणार नाही असे अभेद्य मठ आत विलासासाठी वातानुकुलीत खोल्या नादी लागेलेले हजारो भोळे लोक हे पाहताना जग सगळे हे देखाव्याचे गुलाम केवळ रे स्वार्थाचे या गोविंदाग्रजांच्या विषादपूण4 ओळी आठवल्या.
संत असे तर एकेकाळी ज्ञानी निस्पृहांच्या मार्गदर्शनाखाली राज्य चालवणारे राजकारणी कसे असणार? देवदर्शनासाठी हिमालयात गेले तरी त्यांच्या पायाखाली मखमली गालिचे पसरले जातात. गुहेत ध्यान करताना अष्टदिशातून रोखलेले कॅमेरे ते दृश्‍य जगभर पोहोचवतात. साधेपणा नीतीमानता हे शब्द केवळ शब्दकोशातच अस्तित्वात असावेत असेच आजकाल वाटते.
पाश्‍चात्य जग केवळ स्वार्थी विलासी असा आपला पक्काच समज आहे. पण संदीप वासलेकरांचे एका दिशेचा शोध हे राजहंस प्रकाशनाचे पुस्तक वाचताना आश्‍चर्यचकित होण्याचीच वेळ आली आहे. तिकडच्या उच्चपदस्थांचे साधे निवास नियमितपणा काटेकोर वागणे सारे लक्षात घ्यावे असेच आहे. संत राज्यकर्ते सामान्य नागरिक यांच्याकडून विवेकाची अपेक्षा करणे गैर आहे का?
या संदर्भात भोजराजा आणि कालिदास यांच्या संदर्भातील एक मर्मग्राही कथा मला आठवते. राजा भोज एकदा राणीच्या दालनात गेला तेव्हा राणी तिच्या मैत्रिणीसवे हितगुज करती होती अचानक प्रवेशलेल्या नवऱ्याला पाहून ती एकदम म्हणाली या मूर्खो म्हणजे मूर्खा जा पत्नीने अपने केला असे समजून राजाने जग डोक्‍यावर घेतलेनाही पण तिने असे का म्हटले असावे हे शोधण्यासाठी राजभेत प्रवेशणाऱ्या प्रत्येकाला राजा म्हणू लागला हे मूर्खा जा बाकीचे उच्च पदस्थ चुपचाप खाली माना घालून आसनावर बसले. कालिदास मात्र दे ऐकून निर्भयपणे म्हणला मी खात खात इसके तिकडे फिरत नाही, हसता हसता बोलत नाही, मोठ्या हसत नाही संत न शोच्यम्‌ म्हणजे घडून गेले त्याचा शोक करत बसत नाही आणि दोन माणसे एकांतात काही खाजगी बोलत असताना तिथे परवानगीशिवाय शिरत नाही. मुर्खाच्या या 5 लक्षणापैकी मी काहीच केले नाही, मग मला मुर्ख का म्हणता।? राजा भोजला कळले की राणीबरोबर मैत्रिणीचे हितगुज सुरु असताना आपण परवानगी न मागताच आत शिरलो हे गैर आहे. चतुरपणे वागण्या बोलण्याच्या विवेकाच्या वळणांचा प्रघात असा घालून देता येतो त्यासाठी ज्ञानाचा देखावा करत तत्वज्ञान रटाळपणे प्राचीन काळातले ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटीस नंतर प्लेटो आणि त्यानंतर ऍरिस्टॉटल यांचा वादाचा चिंतनाचा विषय होता की ज्ञानाबरोबरच शहाणपणा येते किंवा नाही आपल्याकडच्या एका लोककथेतही या वादाचे दिलखुलास उत्तर दिले आहे. चार विद्यार्थी त्यातील तिघे मृणाला पुन्हा जिवंत करण्याचे ज्ञान मिळवून गुरुकडून परतत असतात. समोरुन हिंस्त्र प्राणी येताना पाहून चौथा ज्ञान मिळवण्यात मठ्ठ टठरलेला मुलगा झाडावर चढून बसतो. ज्ञान नसले तरी व्यहारातील शहाणपणा त्या जगण्यास हात देते. हे शहाणपण शिकवता आले नाही म्हणून व्यासांनी महाभारताअंती आक्रोश केला . आजचे ज्ञानात विलक्षण वेग असणारे जग पुर्णापासून ढळले आहे खऱ्या संताचे विचार त्याला पुन्हा पुर्णस्वरूपाकडे नेतील असा विश्‍वास वाटतो.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT