santosh dhaybar
santosh dhaybar 
सप्तरंग

टीव्ही तुमच्या हाती... (संतोष धायबर)

संतोष धायबर

घरात एकच दूरचित्रवाणी संच असला, तर तशी अडचणच होते. मात्र, आता काही काळजी नाही. वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून टीव्हीवरचा कोणताही कार्यक्रम घरातला प्रत्येक जण त्याच्या मोबाईलवर आता थेट बघू शकतो. अशाच काही ऍप्सविषयी थोडक्‍यात माहिती...

साधारण तीस वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे 1990 पर्यंतचा काळ असा होता, की फक्त आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या कुटुंबाकडंच टीव्ही होता. तोसुद्धा ब्लॅक अँड व्हाइट (कृष्णधवल). शहरी भागांच्या तुलनेत खेडेगावात, तर संपूर्ण गावासाठी एखादा टीव्ही असायचा, तोसुद्धा बंद कुलपात. मात्र, तीस वर्षांत माहिती-तंत्रज्ञानानं एवढी प्रगती केली आहे, की कुटुंबच काय तर प्रत्येकाच्या "हातात' स्वतंत्र टीव्ही आला आहे. देशातलेच नव्हे, तर परदेशांतले टीव्ही कार्यक्रम कोणत्याही वेळी मोबाईलवर पाहू शकतो.

गूगल प्ले-स्टोअरवर माहिती तंत्रज्ञान, बातम्या, मनोरंजन, क्रीडा, राजकारण, शैक्षणिक, देश-विदेशातल्या विविध टीव्ही वाहिन्यांची मोफत ऍप्स उपलब्ध आहेत. यावरून आपल्याला 24 तास टीव्ही पाहता येतो. थोडक्‍यात, घरामध्ये एकच दूरचित्रवाणी संच असला, तरी काही चिंता नाही. आपल्या आवडीचा कार्यक्रम असो, की क्रिकेटचा सामना- प्रत्येक जण तो आता मोबाईलवर बघू शकतो.

इंडियन मोबाईल टीव्ही (Indian Mobile TV) ः
इंडियन मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून देशातली शंभरहून अधिक टीव्ही वाहिन्या पाहू शकतो. विविध मालिका, बातम्यांचं थेट प्रसारण, मनोरंजन अथवा क्रिकेटचं थेट प्रक्षेपण अशा गोष्टी या ऍपच्या माध्यमातून पाहता येतात. देशातल्या विविध भाषांमधल्या चॅनेल्ससह बॉलिवूडमधील चित्रपटसुद्धा ऑनलाइन पाहण्याची सुविधा या ऍपनं उपलब्ध करून दिली आहे. या ऍपप्रमाणं खासगी वाहिन्यांसह इतरही विविध ऍप्स मोफत उपलब्ध आहेत.

पाकिस्तान टीव्ही लाइव्ह (Pakistan TV LIVE) ः
माहिती-तंत्रत्रानाची प्रगती होईपर्यंत फक्त भारतातल्याच- त्याही मोजक्‍याच वाहिन्या पाहता येत होत्या. परंतु, आता विविध देशांमधल्या वाहिन्यासुद्धा घरबसल्या पाहता येतात. भारतावर वेगवेगळ्या प्रकारे कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानमध्ये सध्या काय सुरू आहे, याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. पाकिस्तान टीव्ही लाइव्ह या ऍपच्या माध्यमातून पाकिस्तानमधल्या विविध टीव्ही वाहिन्या पाहता येतात. पाकिस्तानप्रमाणंच जगभरातल्या विविध देशांची ऍप्स उपलब्ध आहेत.

मनोरंजन ऍप्स (entertainment apps) ः
फावल्या वेळेमध्ये काय करावं, वेळ कसा घालवावा, असा प्रश्न पडत असेल तर गूगल प्ले-स्टोअरवर जाऊन entertainment apps या नावानं सर्च करा. आपल्याला मनोरंजनाचा खजिना उपलब्ध होईल. आबालवृद्धांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थः Talking Tom Cat 2, Angry Birds Classic, Blood Sugar Test Checker Prank, Face Swap.

क्रिकबझ (Cricbuzz - Live Cricket) ः
क्रिकेट हा अनेकांच्या आवडीचा खेळ. परंतु, घरामध्ये टीव्हीवर मालिका सुरू असताना क्रिकेटचा सामना पाहता येत नाही. अशा वेळी Cricbuzz - Live Cricket या ऍपच्या माध्यमातून Live सामना तुम्ही बघू शकता. फक्त सामनाच नाही, तर क्रिकेटविषयी विविध प्रकारची माहिती या ऍपच्या माध्यमातून मिळते. क्रिकेटबरोबरच इतरही खेळांची ऍप्सही अगदी मोफत उपलब्ध आहेत. उदाहरणार्थः Sports Live TV, Hotstar.

राजकारण (politics news app) ः
देश-विदेशातल्या राजकारणाविषयी अनेकांना उत्सुकता असते. राजकारणाविषयी बातम्या देणाऱ्या न्यूज चॅनेल्सची ऍप्स मोबाईलवर डाऊनलोड केल्यास राजकारणाविषयी माहिती आणि थेट प्रक्षेपण सहज पाहायला मिळतं. उदाहरणार्थ ः BBC News, Indian Political News, Saam TV, all Politics US Political News.

राजकारणाप्रमाणंच शैक्षणिक अथवा महिलांसाठी विविध टीव्ही वाहिन्यांची ऍप्स उपलब्ध आहेत. व्याकरण, गणित, विज्ञान अथवा विविध भाषांची माहिती पाहिजे असेल, किंवा इतर काही रंजक कार्यक्रम बघायचा असेल, तर संबंधित ऍप डाऊनलोड करा आणि मोबाईलवर एंजॉय करा. थोडक्‍यात, कृष्णधवल असलेल्या, केवळ काही तास रंजन करणाऱ्या टीव्हीचा जमाना केव्हाच मागं पडला. आता थेट तुमच्या मोबाईलपर्यंत 24 तास अखंड प्रक्षेपण करणाऱ्या शेकडो वाहिन्यांचा खजिना आला आहे. तुम्हीही ती ऍप्स डाऊनलोड करा आणि कार्यक्रमांचा मनमुराद आस्वाद घ्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT