Jay Bhanushali
Jay Bhanushali 
सप्तरंग

‘आहारात सतत बदल हवा’ (जय भानुशाली)

जय भानुशाली

‘वेळ नाही’ या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडा वेळ झटपट व्यायामासाठी तरी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो, तसंच हे आहे असं मला वाटतं. मी जेव्हा सतत तीन-चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो, त्यानंतर एक महिना आराम करतो. सामान्यतः एकाच प्रकारचा आहार मी दीर्घकाळ घेत नाही. दर महिन्याला मी आहारात बदल करतो. एकच आहार तुम्ही दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो.

माझ्या या धकाधकीच्या दिनचर्येतून व्यायामासाठी वेळ काढण्याची खबरदारी मी घेतो. ज्यांच्याकडे जास्त वेळ असतो, किंवा काढता येतो, त्यांनी अवश्‍य जास्त वेळ द्यावा. ‘वेळ नाही’ या सबबीवर कुणीही व्यायाम टाळू नये. जेव्हा तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही दिवसातून थोडावेळ झटपट व्यायामासाठी तरी नक्कीच काढू शकता. आपण चित्रपट पाहण्यासाठी किंवा सहलीसाठी वेळ काढतो, तसंच हे आहे असं मला वाटतं. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण ज्या गुणवत्तेचं अन्न खात होतो, तसं आता मिळत नाही. अनेक उत्पादनांच्या बाबतीत आपण तडजोड करत आहोत आणि त्याची भरपाई फक्त फिट राहूनच होऊ शकते. तुम्ही व्यायाम करता, आणि आतून तुम्हाला हलकं-हलकं वाटतं, तेव्हाच तुम्ही आरोग्यविषयक समस्यांना दूर ठेवून एक निरोगी आयुष्य जगू शकता. माझ्या अनेक मित्रांचं वजन वाढलं होतं; पण दृढनिश्‍चय दाखवून त्यांनी पुन्हा आपला बांधा सुडौल केला आहे आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वासही वाढला आहे.

आरामही गरजेचा
मी जेव्हा सतत तीन-चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो, त्यानंतर एक महिना आराम करतो. सामान्यतः एकाच प्रकारचा आहार मी दीर्घकाळ घेत नाही. दर महिन्याला मी आहारात बदल करतो; कारण जर एकच आहार तुम्ही दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. भारतीय लोक लहानपणापासून डाएटिंग कधीच करत नाहीत, हे लक्षात घ्या. आपल्याला आपलं रोजचं जेवण व्यवस्थित जेवण्याची सवय असते आणि लहानपणी आपलं वजन कधीच वाढलं नाही; कारण तेव्हा आपली शारीरिक कसरतही भरपूर असते. आता दर दोन-तीन महिन्यांनी मी माझा डाएट प्लॅन तपासतो आणि आहारात बदल करतो. रात्री सात वाजल्यानंतर कार्बोहायड्रेट्‌स खाऊ नका आणि रात्रीच्या जेवणात ग्रिल्ड फिश किंवा पॉम्फ्रेट आणि अधिक प्रोटिन्स खा, असं मी नक्की सांगीन. त्याचबरोबर, आपण डाएट करतो, तेव्हा मनानंही दृढ असावं लागतं; कारण सात-आठ दिवस ती दिनचर्या सांभाळणं खूप अवघड होऊन जातं. डाएट सोडून देण्याची इच्छा सुरवातीला होते; पण जर सुरवातीचे काही दिवस तुम्हाला ते जमलं, तर त्याचा तुमच्या शरीरावर छान परिणाम दिसतो आणि तुमची भूक कमी होते.

‘चीट मिल’ किंवा ‘चीट डे’
होय, या गोष्टी मी पाळतो; पण असा एक ठराविक दिवस नसतो. मी याआधी सांगितलं त्याप्रमाणं, मी दोन-तीन महिन्यांच्या वर एकाच डाएट चार्टचं पालन करत नाही आणि त्यानंतर एक महिना थोडा विराम घेतो आणि मग पुन्हा डाएट सुरू करतो. त्यामुळं त्या मधल्या महिन्याभराच्या काळात मी मला आवडणारं सगळं अन्न खातो; पण तरीही खूप जास्त खाणं टाळतो.

व्यायामाचं वेळापत्रक
कधी-कधी धकाधकीच्या दिनचर्येमुळं मी व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही. अशा वेळी मी दोन बॉडी पार्टस् करतो. म्हणजे उदाहरणार्थ, सोमवारी मी चेस्ट आणि ट्रायसेप्सचे व्यायाम करतो, मंगळवारी पाठ आणि बायसेप्सचे, बुधवार आणि गुरुवारी पायाचे व्यायाम करतो. अशा रीतीनं मी संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. मात्र, जेव्हा मी मोकळा असतो, तेव्हा दररोज एक बॉडी पार्ट करतो. त्याचा चांगला फायदा होतो. मी कधीही आठवड्यात सातीच्या साती दिवस व्यायाम करत नाही. मी दोन किंवा तीन दिवस विश्रांती घेतो. कारण, तुमच्या स्नायूंना वाढण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही विश्रांती घेता तेव्हा स्नायू वाढतात. त्यामुळे विश्रांतीनंतर पुन्हा व्यायाम करताना तुम्हाला अधिक ताजंतवानं आणि सशक्त वाटतं.
माझा योगशास्त्रावर विश्‍वास आहे. ते खूप छान आहे; पण प्रत्येक शरीराचं वेगळं असतं. काही वेळा ते सर्वांच्या शरीरासाठी अनुकूल असत नाही. माझ्या बाबतीत सांगायचं झालं, तर मी योगा जास्त करू शकत नाही; कारण माझं शरीर लवचिक नाही, ते ताठर आहे. त्यामुळं योगासनं करायला मला मजा येत नाही. मात्र, माझं आता यापुढचं लक्ष्य आहे ते म्हणजे एक दिवसाआड किंवा आठवड्यातून दोनदा योगासनं करायची. कारण योग ही शरीर आणि मनाच्या शांतीसाठी उत्तम कसरत आहे. जिमिंग केल्यानंतर तुमचं शरीर कडक आणि ताठर होतं. योगामुळं शरीराची लवचिकता टिकून राहते, ज्यामुळं तुम्ही अंतर्बाह्य कणखर होता.

वेळेचं व्यवस्थापन
कधीकधी मित्रमंडळी, कुटुंब आणि काम सांभाळणं जिकिरीचं होतं. कामासाठीच्या कमिटमेंटमुळं कधीकधी काही महत्त्वाचे दिवस आणि गोष्टी निसटून जातात; पण मला जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा मी जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. माझी आई ‘सुपरस्टार सिंगर’ची मोठी चाहती आहे आणि ती हा कार्यक्रम कधीच चुकवत नाही. जेव्हा शक्‍य असतं, तेव्हा मी माझ्या आईलाही सेट्‌सवर घेऊन येतो आणि विश्रांतीच्या वेळेत तिच्यासोबत राहतो. तिलाही प्रत्यक्ष परफॉर्मन्सेस बघायला आवडतात.
सलमान खान हाच माझा फिटनेस आयकॉन आहे. तो या वयातही इतका फिट दिसतो, पन्नाशीतही तो आपला फिटनेस आणि आरोग्याबाबत इतका काटेकोर आहे. त्याच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. कधीकधी मी आमच्या रोजच्या जिम शेड्यूलनं कंटाळतो; पण सलमान कधीच त्याचा वर्कआऊट चुकवत नाही आणि तो ज्या प्रकारे व्यायाम करतो, ते कौतुकास्पद आहे.
‘लीला- एक पहेली’ या चित्रपटासाठी मी वजन कमी केलं होतं. मी एका संगीत दिग्दर्शकाची भूमिका केली होती, ज्यासाठी मला वजन कमी करणं भाग होतं. त्यामुळं मी काही महिने जिममध्ये जायचं बंद केलं. मी व्यायाम सोडला; पण आहाराशी तडजोड केली नाही. तुम्ही जेव्हा व्यायाम करत नाही, तेव्हा तुमचं शरीर शिथिल होतं आणि स्नायू वाढतात.

विशिष्ट प्रकारची दिनचर्या
मी जेव्हा चित्रीकरणासाठी किंवा सेट्‌सवर जातो, तेव्हा स्वतःसोबत रबर केबल्स घेऊन जातो, न चुकता त्या नेहमी माझ्या गाडीत ठेवतो. किंवा प्रदीर्घ आऊटडोअर शूटिंगवर असतो, तेव्हा मी टीआरएक्‍स बेल्ट घेऊन जातो, जो सुटसुटीत असतो आणि त्याच्या मदतीनं सर्व प्रकारचे व्यायाम करता येतात. कारण, प्रत्येक वेळी दूर प्रवास करताना तुम्हाला वेट्‌स बरोबर नेता येत नाहीत, त्यामुळं अशा गोष्टी सोबत नेण्यास सुटसुटीत असतात.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT