Rajaram Pangavane
Rajaram Pangavane esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : कमविलेल्या पैशाचे व्यवस्थापन करा!

सकाळ डिजिटल टीम

राजाराम पानगव्हाणे

आपण शैक्षणिक साक्षर होतो; परंतु आर्थिक साक्षर होत नाही. गणिताची आकडेमोड येणे म्हणजे आर्थिक साक्षरता नक्कीच नाही. आर्थिक साक्षरतेचं पहिलं पाऊल म्हणजे बचतीची सवय होय. पालकांनी आर्थिक साक्षर होऊन आपल्या मुलांना दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनीमधून बचतीची सवय लावणे, ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी.

उधळपट्टी आणि आर्थिक नियोजन यांचा छत्तीसचा आकडा. विद्यार्थिदशेतच आर्थिक नियोजनाचे धडे मिळाले तर संपूर्ण आयुष्य सुख आणि समाधानाने जगता येईल. बचतीबरोबर पहिली कमाई सुयोग्यरित्या कशी वापरावी इथून आर्थिक नियोजनाची यशस्विता सुरू होते. (saptarang latest marathi article by rajaram pangavane on banking sector Manage Earned Money nashik news)

आर्थिक नियोजनाचे महत्त्व आपणास आताच समजले असेल तर आपले वय कितीही असू दे, या क्षणापासून सुरवात करावी. आज पैसा तर सर्वच जण कमवितात; पण आज श्रीमंत व यशस्वी तेच लोक आहेत जे आपला पैसा कुठे खर्च होतो? किती खर्च होतो? त्याची गुंतवणूक कशी आणि कुठे केली जाते आहे? इत्यादी सर्व बाबींचा हिशोब ठेवत असतात.

तसे पाहायला गेले तर आपण दिवसरात्र कष्ट करून जो पैसा कमवितो, तो योग्य कार्यासाठीच, योग्य ठिकाणीच आणि आपल्या अत्यावश्यक गरजा भागविण्यापुरताच खर्च व्हावा, अशी आपली प्रत्येकाची मनापासून इच्छा असते.

कारण आपल्यापैकी कोणालाही आपला कष्टाचा पैसा वायफळ खर्च झालेला चालणार नाही, म्हणून आज बहुतेक जण आपला पैसा कुठे किती आणि कसा खर्च होतो आहे? त्यात किती पैशांची बचत होते आहे? किती पैसे दीर्घकाळासाठी गुंतवले जात आहेत? हे जाणून घेण्यासाठी, तसेच या सर्वांचा हिशोब ठेवण्यासाठी आर्थिक नियोजन या महत्त्वाच्या संकल्पनेचा वापर करत असतात.

पण भारतात अजूनही खूपच कमी असे लोक आहेत, जे आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणतात आणि आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष देतात.

कारण इतर देशांमध्ये जेवढी आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता आहे तेवढी भारतात अजूनही नाही. याला कारण पैसे कमविण्याचा विचार आपण सर्वच जण करतो; पण त्या कमवलेल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे, तो कुठे आणि कसा खर्च करायचा? त्याची गुंतवणूक कुठे करायची? याचा फारसा विचार आपण करत नसतो.

आर्थिक नियोजनाविषयीचे हेच अज्ञान दूर करण्यासाठी आर्थिक नियोजन या महत्त्वाच्या संकल्पनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेतले पाहिजे.

आर्थिक नियोजन करताना...

१) कमाई आणि कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ते आधी बघणे
२) आधी पैशांची बचत करणे
३) पैशांची गुंतवणूक करणे
४) इमरजन्सी फंड तयार करणे
५) महत्त्वाच्या विमा पॉलिसी विकत घेणे
६) प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवणे
७) अनावश्यक खर्च टाळणे
८) आवश्यकता भासल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे
९) आरोग्याची काळजी घेणे

आर्थिक नियोजनात सर्वप्रथम रोख व्यवहार राखणे किंवा रेकॉर्ड करणे, बजेट करणे, अनावश्यक खर्च शोधणे, अशा खर्चामध्ये कपात करणे आणि अधिक बचत करणे ही आर्थिक नियोजन प्रक्रियेची पहिली पायरी आहे.

पैशाची बचत करण्यासाठी योग्य खर्च योजना (उत्पन्न आणि खर्च) आवश्यक आहे. आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरिता आपल्याला एकूण किती पैशांची आवश्यकता आहे, हे आपण आधी यासाठी ठरवून घ्यायला हवे. म्हणजेच किती वय होईपर्यंत आपल्यालाकडे किती पैसा असायला हवा हे आणि तेवढा पैसा प्राप्त करण्यासाठी आपण कुठे गुंतवणूक करायला हवी जेणे करून आपले ध्येय आपणास त्या कालावधीत गाठता येईल.

थोडक्यात, आपले गुंतवणुकीचे एक निश्चित उद्दिष्ट आपणास माहीत असणे गरजेचे आहे. कारण त्यानुसार आपणास किती काळासाठी कुठे आणि किती गुंतवणूक करावी लागणार आहे, हे ठरवायचे असते.

गुंतवणुकीचे नियोजन करताना

गुंतवणुकीची ध्येये अनेक असू शकतात. ज्यात मुलांच्या-मुलीच्या शिक्षणाचा खर्च, वृद्धापकाळासाठी पैशांची बचत, मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी भविष्यात करायचा खर्च, भविष्यात एखादी कार विकत घेण्याचे स्वप्न, स्वतःचा फ्लॅट विकत घेण्याचे स्वप्न अशा अनेक उद्दिष्टांचा समावेश होत असतो.

याचसोबत सध्या आपल्या कुठल्या बँक खात्यात किती पैसे सेव्ह आहेत? आपल्यावर एखादे बँकेचे कर्ज आहे का? आणि असेल तर ते फेडायला किती दिवस अजून लागणार आहेत, हेदेखील बघायला हवे.

आपले गुंतवणुकीचे ध्येय ठरलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी आपण आजपासून रोज किती पैशांची बचत, तसेच दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायला हवी? या सर्व गोष्टींचा आपण आर्थिक नियोजन करताना विचार करणे फार गरजेचे आहे.

कमाई आणि बचतीचे गणित

कमाई आणि कमाईची साधने किती आणि कोणकोणती आहेत ते आधी बघणेही गरजेचे आहे. आर्थिक नियोजनाचा पहिला भाग म्हणजे आपली कमाई किती आहे, हे बघणे. कारण आपली कमाई कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर आपल्याला पाहिजे तेवढी बचत आणि गुंतवणूक करता येत नसते.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

म्हणून आपण आपली कमाई किती होते आहे आणि त्या कमाईची साधने, माध्यमे कोणकोणती आणि किती आहेत, हे देखील बघणे फार गरजेचे असते.

आपल्या प्रत्येकाला सवय असते, की सॅलरी तसेच इन्कम आल्यावर पहिले पैसे खर्च करायचे, मग थोडेफार उरल्यावर सेव्हिंग करायची याने आपल्याला पाहिजे तेवढी पैशांची बचत करता येत नसते.

आपण सर्वच जण एवढेच नाही, तर आर्थिक नियोजनाचे ज्ञान नसलेले शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा आपला छोटासा गल्ला तयार करून पैशांची बचत करत असतात. अडीअडचणींसाठी आपण सर्वच जण पैशांची बचत करत असतो.

पण आपल्यातील खूप कमी जण असतात, जे पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असतात. बचत केल्याने वर्तमानातील तात्पुरता स्वरूपाचा खर्च तर भागवू शकतो. पण भविष्याची मोठमोठी आर्थिक ध्येये, आव्हाने येत असतात. आपल्या गुंतवणुकीने आपल्याला आपल्या पैशांवर कंपाउंडिंग इंटरेस्ट प्राप्त होत असतो, जो खूप अधिक असतो. दिवसेंदिवस त्यात वाढदेखील होत जाते.

येणारे उत्पन्न व खर्च याच प्रत्यक्ष नियमित आढावा आणि गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओ योग्यरितीने करावा. आपले लक्ष्य, जोखीम आणि मालमत्ता वाटपासह संरेखित करते आणि आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करते. या सर्व बाबी आर्थिक सल्लागाराच्या अनुषंगाने केलेल्या आर्थिक नियोजन प्रक्रियेप्रमाणेच आहेत, पण ते दिसते तितके सोपे नाही.

गुंतवणूकदाराचे आकलन, त्याची जोखीम क्षमता, त्यांची एकूण आर्थिक परिस्थिती इत्यादींसह इतर काही चरणे आणि आर्थिक गणनादेखील समाविष्ट आहेत. हे कार्य भरपूर वेळ, ज्ञान आणि कौशल्याची मागणी करते.

म्हणूनच आपले पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यासाठी चांगल्या सल्लागाराची मदत घेऊ शकतो. पण आपणच आर्थिक नियोजनात काळजीपूर्वक लक्ष देऊन आपले जीवन सुखकर करावे. मी माझ्या जीवनातही वरील बाबींचे अनुकरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT