सप्तरंग

मजाच मजा...!

गुडघ्याएवढ्या चिखलात काम करणारी ही व्यक्ती म्हणजे कुणी कामगार असेल असं वाटत होतं; पण...

संदीप काळे

रविवारी मी पाली इथं जाण्यासाठी निघालो. पुणे महामार्ग सोडल्यावर पुढचा रस्ता खराब होता. महाराष्ट्राचा ‘खरा चेहरा’ त्यातून दिसत होता. ‘इमॅजिका’च्या थोडं पुढं गेल्यावर तिवरे पेडली (ता. सुधागड, पाली) हे ठिकाण आलं. पोटात काहीतरी टाकलं पाहिजे असा विचार करत असतानाच ‘शिवराज हॉटेल’ या पाटीकडे लक्ष गेलं. आतमध्ये गेलो. हॉटेलचं काम अजून पूर्ण झालेलं नव्हतं. दुसरीकडे जावं असा विचार करत असतानाच माझ्या कानावर संत तुकाराम महाराजांचा अभंग पडला. एक व्यक्ती भातलावणी करता करता अभंग म्हणत होती. (saptarang-sandip-kale-write-sudhgad-tevre-pedle-namdeo-bhosale-article)

मी त्या व्यक्तीला हाक मारली आणि विचारलं : ‘‘अजून हॉटेल सुरू झालेलं दिसत नाही.’’

ती व्यक्ती म्हणाली : ‘‘नाही अजून.’’

आम्ही बोलत असताना दुसरी एक व्यक्ती फोन घेऊन आली आणि आधीच्या व्यक्तीला म्हणाली : ‘‘साहेब, तुमच्या साहेबांचा फोन आलाय.’’

त्या व्यक्तीनं फोन घेतला आणि ती बोलत बोलत बाजूला गेली. गुडघ्याएवढ्या चिखलात काम करणारी ही व्यक्ती म्हणजे आसपासच्या गावातला कुणी कामगार असेल असं मला वाटत होतं; पण दुसऱ्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला माझ्यासमोरच ‘साहेब’ म्हटल्यावर माझ्या भुवया उंचावल्या.

‘‘ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण?’’ असं मी फोन आणून देणाऱ्या त्या व्यक्तीला विचारलं.

ती व्यक्ती म्हणाली : ‘‘ते मोठे साहेब आहेत.’’

फोनवर बोलण्यासाठी बाजूला गेलेली ती आधीची व्यक्ती बोलणं संपल्यावर परत आली.

मी त्या व्यक्तीला विचारलं : ‘‘सर, शेतीची आवड दिसते तुम्हाला.’’

‘‘हो’’ असं म्हणत ती व्यक्ती भातलावणीत पुन्हा गर्क झाली. मी गप्पांना सुरुवात केल्यावर ती व्यक्ती सांगू लागली :

‘‘आम्ही शेतीचं काम करण्यासाठी मजूर लावत नाही...स्वतःच काम करतो. फार आवश्यकता असेल तेव्हाच मजूर लावतो...’’

त्या व्यक्तीचं नाव डॉ. नामदेव कोंडिबा भोसले (७०५७१८९८८८). भोसले यांच्या समवेत मी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत होतो. वेगळेपण जपणारा हा शेतकरी, अधिकारी अफलातून असल्याचं मला जाणवलं. त्यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी केलेले सगळे प्रयोगही अजब आहेत.भोसले सध्या ‘एमएमआरडीए’ विभागात सहमहानगरआयुक्त या पदावर कार्यरत आहेत.

आपल्या मित्रांना सोबत घेऊन तिवरे पेडली इथं त्यांनी बावीस एकर जमीन खरेदी केली व माळरानावर नंदनवन फुलवलं. भोसले यांच्या पत्नी मुक्ता, तसंच त्यांच्या मैत्रिणी मनीषा कुऱ्हाडे, अस्मिता कालन आणि अन्य २२ जणांनी एकत्रित येऊन ‘मनमुक्त फाउंडेशन’ स्थापन केलं. त्याची टॅगलाईन आहे ‘मजाच मजा’! याच फाउंडेशनच्या माध्यमातून तिथं अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

आंबा नदी आणि आंबा नदीची उपनदी अशा दोन नद्यांचा संगम भोसले यांनी सुरू केलेल्या प्रकल्पाच्या एका कडेला आहे. जिथं हा संगम होतो तिथं एक मोठी तटरक्षक भिंत आहे. बुरूज बांधून तिला किल्ल्याचा आकार देण्यात आला आहे. एका वेळी असंख्य माणसं आंघोळ करू शकतील, असे कुंड व धबधबा तिथं निर्माण करण्याता आला आहे. सर्व जाती-धर्मांचं देवस्थान, सर्व फळझाडांवर फळं सुरक्षित राहावीत यासाठी व्यवस्थित बंदोबस्त, मोठमोठ्या दगडांना कोरीव आकार देऊन त्यांचे तयार करण्यात आलेले प्राणी, इतर लेणी...असे कितीतरी वेगळे प्रयोग मला इथं पहिल्यांदा पाहायला मिळाले. दोन चित्रपटांचं चित्रीकरण एकाच वेळी करता येऊ शकेल एवढी ‘स्पेस’ इथं आहे. कबड्डी, खो-खो, लिंगोर, लगोरी असे मातीतले खेळ खेळण्याचीही सोय आहे. झोक्यापासून ते चिमणीच्या खोप्यापर्यंत सर्व काही इथं असल्याचं दिसलं.

‘‘एवढा मोठा प्रकल्प तुम्हाला का करावासा वाटला?’’ माझ्या या प्रश्नावर भोसले म्हणाले : ‘‘मी आधी खूप नकारात्मक विचारांचा होतो. माझ्यात ‘इगो’ही होता. सन २००८ मध्ये मी ‘लँडमार्क’चा कोर्स केला आणि, मी कोण आहे, याची मला जाणीव झाली. रामदेवबाबा यांच्या योगापासून मी नव्या आयुष्याला सुरुवात केली. सर्व धर्मांचे ग्रंथ वाचले. माझ्यातला साचेबद्धपणा गळून पडला. सन २००९ मध्ये आम्ही मित्रांनी ‘लाइफ इज ब्यूटीफुल’ या संकल्पनेची सुरुवात केली आणि आपण सतत आनंदी राहिलं पाहिजे, यासाठी एक चळवळ उभारली. व्याख्यानं देणं, समविचारी मित्रांचे ग्रुप तयार करणं हे सुरू केलं. माझी पत्नी मुक्ता समुपदेशक म्हणून काम करते. आता या बावीस एकरांमध्ये उभ्या राहिलेल्या प्रकल्पात ‘पंचतत्त्वं आणि इंद्रियं यांचं मीलन’ घडवण्याचं काम होणार आहे! धर्माची शिकवण मानवतेसाठीच आहे हे सांगण्यासाठी इथं अनेक कोर्सची सुरुवात केली जाणार आहे. शिवाय, अनाथ मुलं आणि विधवा यांच्या पुनर्वसनाचं कामही याच प्रकल्पाद्वारे केलं जाईल.’’ गावसंस्कृती आणि पंचतत्त्वांच्या शुद्धीकरणासाठी जगातल्या अनेक तत्त्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाचाही बैठक इथं कशी असणार आहे ते भोसले यांनी मला तपशीलवार सांगितलं.

आम्ही जेवायला बसलो. ताटाभोवती मांजर, ससा, कुत्रे, पोपट, कावळे जमले. ‘आम्हालाही जेवायला द्या,’ असं आपापल्या भाषेत ओरडून म्हणू लागले! जेवायचं सोडून भोसले त्या सर्व प्राण्यांना भरवू लागले.

भोसले म्हणाले : ‘‘माझं गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवल्याजवळचं हगवणेवाडी (शिवाजीनगर) हे. वडिलांची थोडीशी शेती होती. त्या शेतीत काम करत करत मी मोठा झालो. मी तीन वर्षांचा असताना आई गेली. माझ्या काकूनं माझा सांभाळ केला. माझे वडीलही गेले. वडील असताना गावी जेवायला बसलो की पहिला घास गाईला, प्राण्याला आणि मग स्वतः जेवायचं. आपल्या ताटाभोवती आता जसा गोतावळा आहे ना? तसा गोतावळ बाबांच्या ताटाभोवती असे. बाबा असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता...’’ वडिलांच्या आठवणींनी भोसले एकदम भावूक झाले.

भोसले यांच्या या प्रकल्पाच्या ठिकाणी जिकडं पाहावं तिकडं ‘मजाच मजा’ हे घोषवाक्य वाचायला मिळतं. एकंदर, हा प्रकल्प काही वेगळाच आहे. काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांना मानवतेसाठी काही वेगळेपण जपायचं असल्यास हा प्रकल्प त्यांची इच्छापूर्ती करणारा ठरेल. ‘मजाच मजा’ असं मनाशी म्हणत आणि भोसले यांचा निरोप घेत मी माझ्या वाटेला लागलो.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT