फारूख अब्दुल्ला, माजी केंद्रीय मंत्री Sakal
सप्तरंग

उदार राष्ट्रवादाचा पाईक

त्यांच्या शहरातल्याच नव्हे, तर देशातल्या अनेक भागांतल्या हजारो लोकांचं असीम प्रेम त्यांना लाभलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

आगामी पिढ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शरद पवार यांनी उभारलेल्या मोठ्या शिक्षण संस्था मी पाहिल्या आहेत. सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचं संग्रहालयही मी पाहिलंय. त्यांना मिळालेल्या सगळ्या वस्तू देशवासीयांना पाहण्यासाठी खुल्या आहेत. त्यांच्या शहरातल्याच नव्हे, तर देशातल्या अनेक भागांतल्या हजारो लोकांचं असीम प्रेम त्यांना लाभलं आहे.

- फारूख अब्दुल्ला, माजी केंद्रीय मंत्री


माझे वडील जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत मीदेखील होतो. त्या वेळी आमची पहिली भेट झाल्याचं मला आठवतं. त्या वेळी फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या प्रगतीचा विचार मला त्यांच्यामध्ये दिसला. जम्मू-काश्मीरमध्ये जे उद्योग सुरू करू शकतील, अशा काही उद्योगपतींच्या भेटी घडवून आणण्यासाठी त्यांनी माझ्या वडलांना मोलाची मदत केली. ते ‘बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया’चे (बीसीसीआय) अध्यक्ष असताना मी त्यांना अनेक वेळा भेटलो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत मी औरंगाबादला गेल्याची घटनाही माझ्या ठळकपणे लक्षात आहे. तिथे एका जाहीर सभेत शरद यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश करण्याची घोषणा केली होती.

शरद पावर हे धर्मनिरपेक्ष आणि महान राष्ट्रवादी नेते आहेत. त्यांनी संरक्षणमंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री म्हणून देशासाठी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांचे जन्मगाव असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती इथे गेल्याचंही माझ्या स्मरणात आहे. तिथे कृषी आणि अन्नधान्य क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेलं परिवर्तन मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांचं अशाचप्रकारचं काम मी फळांच्या उत्पादनातही पाहिलं आहे. या क्षेत्रात इस्राईलची ठिबक सिंचनाची पद्धत अमलात आणणारे ते पहिले आहेत. याचा परिणाम म्हणून डाळिंब, द्राक्षं आणि अन्य फळांच्या उत्पादनात महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात अग्रेसर झाला.

आगामी पिढ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी त्यांनी उभारलेल्या मोठ्या शिक्षण संस्थाही मी पाहिल्या आहेत. सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचं संग्रहालयही मी पाहिलंय. त्यांना मिळालेल्या सगळ्या वस्तू देशवासीयांना पाहण्यासाठी खुल्या आहेत. त्यांच्या शहरातल्याच नव्हे, तर देशातल्या अनेक भागांतल्या हजारो लोकांचं असीम प्रेम त्यांना लाभलं आहे. त्यांनी या शहरातून अनेक वैमानिकांनाही प्रोत्साहन दिलं आणि त्यातून अनेक हरहुन्नरी वैमानिकही घडले आहेत.

देशासाठीचं त्यांचं योगदान अनमोल आहे. ते एक सच्चे मित्र आहेत आणि मित्रांच्या अडीअडचणीला ते तातडीनं धावून येतात. एक दिवस ते नक्कीच देशाचे पंतप्रधान होतील, अशी मला खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT