भारतरत्न लता मंगेशकर, जगद्विख्यात पार्श्वगायिका Sakal
सप्तरंग

दूरदर्शी, वत्सल नेता

शरद पवारांशी माझी अनेकदा भेट झाली आहे. प्रत्येक वेळी त्यांच्यात माझ्या गाण्यांबद्दलचे प्रेम आणि माझ्याविषयीचा आदर पाहायला मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारतरत्न सन्मान मिळाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar)यांनी माझ्यासाठी मोठ्या मेजवानीचे आयोजन केले. त्या समारंभात त्यांनी प्रसिद्ध गायिका मालिनी राजूरकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. पवारांनाही शास्त्रीय गायनाची आवड आहे, ही गोष्ट मला तेव्हा समजली. दिल्लीत हा समारंभ झाल्यावर त्यांनी माझ्यासाठी मुंबईतही (Mumbai)दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांच्या उपस्थितीत एक मेजवानी आयोजित केली होती.

- भारतरत्न लता मंगेशकर, जगद्विख्यात पार्श्वगायिका

शरद पवारांशी माझी अनेकदा भेट झाली आहे. प्रत्येक वेळी त्यांच्यात माझ्या गाण्यांबद्दलचे प्रेम आणि माझ्याविषयीचा आदर पाहायला मिळाला आहे. आमच्यातील संबंध कसकसे दृढ होत गेले, याचा पट त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने डोळ्यांसमोर येतो आहे. आमची पहिली भेट कधी झाली होती, हे मला आता आठवत नाही. परंतु अचाट स्मरणशक्ती असलेले पवार ते नक्की सांगू शकतील, याची मला खात्री आहे.

‘काही कलाकारांना एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आलात आणि हे पारितोषिक स्वीकारलेत, तर मला आनंद होईल,’ असे कळवण्यासाठी त्यांनी मला फोन केला होता. ते आमचे सुरुवातीच्या काळातील संभाषण होते.

त्यानंतर आम्ही भेटत राहिलो, एकमेकांच्या संपर्कात राहिलो. आमच्या घरातील किंवा सामाईक संबंध वा संपर्कातील कोणाचा वाढदिवस, इतर सामाजिक समारंभ असेल, तर त्या वेळी पवारांकडून शुभेच्छापत्र ठरलेलेच. माझ्याविषयी पवार कुटुंबीयांना विशेष आदर आणि प्रेम आहे. मी एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी बारामतीला गेले असता, पवारांनी मला त्यांच्या घरी नेले, त्यानंतर आम्ही एकत्र जेवण केले. त्या जेवणातील प्रत्येक पदार्थ अत्यंत चवदार होता.

एक घटना मला आठवतेय. पवार एकदा मला दिल्लीत राजीव गांधींना भेटायला घेऊन गेले होते. माझी स्तुती करताना ते म्हणाले, की या आहेत आपल्या देशाच्या आत्म्याचा आवाज. त्यांनी आता वयाची साठी गाठली आहे, पण त्यांचा आवाज आजही किती तरुण आहे! तेव्हा ‘एका स्त्रीचे वय कशाला उघड करता,’ अशा शब्दांत राजीव गांधींनीही तितक्याच नर्मविनोदी शैलीत पवारांना उत्तर दिले होते.

मला भारतरत्न सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी मोठ्या मेजवानीचे आयोजन केले. त्या समारंभात त्यांनी ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. पवारांनाही शास्त्रीय गायनाची आवड आहे, ही गोष्ट मला तेव्हा समजली. दिल्लीत हा समारंभ झाल्यावर त्यांनी मी मुंबईत परतल्यावर मुंबईतही अशाच मेजवानीचे आयोजन केले. तो समारंभ दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांच्या उपस्थितीत पार पडला. खरंतर त्यांना हे सगळे करण्याची काही गरज नव्हती. परंतु या गोष्टी त्यांच्या स्वभावात आहेत. त्यांच्या जवळच्या माणसांना खूष ठेवायला त्यांना आवडते.

पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे एक अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री होते. पुण्यात एक हॉस्पिटल उभारण्याचा माझा मनसुबा मी त्यांना सांगितला, तेव्हा त्यांनी त्यासाठी सुयोग्य जागा निवडण्यासाठी आम्हाला तातडीने मदत केली. आज हे हॉस्पिटल शहरातील सर्वोत्तम पाच हॉस्पिटलमध्ये गणले जाते.

माझ्या क्रिकेटप्रेमाचीही त्यांना माहिती आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व क्रिकेट खेळाडूंसह दिल्लीत एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष म्हणून पवारांनी या पार्टीचे आयोजन केले होते. त्या वेळी त्यांनी मला तेथे आवर्जून निमंत्रित केले होते. सगळ्या प्रसिद्ध खेळाडूंसोबतची ती मेजवानी माझ्यासाठी एक पर्वणी ठरली.

राजकारणात अनेक गोष्टी, चढ-उतार चालत असतात, पण तरीही मला पवारांबद्दल खूप आदर आहे. कोणता पक्ष कसे काम करतो, कोणत्या विचारसरणीने काम करतो, हे महत्त्वाचे नाही. परंतु त्या पक्षासोबत जोडली गेलेली माणसे कशी आहेत, हे महत्त्वाचे आहे. त्यांनी एकदा मला राजकारणात येण्याचा सल्ला दिला. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना अगदी नम्रपणे नकार दिला. राजकारण आणि संगीत ही दोन्ही महत्त्वाची आणि स्वतंत्र क्षेत्रे आहेत, ती तशीच राहू द्या, असे मी त्यांना सांगितले.

अलीकडेच ते घरात पडले आणि त्यांच्या पाठीला दुखापत झाली. त्या वेळी त्यांची चौकशी करण्यासाठी मी त्यांच्याशी बोलले. तेव्हा ते म्हणाले, की ‘माझी तब्येत सुधारते आहे. आपले खूप आभार.’ त्यावर मी त्यांना विचारले, की तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? त्यावर ते म्हणाले, की ‘माझ्या संपूर्ण आयुष्यात मी जितकी गाणी ऐकली नसतील तेवढी गाणी मी आता आजारी असल्यामुळे ऐकतो आहे. त्यातील जवळपास प्रत्येक गाण्यात तुमचा स्वर्गीय आवाज आहे.’

त्यांनी मुख्यमंत्री म्हणून खूप काम केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा लाभ अनेक गावांना मिळाला आहे. बारामतीचेच बघा ना, त्यांनी बारामतीचा कायापालट एका आशादायी केंद्रामध्ये केला आहे. त्यांना मी एकदा सहजच विचारले, की तुम्ही पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का होत नाही? त्यावर ते म्हणाले, की मी आता पाचव्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही. पण माझे कार्य मी सुरू ठेवीन.’ त्यांच्या सामाजिक-राजकीय कार्याचा हा झरा आजही अविरत वाहतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT