सप्तरंग

#ShirolCancer कॅन्सर रोखण्यावर प्रथम भर द्यायला हवा -  डॉ. आशुतोष पाटील 

सकाळ वृत्तसेवा

प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ? 

उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक पद्धतीचा असतो. पण आता यावर गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. 

प्रश्न : शिरोळ तालुक्‍यातील सुपीकता हाच कॅन्सरसाठी शाप ठरला आहे का? 

उत्तर : ज्यावेळी हा विषय चर्चेत आला, त्यावेळी मी शेतकरी संघटनेशी संपर्क करून काही प्रयोगशाळेमध्ये मातीच्या टेस्ट घेतल्या. शिवाय पाण्याची सुद्धा टेस्ट केल्या. रायचूर अॅर्गीकल्चर अँड सायन्स या विद्यापीठामध्ये भाजीपाल्यासह 350 सॅम्पल शिरोळ मधील वेगवेगळ्या भागातून गोळा पाठवले. पंचगंगेच्या वेगवेगळ्या भागातून पाण्याचे नमुने घेतले. संशोधनाचा तपशील थेट कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत दाखवला. पाण्यात अॅसिडिक आणि लीडचे प्रमाण जास्त आहे. भाजीपाल्यामध्ये पायरोपसाईट्‌स ऑरगॅनिक फॉस्फरस हे घटक दिसतात. जे मिनिमम रेसिडीअल व्हॅल्यूपेक्षा जास्त आहेत. डायरेक्‍ट दोन्ही गोष्टींच्या कोओर्डीनेशन एकदम लावणे शक्‍य नाही. हा रिसर्च आहे याला वेळ लागणार आपण जे खातो, पाणी पितो यातून जे घटक घेतो ते शरीराला हानिकारक आहेत. 

प्रश्न:  या संशोधनासाठी रायचूर विद्यापीठच का ? 

उत्तर : त्या विद्यापीठात मी स्वतः काम करतो. त्याचबरोबर मी बंगळुरू विद्यापीठाला यासाठी संपर्क केला होता. त्यांनी सांगितले की रायचूर विद्यापीठ हे चांगल्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्यांच्याकडे टेक्‍नॉलॉजी आहे आणि ते रिसर्चवर उत्तमप्रकारे काम करतात. 

प्रश्न : कोणत्या भाजीपाल्यामध्ये आणि पाण्यामध्ये असे घटक आहेत ज्यामुळे कॅन्सर होतो असे आढळले ? 
उत्तर :
शरीरात पेस्ट्रिसाईड न जाण चांगलं. पेस्टीसाईज जेव्हा सापडतात तेव्हा नॉनहोस्टींग इंफॉर्मासारख्या गोष्टीवर कोइन्फॉर मेशन लावण्यास सुरु केले, हे निश्‍चितपणे घातक आहे. त्याला कानाडोळा करू नये .हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. एका क्षणात त्याचा कॅल्क्‍युलेशन करता येत नाही. मात्र हे घटक शरीराला हानिकारक आहेत. परदेशात जो रिसर्च पेपर आला त्यामध्ये रॉंडअप नावाचे जे सोल्युशन ( कीटकनाशक) आहे त्यावर बंदी आणली तसेच दंड ठोठावला आहे. अडचण अशी आहे की त्यांच्याकडे ते लगेच लागू करतात. आपल्याकडे तसं नाही होत. 

प्रश्न : शिरोळमध्ये भाजीपाल्यात, शेतामध्ये कॅन्सरचे प्रमाण किती आहे ? नेमके कीटकनाशकांमुळे हे झाले आहे का ? 
उत्तर :
सर्व शेतकरी सगळी कीटकनाशके वापरतात असं म्हणता येणार नाही. तसेच सगळ्या शेतकऱ्यांच्या विरोधात हे केलेले नाही. सगळ्या तरुण शेतकऱ्यांचा याला पाठिंबा आहे. कोणते किडनाशक किती वापरावे याचे आपल्याकडे शेतकऱ्यांना योग्य माहिती नाही. ते निरागस आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांना समजायला थोडा वेळ लागेल . 

प्रश्न : यावर नेमका उपाय काय करायला पाहिजे ? कॅन्सर रजिस्ट्रीमधून रुग्नांची आकडेवारी काढता येईल का ? 
उत्तर :
याची आकडेवारी निश्‍चित सागंता येणार नाही. सर्वांनी मिळून कॅन्सर रोखण्यावर काम करायला हवे. हवा, पाणी, मातीचे प्रदूषण होत आहे. मुख्यतः यावरती काम करायला हवे. कुटुंबात एखादयाला कॅन्सर होतो, त्यावेळी त्याच पूर्ण कुटुंब निराशाच्या गर्तेत सापडत. रुग्णाकडे बघण्याची सामाजिक प्रवृत्ती वेगळी आहे. शिवाय रुग्णामध्ये नकारात्मक भावना असते की ते समाजात मिसळायला तयार होत नाहीत. कोणत्याही गोष्टीवर फक्त प्रिव्हेंशनने टक्के कमी करता येतात. तर करण्यास काही हरकत नाही. 

प्रश्न : प्रिव्हेंशन म्हणजे नेमकं काय ? लोकांमध्ये काय जाणीव जागृती व्हायला पाहिजे ? 

उत्तर : प्रिव्हेंशन म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वाद न करता .ती गोष्ट समजून घेऊन त्यावर काम करायला पाहिजे. ज्या पद्धतीचे घटक शरीरात चालले आहेत यावर काम करायला पाहिजे. जसं की, पंचगंगा नदीमध्ये एवढे हेवी मटेरीअल सापडतात त्याअर्थी प्रदूषण मुक्त पंचगंगा कशी करता येईल हे पाहणे गरजेचे आहे . त्याचबरोबर शेतकऱ्यांना जाणीवजागृती करण्यासाठी वेगवेगळी ट्रेनिंग, कॅम्प सुरु करायला पाहिजेत. त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि नवीन गोष्टी सांगितल्या पाहिजेत. इतर देशातसुद्धा रासायनिक शेती केली जाते. मात्र मार्केटमध्ये जेव्हा वस्तू येतात तेव्हा त्यांच्या पदार्थात कोणतेही घटक सापडत नाहीत. कशा पद्धतीने त्यात बदल केले जातात हे पहिले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग गरजेचं आहे. 

प्रश्न : रुग्णांची संख्या कशी ओळखली जाते ? याचे सर्व्हे कसे केले जातात ? 
उत्तर :
एकदम असं सांगता येणार नाही. याचा सर्व्हे डोअर टू डोअर होणे गरजेचं आहे. जोपर्यंत तालुक्‍यांचा सर्व्हे होत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही . सध्या कॅन्सर हॉस्पिटल, आणि रुग्णांची संख्या वाढली आहे 

प्रश्न : कोणत्या प्रकारच्या रूग्णांची संख्या वाढली आहे ? कोणत्या कीटकनाशकांचा अंश आहे ज्यामुळे कॅन्सर होतो ? 
उत्तर :
रक्ताशी रिलिटेड कॅन्सर असू शकतात. ज्यांना कोणतेही व्यसन नाही. बेळगावच्या भागात तोंड्याच्या कॅन्सरचे पेशंट जास्त आहेत. हा तंबाखु आणि सिगारेटमुळे झालेला कॅन्सर आहे. 

प्रश्न : शेतकरी संघटनेने कोणत्या पद्धतीने जनजागृती केली आहे ? 
उत्तर :
शेतकरी संघटना ही संपूर्ण झोकून देऊन काम करणारी संघटना आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे याला वाचा फुटली आहे. नाहीतर हे शक्‍य नाही. ही संघटना पुढे शेतकऱ्यांचे चांगले काय करायचे दाखवू शकतील. त्यातून ते मार्ग काढू शकतील. 

प्रश्न : शेतकऱ्यांनी किंवा सामान्य माणसांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत ? 
उत्तर :
कोणावर अवलंबून न राहता स्वतःच याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रिव्हेंशनवर जर काम करायची तयारी असेल तर हा प्रश्न आपण सरकारपेक्षा आपण आधी सोडवू शकतो . 

प्रश्न : कोल्हापूर हे पर्यटन स्थळ आहे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भाजीपाला, फळे खावी कि खाऊ नये याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ? काय सांगाल ? 
उत्तर :
तरुण शेतकरी पिढी प्रामुख्याने उस्फुर्तपणे यामध्ये जनजागृती करत आहेत . आपल्याकडे बेसिक सक्षम अशी यंत्रणा नाही . भाजीपाल्यावर किती प्रमाणात किडनाशके फवारली जावीत या विषयी ज्ञान नाही . त्यामुळे तरुण शेतकरी जर पुढाकार घेऊन काम करू लागला तर यावर मात करता येईल. केवळ जाणीव आणि जागृतीमुळेच यावर मात करता येऊ शकते .  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT