Disha-Patani
Disha-Patani 
सप्तरंग

नृत्याला सर्वाधिक महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

स्लीम फिट - दिशा पटानी, अभिनेत्री
फिट राहणे हे प्रत्येकाच्याच दृष्टीने महत्त्वाचे असते. मीही याला जास्त महत्त्व देते. यामुळे मी माझे डाएट खूप सिरियसली करते. प्रोटीन आणि व्हिटॅमीन असणारे पदार्थ घेण्याकडे माझा कटाक्ष असतो. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी दोन अंडी, टोस्ट, दूध आणि ज्युस घेते. कधीतरी बदल म्हणून कडधान्य आणि दूध घेते. दुपारच्या रात्रीच्या जेवणात मी ताजी फळे आणि ज्युस घेण्याला प्राधान्य देते; तर रात्रीच्या जेवणात भाज्यांचे सलाड, ब्राऊन राईस आणि डाळ घेते. भूक लागल्यास मी सोबत बदाम आणि शेंगदाणे ठेवते. शक्यतो संध्याकाळच्या वेळेस मी ते खाते. माझ्या डाएटमध्ये फक्त सलाड आणि सूप असे नसते, त्यात विविधता असते. तसेच आठवड्यातून एक दिवस मी चीट डे ठेवते, या दिवशी मी माझ्या आवडीचे पदार्थ खाते. दुपारच्या जेवणात मी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन मिळेल असे पदार्थ खाते. यामध्ये भात, चिकन असेही खाते; तर रात्रीच्या जेवणातून प्रोटीन मिळतील असेच पदार्थ खाते. 

वर्कआउटमध्ये मी व्यायाम, नृत्य, स्विमिंग, वेट ट्रेनिंग, योगा करते. यामध्ये मी नृत्याला सर्वाधिक महत्त्व देते. यासाठी मी नवीन नृत्याचा प्रकारही शिकत आहे. मी स्वतः जिम्नॅस्टिक करणारी आहे. त्यामुळे मी आठवड्यातून ४ वेळा जीमला जाते. मला व्यायाम करणे टाळायला अजिबात आवडत नाही. या ४ दिवसात मी दिवसातून २ वेळा जीम करते. यामध्ये मी एक वेळा फक्त कार्डिओ करते तर दुसऱ्या वेळेस वेट ट्रेनिंग करते. दिवसातून एक तास म्हणजेच रोज सकाळी मी योगा करते. यासोबतच योग्य झोपही महत्त्वाची आहे. मी दिवसातून ८ तास झोप घेते. योग्य प्रमाणात पाणी पिण्याने त्वचा तर चांगली राहतेच पण त्याचबरोबर तुमचा मेटाबोलिझमही चांगला राहतो; पण फिट राहायचे किंवा बारीक व्हायचे आहे म्हणून कधीही जेवण टाळू नका. किंबहुना, तुम्ही जास्त वेळा जेवलात तरी चालेल. बरेच जण दिवसातून ५ वेळा जेवतात. कारण पोट भरलेले असल्याने बाहेरचे काहीही अनहेल्दी पदार्थ खाण्याची तुमची इच्छा होत नाही. पण जे काही खाणार आहात, त्यातून आपल्याला नक्की काय मिळणार आहे, याच्याकडे मात्र लक्ष दिले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT