kriti sanon
kriti sanon 
सप्तरंग

हेल्दी आणि आनंदी!

सकाळ वृत्तसेवा

स्लीम फिट - क्रिती सेनन, अभिनेत्री
माझ्यासाठी आपण फिट असणे म्हणजे हेल्दी असणे, असा अर्थ आहे. याचाच अर्थ तुमची प्रतिकारशक्ती चांगली असते, तुमच्या शरीरातील संतुलन चांगले असते, तुमचा स्टॅमिना चांगला असतो. म्हणूनच मी म्हणते, फिट असणे म्हणजे हेल्दी आणि आनंदी असणे होय. 

मी आधीपासूनच बारीक असल्याने मला वजन कमी करण्याची कधी गरजच भासली नाही. मी उंचही असल्याने आहे त्यापेक्षा बारीक दिसते. मला मी शेवटचे कार्डिओ कधी केले, हे आठवतच नाही. कार्डिओ माझ्यासाठी उपयोगीही ठरत नव्हते. मात्र मला मसल्स बनवण्यासाठी व्यायाम करावाच लागतो. व्यायामासाठी मी थोडी आळशी आहे. त्यामुळे जिम करून घेण्यासाठी व स्वतःला व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मी एक ट्रेनर घेतला आहे. वेट ट्रेनिंग करत राहणे हे खूप कंटाळवाणे आहे. त्यामुळे मी एकाच प्रकारचे व्यायाम न करता, त्यामध्ये विविधता आणते. त्याचबरोबर नृत्य हा देखील एक चांगला वर्कआऊटचा प्रकार आहे. मी लहानपणापासून कथक करते, पण मला फक्त शास्त्रीय नृत्य करण्याऐवजी विविध नृत्यांचे प्रकार करायला आवडतात. आठवड्यातून २ ते ३ वेळा व्यायामाऐवजी नृत्य करते. शूटिंगच्या निमित्ताने मला बाहेर राहावे लागते, अशावेळी मी जवळ कोणती जीम आहे का ते पाहते. तिथे जाऊन मला एकटीला शक्य असतील तेवढे व्यायाम करते. जिमही नसल्यास माझी ट्रेनर मला शेड्यूल ठरवून देते. त्याप्रमाणे मी धावायला जाते आणि योगासने करते. 

माझे डाएट खूप साधे आहे. सकाळच्या नाश्‍त्यामध्ये मी दोन अंडी, दोन ब्राऊन ब्रेड, एक ग्लास ज्यूस किंवा प्रोटीन शेक घेते. दुपारच्या जेवणात २ चपाती, ब्राऊन राइस, भाजी किंवा मासे खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये एक कप मक्याचे दाणे किंवा प्रोटीन शेक घेते. माझे रात्रीचे जेवण हे दुपारच्या जेवणापेक्षा हलके असते. यामध्ये भात आणि चिकन करी किंवा वरण, भात आणि भाजी खाते. झोपण्यापूर्वी आपल्याला काहीतरी खायला पाहिजे असे वाटल्यास, मी सूप किंवा सलाड घेते. खूप व्यग्र असल्याने खाण्यासाठी वेळ द्यायला न जमल्यास मी सोबत नेहमी सुकामेवा ठेवते. खजूर खाल्ल्यास तुम्हाला खूप लवकर ऊर्जा मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठी कोंडी; पुण्याहून कोल्हापूरला जाणारी वाहतूक संथ गतीने

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT