Senses sakal
सप्तरंग

जाणिवांचा नाद!

असं म्हणतात सकल विश्वाची निर्मिती एकाच ऊर्जेच्या स्रोतातून झाली आहे. त्या ऊर्जेचा अंश चराचरात आहे. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत आहे.

अवतरण टीम

- सोनाली लोहार, sonali.lohar@gmail.com

असं म्हणतात सकल विश्वाची निर्मिती एकाच ऊर्जेच्या स्रोतातून झाली आहे. त्या ऊर्जेचा अंश चराचरात आहे. प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत आहे. हे सत्य समजलं तर विश्वबंधुत्व ही संकल्पना समजणंही फारसं अवघड नाही. तुझ्यातली ऊर्जा आणि माझ्यातली ऊर्जा ही एकाच ऊर्जेचा अंश असेल, तर तुझी वेदना आणि तुझा हर्ष हा माझ्याच वेदना आणि आनंदाचा भाग नव्हे का? मी म्हणजेच तू नव्हे का?

चार-पाच दिवसांपूर्वीची गोष्ट. क्लिनिकहून घरी यायला उशीर झाला होता. दिवसभराचा प्रचंड थकवा. मोबाईल सायलेंटवर होता. तो घरी आल्यावरच पाहिला. डीसीपी रश्मी करंदीकर यांचे फोन, मेसेजेस येऊन गेलेले. अर्जन्सी जाणवली, लगेच कॉल केला. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या एका सात-आठ वर्षांच्या मुलाला तातडीने कॅन्सर सर्जरीची आवश्यकता होती.

रश्मी कागदोपत्री पूर्तता करून कशी मदत करता येईल, या विवंचनेत होत्या. पुढचे दोन तास फोनाफोनीत गेले. अनेक पर्यायांसाठी मित्र-मैत्रिणी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचे हाताला हात जोडले गेले. आत्यंतिक कळवळ्याने सगळेच सहृद कामाला लागले आणि त्या चिमुकल्याला मदतीचा हात मिळाला. शेवटचा फोन ठेवला तेव्हा जाणवलं, थकवा पळून गेलाय. रात्री शांत झोप लागली. ही सगळी मंडळी इतक्या रात्री आपापली कामं सोडून ज्या शुद्ध आणि निरपेक्ष जाणिवेने एकत्र आली त्याला काय म्हणायचं... सोहम्?

भगवान रमण महर्षींची एक फार सुंदर कथा आहे. एकदा महर्षींच्या आश्रमात इंद्रा नावाची एक पाच वर्षांची अल्लड कन्या आली. इंद्राच्या हातात आश्रमातलं एक संस्कृत पुस्तक पडलं. इंद्राला तर फक्त तेलुगूच यायचं. ती पुस्तक महर्षींकडे घेऊन गेली आणि त्यातल्या एका ओळीवर बोट ठेवून त्याचा अर्थ विचारला. ती ओळ होती ‘देहम् नाहम् कोहम् सोहम्’. महर्षींनी इंद्राला विचारलं, ‘अम्मा, तू किती सुंदर परकर-पोलका घातलायस गं. तुझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या पण किती सुरेख आहेत. मला सांग, हा परकर-पोलका म्हणजेच तू का? या बांगड्या म्हणजे इंद्रा का?’

यावर इंद्रा म्हणाली, ‘नाही. हे सगळं माझंच आहे, पण हे म्हणजे मी नाही.’

महर्षी म्हणाले, ‘अगदी बरोबर, शरीराचंसुद्धा तसंच असतं. ते थोड्या काळासाठी तुझं आहे; पण लक्षात ठेव, की शरीर म्हणजे तू नव्हे. मग तू कोण, प्रश्न विचार.. कोहम? उत्तर येईल, सोहम.. म्हणजेच, मीच शिव, मीच ब्रह्म, मीच तत्त्व, मीच विश्व.’

हे इतकं प्रगाढ तत्त्वज्ञान छोट्याशा इंद्राला कितपत समजलं असेल, याची कल्पना नाही; पण दोनच महिन्याने एका गंभीर आजाराशी लढताना इंद्रा अनंतात विलीन झाली. मृत्युसमयी तिच्यामुखी एकच जप होता ‘देहम् नाहम् कोहम् सोहम्’.

कोहम्? जन्मताना पहिला क्यँहा केला तेव्हाच हा प्रश्न आपण स्वतःला विचारला होता. त्यानंतर तो संपूर्णतः विसरून गेलो. आयुष्यभर कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी पत्नी, कोणाची आई, कोणाची मैत्रीण, कोणाचा मालक, कोणाचा नोकर या अशा स्वतःच्या ओळखी निर्माण करत राहिलो आणि तीच आपली खरी ओळख, हे स्वतःला भासवत राहिलो. हाडामासाच्या शरीर नामक अस्तित्वाचेही प्रचंड लाड केले, त्याला जपलं, त्याच्या आतल्या सगळ्या षडरिपूंनाही जपलं आणि तीच आपली कक्षाही ठरवली.

या सगळ्या पलीकडे कधी नजर टाकली आपण? कधी शांत डोळे मिटले आणि अंतरंगात डोकावून त्या ‘मी’ला शोधण्याचा प्रयत्न केला?

छोटी इंद्रा जेव्हा महर्षींच्या समोर खेळताना वस्तूंची सांडलवंड करत होती तेव्हा कोणीतरी तिला म्हटलं ‘इंद्रा शांत रहा!’ ती म्हणाली, ‘मी शांतच आहे की!’ ‘आपल्या सभोवताली प्रचंड कोलाहल जरी असला तरी आत मात्र खोल खोल कुठेतरी प्रचंड शांतता असतेच, त्या शांततेला शोधायलाच हवं!

असं म्हणतात सकल विश्वाची निर्मिती एकाच ऊर्जेच्या स्रोतातून झाली आहे. त्या ऊर्जेचा अंश चराचरात आहे, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत आहे. हे सत्य समजलं तर विश्वबंधुत्व ही संकल्पना समजणंही फारसं अवघड नाही. तुझ्यातली ऊर्जा आणि माझ्यातली ऊर्जा ही एकाच ऊर्जेचा अंश असेल, तर तुझी वेदना आणि तुझा हर्ष हा माझ्याच वेदना आणि आनंदाचा भाग नव्हे का? मी म्हणजेच तू नव्हे का?

या अशा जाणिवांपलीकडच्या जाणिवाही खरंतर प्रत्येक मनुष्यहृदयात जन्मतःच असतात. हातून कळत-नकळत एखादी भली कृती घडली, की त्या जाणिवांचा खोल आतवर जो नाद उमटतो तो म्हणजे ‘सोहम’! अतिचंचल मनाच्या प्रांगणात राहूनही ज्याला तो स्थिर नाद ऐकू आला त्याला ‘कोहम’ समजले!

(लेखिका व्हॉइस थेरपिस्ट आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT