Sri Sri Ravishankar Sakal
सप्तरंग

श्रद्धा आणि आनंद

केवळ तुमच्या स्वाभाविक गुणांमुळेच तुमच्यात श्रद्धा किंवा विश्वास उद्‍भवू शकतो.

श्री श्री रविशंकर, प्रणेते आर्ट ऑफ लिव्हिंग

केवळ तुमच्या स्वाभाविक गुणांमुळेच तुमच्यात श्रद्धा किंवा विश्वास उद्‍भवू शकतो. श्रद्धा ही अंगीकारता येत नाही. तुमच्यामध्ये विश्वासाचा अभाव असेल तर बाह्यविश्वात अथवा अंतर्मनात कुठेही आनंद वास करीत नाही. आनंद हा श्रद्धेतूनच उत्पन्न होतो. आपल्या शरीरधारणेला विसरणे म्हणजे आनंदी होणे. शरीरधारणेलाच पकडून ठेवण्याने यातना आणि दुःख उद्‍भवते. आनंदाच्या भरात शारीरिक संवेदनांचा विसर पडतो. उलट आपण दुःखी कष्टी असतो, तेव्हाच वेदना, दुःखे यांची जाणीव होत असते.

प्रश्न : तसे असेल तर ध्यान करताना आपले लक्ष शरीराच्या विविध अंगांवर का न्यायचे असते?

श्रीश्री : बाण पुढे सोडण्यासाठी तो धनुष्याने थोडा मागे खेचावा लागतो. याचप्रमाणे तुम्ही काही क्षणांसाठी शरीराच्या विविध अंगांवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुम्हाला शरीर संवेदनांना विसरण्यात मदत होते.

सुखोपभोग

सुखोपभोगाच्या शोधात राहणाऱ्या मनाला एककेंद्रित करणं कठीण आहे. उलट तुम्ही एककेंद्रित व्हाल, तेव्हा सारे सुख आपसूकच तुमच्या पदरी पडेल. परंतु त्यावेळी त्या सुखाची तुम्हाला फारशी ओढ उरलेली नसतेच, कारण एककेंद्रित असताना तुम्हीच सुखाचे स्रोत बनता.

सुखाच्या मागे धावणारे मन कधीच अत्युच्च शिखर गाठू शकत नाही.

आणि तुम्हाला तुमच्या दुःखामध्येच बुडून जाणे आवडत असेल, तर तुम्ही मार्गावरून दूर भरकटत जाल आणि कधीही एककेंद्रित होऊ शकणार नाही.

तुम्ही सुखोपभोगामागे धावत असाल, तर सत्संग तर विसराच. मग तुमचा वेळ व्यर्थ का घालवताय? ही तर भरकटण्याची कला झाली.

तुम्ही एकतर सुखामागे धावत सुटा अथवा माझ्यापाशी या.

प्रश्‍न : लोक नकारात्मक भाषेतच बोलतात, तेव्हा काय करावे?

श्रीश्री : तुमच्या बाजूने तरी लोकांना परवानगी देऊन टाका, कुठेही, केव्हाही, कशाबद्दलही आणि कुणाबद्दलही बोलत राहण्याची परवानगी.

गृहपाठ : या आठवड्यात सर्वांबद्दल अधिकाधिक नकारात्मक बोलत राहा. असे करून बघा. हे तुम्हाला आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT