An-Era-of-Darkness 
सप्तरंग

मराठी वाचन वाढवतेयं...

सुहासिनी मुळे saptrang@esakal.com

मला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे. मी चार वर्षाची असताना माझ्या वाढदिवसाला भेट म्हणून मला पुस्तक मिळालं होतं. पुस्तक देणारे माझ्या आईच्या ओळखीचे होते. त्यांनी मला पुस्तकं देताना सांगितलं, की तू अजून लहान आहेस, तुला आत्ता हे पुस्तकं वाचता येणार नाही. दोन- तीन वर्षानंतर तू हे पुस्तकं वाचू शकशील आणि ही गोष्ट मी आव्हान म्हणून स्वीकारली. त्यावेळेस मला लिहिता व वाचता येत नव्हतं, कारण मी लहान होते. आमच्या घरी एक मोलकरीण काम करायची. तिला हिंदी वाचता येत होतं, मग मी तिच्याकडून ते पुस्तकं वाचून घेतलं. मुळात माझा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला. त्यामुळे माझी मातृभाषा हिंदी आहे. माझं मराठी काहीसं कच्चे आहे. मराठी वाचन नसल्यामुळे खूपच वाईट होतं. आता माझं मराठी सुधारलं आहे. म्हणून माझं सुरुवातीपासून हेच म्हणणं आहे की जो पर्यंत माणूस वाचत नाही तो पर्यंत त्याला नव्या शब्दाची ओळख होत नाही. लहान असताना आम्हाला गोष्टींची पुस्तके फारशी वाचायला मिळायची नाहीत. मग आम्ही पैसे साठवून चोरून ती पुस्तकं वाचायचो. 

मी बाहेर शिकल्यामुळे मला इंग्रजी भाषेतील पुस्तकं वाचायला फारच आवडायची.  गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये मी फक्त दोनच कामे केली. एक तर घरातील काम आणि भरपूर वाचन. अनेक चांगली पुस्तके मी त्यावेळी वाचली. मुळात स्वतः चित्रपटात काम केल्यामुळं मला टीव्हीचा अतिशय कंटाळा आला होता, म्हणून मी फक्त बातम्या बघायचे आणि कोणी तरी कोणता चांगला चित्रपट सांगितला तर तो पाहायचे, नाही तर बाकीच्या वेळेस वाचन करणं हेच मला फार आवडायचं. त्यावेळेस divergent allegiant and insugeant by veronica bradbury, 1984 by George orwell, Fahrenheit 451 byRay Bradbury, An era of darkness Shashi Tharoor अशी उत्तम पुस्तकं वाचण्याची संधी मला मिळाली.

लगान, जोधा अकबर, मोहनजदरो, पानिपत यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकेसाठी मला वाचन फारच उपयोगी पडलं. लगान चित्रपटासाठी मी फारसं वाचन केलं नाही, कारण या चित्रपटाची पटकथाच वेगळी होती. अतिशय साधी सरळ अशी गोष्ट या चित्रपटाची होती. ‘जोधा अकबर’ साठी मी बरंच वाचन केलं. ‘जोधा अकबर’चा सेट हा कर्जतला होता. कलादिग्दर्शक नितीन देसाईसोबत मी संपूर्ण सेट पाहिला. कारण मला खूपच उत्सुकता होती की त्यानं कशा प्रकारे याची तयारी केली होती.

नितीनने उत्तम आणि देखणा सेट उभारला होता. त्याने आपली कामगिरी चोख पार पाडली होती. हे सगळं मला वाचनातून आणि पाहण्यातून समजलं. यानंतर मोहनजदडोमध्ये  मी काम केले.  त्यावेळेस कशी माणसं होती.... ती कशी वागायची... कशा पद्धतीने त्यांचे राहणीमान होते या सगळ्या गोष्टी बारकाईने वाचून माझ्या लक्षात आल्या. 

आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत हा चित्रपट मी केला. तेव्हा प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांची पानिपत ही कादंबरी मी वाचली. मी माझ्या आईसोबत बसून ही कादंबरी वाचली. पानिपतवर एक पोवाडा आहे तो माझ्या आईने मला ऐकवला होता. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या चित्रपटातून दाखवल्या गेल्या नाहीत. मात्र मला खूपच उत्सुकता असल्याने मी याबद्दल बरंच वाचन केलं. 

मुळातच शाळेत असल्यापासून आपल्याला पानिपतचा इतिहास माहीत आहे. मात्र तेव्हा लहान असल्यामुळे नक्की यामध्ये काय दाखवलं आहे हे त्यावेळेस समजत नव्हतं. त्यावेळेच्या स्त्रिया आलवण वापरायच्या. त्यावेळी विधवा बायकांची काय  परिस्थिती असायची हे सगळं मला वाचनातून समजत गेलं. मुळातच माझं मराठी वाचन तसं खूपच कमी आहे. हिंदी, इंग्लिशमधील पुस्तकं मी पटापट वाचते. मात्र मराठीमध्ये मला बराच वेळ लागतो. पण मी आता ठरवलं आहे की हळूहळू मराठी वाचन वाढवायचं. आता ते कधी होणार हे मला माहीत नाही. मी गेली २६ वर्षे फक्त डॉक्युमेंट्री बनवत होते आणि त्यानंतर  मी अभिनय करायला सुरुवात केली. मला डॉक्युमेंट्रीसाठी चार राष्ट्रीय पारितोषिकं  मिळाली आहेत. अभिनयासाठी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. दोन वर्षापूर्वी एसएनडीटी विद्यापीठाला  शंभर वर्षे पूर्ण झाली. त्याची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली आहे. या विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त एक  डॉक्युमेंट्री बनवली होती. त्याकरिता महर्षी कर्वे यांचं आत्मचरित्र आणि त्यांच्या पत्नीचं आत्मचरित्र मी त्यावेळेस वाचलं. शेवटी वाचन खूप महत्त्वाचं आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT