सप्तरंग

#mokalevha समस्यावर बोलू काही  

ॲड. सुनीता एन. जंगम

मी ४० वर्षांची विवाहित स्त्री असून आम्हाला १२ वर्षांचा मुलगा आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे माझ्या कानावर आल्याने मी माहेरी निघून आले. मला त्यांच्यावर कारवाई करायची आहे.
- तुमच्या प्रश्‍नामध्येच उत्तर आहे. कारण तुम्ही म्हणत आहात की, विवाहबाह्य संबंध असल्याचे तुमच्या असे कानावर आले आहे. कान आणि डोळे यामध्ये अंतर आहे. ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नका. प्रथम सर्व शहानिशा करणे गरजेचे आहे. कधीकधी लोक सूतावरून स्वर्ग गाठतात, आणि तिखटमीठ लावून सांगतात. अशावेळी आपण डोळे उघडे ठेवून शहानिशा करणे गरजेचे आहे. कधी असूयेपोटी, अज्ञानापोटी अशा गोष्टी सांगितल्या जातात. अशाप्रसंगी जोडीदाराने खूप हुशारीने, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये किती खरे आणि किती खोटे हे बघणे गरजेचे आहे. माहेरी निघून जाणे हा यावरील पर्याय नाही. जोडीदाराला विश्‍वासात घ्या आणि वरील गोष्ट विचारा. समज-गैरसमज दूर होतील. समजा त्यात काही सत्यता आढळली तर, समुपदेशकाचा सल्ला घ्या. कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करा, संयमाने घ्या.

माझी पत्नी तीन वर्षापूर्वी क्षुल्लक कारणावरून भांडून मुलीसहित माहेरी निघून गेली. मी प्रयत्न करूनसुद्धा ती परत आली नाही. मला या कारणावरून घटस्फोट मिळू शकेल का?
-  पत्नीने स्वतःहून परत येण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तुम्ही खूप प्रयत्न केलेत, हे महत्त्वाचे आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ प्रमाणे, जोडीदाराने कोणतेही कारण न देता २ वर्षापेक्षा अधिक काळासाठी जोडीदाराचा त्याग केला असेल तर ते घटस्फोटाचे कारण बनू शकते. दोघांपैकी कोणी परत येण्यासाठी जास्त प्रयत्न केले आहेत, हे ही तपासले जाईल. एक जोडीदार कारण नसताना दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीत विभक्त राहत आहे, आणि स्वतःहून कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यास न्यायालय विभक्त होण्याचा निर्णय देऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT