सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ या चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शिक्षण , आरोग्य ,पर्यावरण , नागरी प्रश्न व सांस्कृतिक या क्षेत्रांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे गेली अनेक वर्ष सातत्यानं आयोजन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात माध्यम सुरु करण्यात आले. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमाविषयी व त्यात सहभागी कसे होता येईल याविषयी....
‘सकाळ’ हे केवळ वृत्तपत्र नसून वेळोवेळी सामाजिक बांधिलकी स्वीकारणारी संस्था आहे. दैनिक ‘सकाळ’ने १९३२ पासून अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ला ८९ वर्षांची सामाजिक परंपरा आहे. ‘सकाळ’च्या प्रमुख ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’ व ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, नागरी प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, हेरिटेज संवर्धन, विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत व सांस्कृतिक - कला या विविध क्षेत्रांत अनेक समाजविधायक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रत्येक सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. महाराष्ट्रात ग्रामीण भागात व शहरी भागांत अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था विविध समाजविधायक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत असतात. तसेच समाजातील अनेक होतकरू तरुण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक संशोधनासाठी प्रयत्न करत असतात. या सर्व होतकरू आणि नावीन्यपूर्ण संशोधनासाठी प्रयत्न करत असलेल्या युवकांना आणि संशोधकांना तसेच वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक यांना व्यक्तिगत स्तरावर आर्थिक मदतीची नितांत गरज असते.
एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या सामाजिक उपक्रमासाठी व्यक्तिगत स्वरूपात किंवा एखाद्या कंपनीच्या सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व विभागांतर्गत) निधी मिळत असतो. पण प्रत्येक सामाजिक उपक्रमात जनजागृतीद्वारे सामूहिक लोकसहभाग वाढवला, तर अशा सामाजिक उपक्रमांचा विस्तार होऊन होणारे परिणाम व फायदे समाजासाठी दीर्घकालीन व शाश्वत स्वरूपाचे असतात. हा हेतू लक्षात घेऊन ‘सकाळ’ने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांसाठी व नावीन्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शोधात्मक संशोधन करणाऱ्या तरुणांना तसेच वैद्यकीय कारणासाठी व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी क्राउड फंडिंग मिळवून देण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी वेबसाइट स्वरूपात डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे आर्थिक मदतीसाठी क्राउड फंडिंगचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी ‘सकाळ’कडून प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत सामाजिक काम करणाऱ्या तेरा क्रियाशील स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांची माहिती ‘सोशल फॉर ॲक्शन’ या क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आली आहे.
सीएसआर कंपन्या व देणगीदारांनी असे व्हावे सहभागी : ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन विविध स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटणावर क्लिक करून थेट स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमांसाठी वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी अंतर्गत हे प्राप्तिकरातील ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
महाविद्यालयीन युवक - युवतींना तसेच तरुणांना ‘सामाजिक उपक्रमांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी : ज्यांना समाजसेवेची आवड आहे, तसेच सामाजिक कामाचा अनुभव घ्यायचा आहे. असे महाविद्यालयीन युवक - युवती व तरुण त्यांच्या वेळेनुसार व विविध सामाजिक उपक्रमांसाठी https://socialforaction.com/ या वेबसाइटवर जाऊन ‘व्हॉलेंटिअर’ या बटणावर क्लिक करून आपली माहिती भरून स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकतात.
स्वयंसेवी संस्थांनी असे व्हावे सहभागी : महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या सामाजिक उपक्रमाची माहिती https://socialforaction.com/ या वेबसाइटवर जाऊन एनजीओ फंडरेझिंग या सेक्शनमध्ये जाऊन स्वयंसेवी संस्थांसाठी असणारा फॉर्म भरून आपल्या संस्थेसाठी ऑनलाइन क्राउड फंडिंगसाठी फंडरेझिंग अभियान सुरू करू शकता. स्वयंसेवी संस्थेसाठी त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र, ८० जी प्रमाणपत्र व १२ ए प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तसेच नावीन्यपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शोधात्मक संशोधन करणारे व आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले तरुण, तसेच वैद्यकीय कारणासाठी व (शस्त्रक्रियेसाठी) आर्थिक मदतीची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक https://socialforaction.com/ या वेबसाइटवर जाऊन इंडिव्हिज्युअल फंडरेझिंग या सेक्शनमध्ये जाऊन आपल्या व्यक्तिगत माहितीचा फॉर्म भरून आपल्या प्रकल्पाची व वैद्यकीय माहिती पाठवू शकता. यासाठी प्रमाणित तंत्रनिकेतन संस्था, शैक्षणिक संस्था व तत्सम संस्थेचे संशोधनासाठीचे व वैद्यकीय मदतीसाठी उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.