vegare mandavkhadak village development sakal
सप्तरंग

शाळांना व गावांना मदत....

शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहं असणे गरजेचं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहं असणे गरजेचं आहे.

शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहं असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, विद्यार्थ्यांनी डिजिटल साक्षर होणं आवश्यक आहे हे ओळखून ‘सोशल फॉर अॅक्शन’ या अभियानांतर्गत स्वच्छतागृह उभारणी, डिजिटल ई-लर्निंग सुविधा अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागाच्या व सामूहिक मदतीच्या (क्राउड फंडिंगच्या) माध्यमातून ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’ उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमासाठी प्राथमिक टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पंधरा शाळांची निवड करण्यात आली असून, भोर तालुक्यातील तांभाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे. तसंच, काही शाळांना ई-लर्निंग सेट-अप लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकसहभाग व सामूहिक मदतीची गरज

या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील जास्तीत जास्त शाळांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून, हजारो विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी व या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून लोकसहभाग व सामूहिक मदतीची गरज आहे. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक कंपन्या, सीएसआर कंपन्या आदींना या अभियानात सहभागी होऊन, सामूहिक आर्थिक मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या वेगरे - मांडवखडक या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या ‘सकाळ’ने जाणून ती दूर करण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ अभियानाच्या माध्यमातून गावातील डोंगरावर असलेल्या पाण्याच्या टाकीपासून गावठाणापर्यंत जलवाहिनी टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं असून, जलवाहिनीचं काम प्रगतिपथावर आहे.

अशी करा मदत

https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी - भारतीय नागरिक ‘अॅक्ट फॉर एज्युकेशन’ व इतर अभियानाची माहिती घेऊ शकतात. तसंच, ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट ‘सोशल फॉर अॅक्शन’ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

स्वयंसेवी संस्थांनी कसे व्हावे सहभागी -

महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आपल्या सामाजिक उपक्रमाची माहिती https://socialforaction.com/ यावेबसाईट वर जाऊन एनजीओ फंडरेझिंग या सेक्शन मध्ये जाऊन स्वयंसेवी संस्थांसाठी असणारा फॉर्म भरून आपल्या संस्थेसाठी ऑनलाईन क्राउड फंडींगसाठी फंडरेझिंग अभियान सुरु करू शकता. स्वयंसेवी संस्थेसाठी नोंदणी प्रमाणपत्र, ८० जी प्रमाणपत्र व १२ ए प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT