Mrunal Pawar and Indrayani Gavaskar
Mrunal Pawar and Indrayani Gavaskar Sakal
सप्तरंग

समाजसेवेला मिळाली दातृत्वाची साथ...

सकाळ डिजिटल टीम

‘सकाळ सोशल फाउंडेशन’ च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाईन वेबसाईट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाईटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून, "सोशल फॉर अॅक्शन" या अभियानांतर्गत महाराष्ट्रात चांगले काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमाची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करून, या सदरात संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली जाते....

‘माता आदिशक्ती प्रतिष्ठान’ ला मदत...

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका या आदिवासीबहुल परिसरात महिला सशक्तीकरण , रोजगाराभिमुख कौशल्याधिष्टित प्रशिक्षण आणि महिला व कुटुंबाचे राहणीमान उंचाविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या स्वयंसेवी संस्थेच्या ''उषा शिलाई स्कूल'' उपक्रमाची माहिती प्रसिद्ध करून , साक्री परिसर व ग्रामीण भागातील जास्तीत जास्त गरजू महिलांना टेलरिंग व शिलाईचे प्रशिक्षण देण्याकरिता व महिलांना स्वतःचा टेलरिंग व शिलाईचा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या संस्थेला शिलाई मशीन व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सकाळ सोशल फाउंडेशन मार्फत मदतीचे आवाहन करण्यात आले होते. आवाहनास रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड यांनी प्रतिसाद देऊन संस्थेला उषा कंपनीचे दहा शिलाई मशीन व एक पिको फॉल मशीन अशी अकरा मशीन्स भेट दिल्या आहेत. तसेच रोटरी क्लब धुळे क्रॉसरोड मार्फत परिसरातील गरजू महिलांना दोन महिने मोफत शिलाई प्रशिक्षण देण्यात येणार आहे. "सोशल फॉर अॅक्शन" अभियानांतर्गत सहा महिन्यात ''माहेर'' , ''एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास'' व ''माता आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान'' या तीन स्वयंसेवी संस्थांचे अभियान पूर्ण करण्यात आले आहे.

'एकलव्य बालशिक्षण व आरोग्य न्यास'' ला समाजाची साथ

सकाळ सोशल फाउंडेशन अंतर्गत "सोशल फॉर अॅक्शन" या क्राउड फंडिंगच्या डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे ''एकलव्य बालशिक्षण आरोग्य न्यास'' या स्वयंसेवी संस्थेची माहिती मदतीच्या आवाहनासहित या सदरात प्रसिद्ध करण्यात आली होती. संस्थेअंतर्गत निराधार , एकल पालक व कमी उत्पन्न गटातील मुलांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कुडाळ येथे वसतिगृह व शाळा बांधकाम प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तसेच तिथे पाण्याची मोठ्याप्रमाणात गैरसोय होते. पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी संस्थेला एका जनरेटरची गरज होती. शिवाय वसतिगृहाचा संपूर्ण परिसर तीन एकर जागेचा असून , मुलांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण परिसराला भिंतीचे कुंपण करणे आवश्यक होते. याशिवाय वसतिगृहासाठी व सांस्कृतिक हॉलसाठी आवश्यक भौतिक साधने (बाके ,पलंग) शैक्षणिक साधने व सांस्कृतिक साधने खरेदी करण्यासाठी संस्थेला मदतीची गरज होती. कुडाळचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी ''सोशल फॉर अॅक्शन'' अंतर्गत मदतीसाठी अभियान राबविण्यात आले होते. या अभियानांतर्गत ''एकलव्य बालशिक्षण आरोग्य न्यास'' संस्थेसाठी जमा झालेली काही लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश ''एकलव्य बालशिक्षण आरोग्य न्यास'' संस्थेच्या संस्थेच्या इंद्रायणी गावस्कर यांना सकाळ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार यांच्या हस्ते देण्यात आला.

कशी कराल संस्थांना मदात...

सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर विविध स्वयंसेवी संस्थांच्या सामाजिक उपक्रमाची माहिती प्रसिद्ध केली जाते. तसेच व्यक्तिगत वैद्यकीय मदतीसाठी आवाहन करण्यात येते. समाजातील दानशूर व्यक्ती , माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाईटला भेट देऊन , विविध सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटन वर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप क्रमांक : ८६०५०१७३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT