Thousands of migrants gather at Bandra and Mumbra demanding to go back home
Thousands of migrants gather at Bandra and Mumbra demanding to go back home 
सप्तरंग

पोटाचा संघर्ष मरणापेक्षा जास्त त्रास देतो 

योगेश कानगुडे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे मुंबईतील वांद्रे भागातील शेकडो स्थलांतरीत नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. हजारो नागरिक रस्त्यावर आले. ‘आम्हाला गावी जाण्याची परवानगी द्यावी’, अशी त्यांची मागणी होती. खरं तर लाखोच्या संख्येने लोक मुंबईत रोजगारासाठी येतात. त्यातले असंख्य लोक हे परराज्यातील आहेत. मुंबईत हाताला काम मिळतं. त्यामुळे पोटापाण्याची सोय होते. मग, एकटा आलेला कामगार काही काळानंतर आपलं कुटुंबही मुंबईत वसवतो. पण महिनाभरापासून जगभरातील परिस्थिती बदलली आहे. भारतातही लॉकडाउन जाहीर झाले. रेल्वे बंद केल्या तसेच बस, खासगी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. राज्य- जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आणि हे मजूर मुंबईतच अडकून पडले. २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर यातून सुटका होईल अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. 

या घटनेनंतर पुण्यात अडकलेल्या काही मजुरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना मोहन शर्मा म्हणाले, २१ दिवसांपासून माझ्यासारखे अनेकजण अडकून पडले आहेत. कोणालाच आपल्या गावी जाता येत नाही. येथे काम नाही. मेस आणि हॉटेल बंद आहेत. जवळ असणारे पैसे संपले आहेत. आतापर्यंत कसं तरी करून दिवस काढले. ज्या मालकाकडे काम करत होतो ते पैसे ही देत नाही आणि मदतही करत नाही. आता तर आमचा फोनही उचलत नाही. त्यांना विचारलं की शेवटचं तुम्ही घरी कधी गेला होतात. त्यावर ते म्हणाले वर्ष झालं या मार्च महिन्यात. आता असं वाटतंय की या अवघड काळात आपल्याला मूळ गावी जावं. लॉकडाउन जाहीर होण्याच्या आधीही मी जाण्याचा प्रयत्न केला होता. पण वेळेत ना पोहचल्याने गाडी निघून गेली. तेव्हा कोणतीही ट्रेन न पकडू शकलेले आणि त्यानंतर ट्रेन रद्द झाल्याने अडकून पडलेले मजूर आता आपल्याला गावी जाता येईल या आशेत होते. परंतु आज लॉक डाऊनमध्ये वाढ झाल्यामुळे अवघड झाले आहे. 

मोहन शर्मा यांच्या बाजूला असलेल्या भवानी निकम म्हणाले, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे या करोना व्हायरसमुळे वांदे झाले आहेत. लॉकडाउनमध्ये कोणताच व्यवसाय सुरू नाही. त्यामुळे हाताला कोणतेही काम नाही. काम नाही म्हणून पैसाही नाही. त्यामुळे या मजुरांच्या खाण्या-पिण्याची समस्या निर्माण झाली. आजच्या वांद्रयातील आंदोलनाविषयी विचारले. याविषयी बोलताना भवानी म्हणाले, पोटासाठी लागणाऱ्या गोष्टींचा संघर्ष हा मरणापेक्षा त्रासदायक असतो. या वाक्यानंतर त्यांच्या बोलण्यात प्रचंड अस्वस्थता जाणवत होती. जिवाची घालमेल सुरू होती. काही ठिकाणी राज्य सरकार या मजुरांची सोय करण्याचा प्रयत्न करतेय. पण, कुठेतरी मजुरांमधील राग आता अनावर होऊ लागला आहे. या दोघांबरोबर राहणारे सुरेश यादव म्हणाले, अनेक मजूर झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत. काही मजूर भाड्याच्या घरात राहतात. त्यांना रोजच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या घराचे भाडे तरी कसे देणार अशीही समस्या अनेक मजुरांसमोर उपस्थित झाली आहे. या आजाराने सगळ्यांसमोर मोठं आव्हान उभे केले आहे. याला तोंड देण्यास आम्ही तयार आहोत फक्त हाताला काम पाहिजे. आजच्या आंदोलांनाविषयी बोलताना ते म्हणाले, प्रत्येकाला अशा काळात आपल्या माणसांसोबत असावे. एक तर मजुरांना एका जागेवर बसण्याची अजिबात सवय नसते. गेले महिनाभर डांबून ठेवल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मजुरांचा सयंम सुटत चालला आहे. आज फक्त हे मुंबईत झालं आहे. परिस्थिती अशीच पुढे राहिली तर इतर ठिकाणी हे चित्र दिसू शकते. 

सरकारचे आश्वासन  
वांद्रा आणि मुंब्रा या रेल्वेस्थानकांवर परप्रांतीय मजुरांची गर्दी जमा झाली आणि लॉकडाऊनची आचारसंहिता मोडल्याचा प्रकार घडला. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले "परप्रांतीय मजुरांनो आहात तेथेच रहा. तुम्हीही या देशाचे नागरिक असल्याने महाराष्ट्र सरकार तुमची काळजी घेत आहे. आणखी काही लागल्यास व्यवस्था करू. घाबरू नका, थोडासा धीर धरा. तुम्हाला घरी जाण्यासाठी जरूर आतुरता असेल. त्यासाठी केंद्र सरकार सोबत रेल्वे सुरू करण्याची आम्ही विनंती देखील केली होती. पण आता ३ मेपर्यंत ही बंदी कायम राहणार असल्याने तुम्ही कोणाच्याही गैरसमजाला बळी पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार जर मजुरांची काळजी घेण्यास तयार असेल तर मजुरांनी त्यावर विश्वास ठेवून सहकार्य करायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT