लॉकडाउननंतर आता सर्व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला लागली आहे. त्यामुळे सर्वांची पावले कोणत्या न् कोणत्या पर्यटनस्थळाकडे वळायला लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवस घालवायचा असल्यास चांगला पर्याय आहे तो बनेश्वरचा. महादेवाचे अत्यंत देखणे मंदिर पाहण्याबरोबर या ठिकाणचा धबधबाही मन मोहून टाकतो.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बनेश्वर पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुण्यापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्यच आहे. बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये केली. त्यावेळी मंदिरास उभारणीस एकूण खर्च ११,४२६ रुपये आला. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा यांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. या घंटेवर १६८३ असे वर्ष असे कोरले असून, त्यावर एक क्रॉस आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मंदिरात आत गेल्यावर खूप प्रसन्नता जाणवते. सुरुवातीला असलेले तळे आपले लक्ष वेधून घेते. तळ्यातील पाणी नितळ असून त्याभोवती आता संरक्षक कडे तयार केले आहे. महादेवाचे शांतपणे दर्शन झाल्यावर आपली पावले मंदिराभोवती असलेल्या वनसंपदेकडे आपसुकच वळतात. या ठिकाणचे वातावरणच खूप आल्हाददायक आहे. मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी, पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी अन् यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. या वनातून थोडे पुढे गेल्यावर छानसा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांना प्रमुख आकर्षण आहे.
कसे जाल?
ऑगस्ट ते फेब्रुवारी हा काळ बनेश्वरला भेट देण्यास उत्तम मानला जातो. पुणे शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनेश्वरला येण्यासाठी राज्य परिवहन गाड्यांच्या मदतीने नसरापूर येथून पुढे बनेश्वरसाठी स्थानिक वाहतुकीच्या मदतीने पोचता येते. या ठिकाणी छोटेखानी हॉटेलमध्ये खाण्याची सोय होऊ शकते. स्वतःचे डबे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.