jersey island cow france sakal
सप्तरंग

जर्सी बेट गाईंचे!

फ्रान्सच्या किनाऱ्याशी अगदी जोडून असलेले जर्सी बेट ऐतिहासिकदृष्ट्या इंग्लंड व फ्रान्स यांच्या सत्तासंघर्षासाठी प्रसिद्ध असले, तरी ते खऱ्या अर्थाने अजरामर झाले आहे, ते या बेटावर असणाऱ्या गाईंमुळे.

सकाळ वृत्तसेवा

- वैभव वाळुंज

फ्रान्सच्या किनाऱ्याशी अगदी जोडून असलेले जर्सी बेट ऐतिहासिकदृष्ट्या इंग्लंड व फ्रान्स यांच्या सत्तासंघर्षासाठी प्रसिद्ध असले, तरी ते खऱ्या अर्थाने अजरामर झाले आहे, ते या बेटावर असणाऱ्या गाईंमुळे. या बेटावरील गाई जगभरात पसरल्या आहेत. मुक्त गोठा पद्धतीनुसार शेतात दूरदूरपर्यंत वावरणाऱ्या धष्टपुष्ट गाईंना बघून मला आमच्या गोठ्यातील आळंदी गाईची आठवण झाली.

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या कित्येक ब्रिटिश गोष्टी या खऱ्या अर्थाने ब्रिटिश आहेत, हे आपल्याला बरेचदा जाणवत नाही. अगदी खेडोपाडी पसरलेल्या जर्सी गाई हे याचे उदाहरण. ससेक्सच्या अति दक्षिणेकडील भागात इंग्लंडने काबीज केलेल्या छोट्याछोट्या बेटांचे समूह आहेत.

या बेटांवर इंग्लंड आणि युरोप या मुख्य भूमितीतील देशांपेक्षा काहीशी वेगळी जैवविविधता आढळते. फ्रान्सच्या किनाऱ्याशी अगदी जोडून असलेले जर्सी बेट ऐतिहासिकदृष्ट्या इंग्लंड व फ्रान्स यांच्या सत्तासंघर्षासाठी प्रसिद्ध असले, तरी ते खऱ्या अर्थाने अजरामर झाले आहे, या बेटावर असणाऱ्या गाईंमुळे. वेगवेगळ्या तापमानांमध्ये तग धरण्याची क्षमता असणाऱ्या व दुधात प्रचंड फॅट्स असणाऱ्या या बेटावरील गाई जगभरात पसरल्या आहेत.

इंग्लंडमध्ये काही रस्त्यावर दिसत असल्या, तरी ग्रामीण भागात अगदी प्रत्येक शेतामध्ये दिसतात. मुक्त गोठा पद्धतीनुसार शेतात दूरदूरपर्यंत वावरणाऱ्या धष्टपुष्ट गाई बघून मला आमच्या गोठ्यातील आळंदी गाईची आठवण झाली.

इतर गाई-बैलांसारखी खिलार शिंगे असण्याऐवजी तिची शिंगे आखूड आणि आत वळलेली होती; पण अर्थातच विदेशी मूळ असल्यामुळे गावातल्या-गावात तिच्यासोबत वंशभेद केला जायचा; कारण तेव्हा देशी गाईचे दूध हे जास्त पौष्टिक मानले जात असे. स्थानिक लोकांकडून विचारपूस करून मी या बेटावर जायचे ठरवले.

दक्षिण इंग्लंडपासून पश्चिमेकडे थोड्या अंतरावर असणाऱ्या साऊथहॅम्प्टन शहरातून जर्सी बेटावर जाण्यासाठी थेट बोट मिळते. जवळपास विमानतळासारखे सजवलेले बोट स्टेशन आणि बंदर ओलांडून मी जर्सी बेटावरच्या प्रवासाला निघालो. बेटावर पोचल्यानंतर मात्र जिथे तिथे फक्त गाईचे अस्तित्व जाणवते. शहरात अनेक ठिकाणी जर्सी गाईला वाहिलेली स्टेशन, स्मारके, वेगवेगळ्या डेअरीज तसेच माहितीदर्शक फलक ठिकठिकाणी आहेत.

जर्सी गाय भारतात १९७० च्या सुमारास आयात केल्या गेल्या. थेट या गाई आणण्याऐवजी त्यांचे बीज भारतीय गाईंशी जुळवून एक नवी प्रजाती विकसित करण्यात आली. यातूनच भारतात दुग्धक्रांती किंवा श्वेतक्रांतीची सुरुवात झाली होती. सुरुवातीला फक्त देशी वाण भारतात असावे व बाहेरील विदेशी गाईंना पूर्णपणे बंदी घालावी, असे धोरण होते.

मात्र दुधावर प्रक्रिया करून त्यापासून पावडर व इतर पदार्थ बनवण्यासाठी जर्सी गाईची ख्याती असल्यामुळे या गाईंना प्राधान्य देण्यात आले. याच्यापूर्वीपासून जर्सी गाई अमेरिकेत तसेच दक्षिण अमेरिकेत प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक देशांमध्ये स्थानिक प्रजातींचा संकर करून वेगवेगळे वाण तयार करण्यात आले होते.

महाराष्ट्रात सहकारी चळवळीतून या गाई घेण्यासाठी विविध सहकारी बँकांनी कर्जपुरवठा करायला सुरुवात केली. यातून या गाईंचे बीज महाराष्ट्रात गावोगावी पसरले. यातूनच खेडोपाडी डेअरी आणि दुग्ध उद्योगाचे जाळे पसरले व त्यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला.

दुग्ध उद्योगांना यशस्वी होण्यासाठी या लहानशा बेटावरून आलेल्या गाईचे बीज महत्त्वाचे ठरले. अर्थात यामुळे बऱ्याच प्रमाणात स्थानिक प्रजातींना धोका उत्पन्न झाला व अनेक देशी वाण जवळपास अस्तंगत होण्याच्या मार्गावर गेले.

गमतीची गोष्ट अशी, की अगदी जर्सी गाईंसाठीदेखील हा धोका उत्पन्न झाला होता. कारण इतर वेगवेगळ्या प्रजातींचे वाण या गाईंशी संकरित करण्यासाठी बेटावर येत राहिले. म्हणूनच येथील स्थानिक पंचायतीने जुलै २००८ मध्ये एक कायदा बनवत बाहेरून आणणाऱ्या सर्व प्रकारच्या वाणावर तसेच बैलांच्या विर्यावर पूर्ण बंदी घातली आहे.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये युके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत नीती व धोरण या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईला रेड अलर्ट! कर्मचाऱ्यांनो 'वर्क फ्रॉम होम' करा, बाहेर पडू नका; BMCकडून आवाहन

Pune Flood: इंद्रायणीला पूर, आळंदीत २५० वारकऱ्यांचे स्थलांतर; पूल पाण्याखाली... कठडे अन् चेंजिंग रूम वाहून गेल्या, दुकानांसह घरांमध्ये पाणी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार

Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा फटका लोकल सेवेला; तिन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने...

Pune Rain : मावळमध्ये पावसाचे रौद्र रुप ! पुणे-मुंबई महामार्गावर टेम्पो चालकासह वाहून गेला, NDRF ने खासगी बसमधील ३७ जणांचे वाचवले प्राण

SCROLL FOR NEXT