Nomophobia disease  young people due to mobile
Nomophobia disease young people due to mobile 
सप्तरंग

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही प्रत्येक सेकंदाला फोन चेक करताय का? मोबाईलच्या स्क्रिनची लाईट लागली तरी तुम्ही मोबाईल पाहाताय का...? हे तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा...कारण, मोबाईल, गॅजेट्सच्या अतिवापरामुळं नोमोफोबियाचा आजार जडू लागला आहे. 

भारतामध्ये तंत्रज्ञानाच्या सवयीचा दर गरजेपेक्षा जास्त वाढल्याने तरूणाई 'नोमोफोबिया' नावाच्या आजाराने ग्रस्त होत आहे. त्यामुळं गॅजेट, मोबाईलचा वापर गरजेपुरताच करायला हवा. पण, नक्की काय आहे नोमोफोबिया याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.

नोमोफोबिया म्हणजे काय ?
मोबाईल स्क्रीन डोळ्यासमोर नसल्याने अस्वस्थता वाटते
वारंवार मोबाईल पाहण्याची सवय लागते
आपला मोबाईल विसरण्याची भीती असते

मोबाईलच्या अतिवापराचे तोटे ?
फोनच्या वापरामुळे तुमचा वेळ वाया जातो 
वागण्या-बोलण्यामध्ये अस्वस्थता येऊ लागते
फोनच्या अतिरेकी वापरामुळे झोप बिघडते, झोप कमी येते 
मोबाईल फोनचा बराच वेळ वापर केल्यानंतर मान दुखणं
डोळे कोरडे होणं, कंम्प्यूटर व्हिजन सिंड्रोम आणि अनिद्रेचं कारण बनतात 

त्यामुळे मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा. एका दिवसात तीन तासापेक्षा जास्त वेळ कंप्युटरचा वापर करू नका. मोबाईल दिवसातून एकदाच चार्ज करावा. या नियमांचं पालन केल्यास नामोफोबियाचा होणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. आमच्या पडताळणीत तरूणाईला 'नोमोफोबिया' आजार जडतोय हा दावा सत्य ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : गाडीची लाईट का चमकावली म्हणून २० जणांच्या टोळक्याकडून दोघांना मारहाण

IPL 2024 : हैद्राबादच्या वादळाने मुंबईच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात... प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी ठरली टीम

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

BAN vs IND women T20 : टीम इंडिया शेवटही करणार गोड.? आज बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना

Salman Khan Firing Case: फक्त सलमान खानच नाही, तर इतर दोन प्रसिद्ध अभिनेतेही होते बिश्नोई गँगच्या रडारवर

SCROLL FOR NEXT